|
या केकचे नाव हेच आहे का मला माहीत नाही. पण तरीही अननसाचा स्वाद असल्यामुळे मी असंच बारसं केलय. साहित्य: ४-६ अनन्साचे तुकडे (स्लाईस किंवा उभे तुकडे ४ ६ अक्रोडाचे तुकडे १ चमचा बटर २ चमचे गूळ ----------------- १०० ग्रॅम मध १०० ग्रॅम गूळ १०० ग्रॅम बटर १०० ग्रॅम मैदा १०० ग्रॅम कणीक २ चमचे आल्याचे बारीक लांब तुकडे १ चमचा सोडा ३ मोठे चमचे दही अर्धा कप दूध १ अंडे कृती बटर आणि गूळ गॅसवर वितळून घेणे, गार होत असताना त्यामधे मध घालणे. पूर्ण गार झाल्यावर त्यमधे फ़ेटलेले अंडे, दही व दूध घाल्णे, मैदा कणीक घालणे, सोडा व आल्याचे तुकडे घालणे व व्यवस्थित फ़ेटून घेणे, एका पॅनमधे १ चमचा बटर २ चमचे गूळ वितळवून घेणे, केकच्या भांड्याला आतून हे मिश्रण लावणे. त्यावर अननसाचे तुकडे रचून ठेवणे, मधे मधे अक्रोडाचे तुकडे लावणे. वरून हे केकेचे मिश्रण ओतायचं. १७० डीग्रीवर ३० मिनिटे बेक करायचे. झाला केक.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|