|
Sas
| |
| Tuesday, February 19, 2008 - 2:00 am: |
| 
|
१. तांदुळ, दाळी, कडधान्य वापरण्याआधी किती वेळा धुवावे?? मी तांदुळ चक्क १५-२० वेळा धुते, पाण्याचा पांढरटपणा जाई पर्यंत(तांदळातला स्टार्च कमी व्हावा यासाठी,)दाळी आणी कडधान्य मी ८-१० वेळा धुते. २. धान्य जास्त धुतल्याने त्यातला सकस पणा कमी होतो का? ३. दाळी आणी कडधान्य हा शाकाहारी लोकांसाठी Proteins चा Source , सर्व दाळी आणी कडधान्या चे सारखेच फायदे आहेत का वेगवेगळे Benefits आहेत. ४. आरोग्याच्या दुष्टिने कोणत्या डाळी व कडधान्यांचा वापर जास्त करायला हवा.
|
Sas
| |
| Tuesday, February 19, 2008 - 2:00 am: |
| 
|
Horlicks, Complain हे आरोग्याला खरच फायद्येकारक आहेत का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 19, 2008 - 2:54 am: |
| 
|
तांदळाला, टिकण्यासाठी बर्याचवेळा बोरिक पावडर लावलेली असते, ती निघून जाण्यासाठी तांदुळ धुवायचे. दोन तीनदा धुतले तरी पुरे. चोळुन चोळुन धुण्यापेक्षा, पाची बोटे पाण्यात फ़िरवुन धुतले तरी चालते. तसेच डाळींच्या बाबतीत. नाहीतरी आपण डाळ तांदुळ पुरेसे शिजवुनच खातो, त्यामुळे तसा धोका नाही. शिजवण्यापुर्वी डाळ भिजत ठेवली तर लवकर शिजते. जास्त धुतल्याने, अर्थातच थोडा सकसपणा कमी होतो. प्रत्येक कडधान्य आणि डाळी थोड्याफ़ार फ़रकाने सारखेच पोषणमूल्य देतात. उडीद डाळ सर्वात जास्त प्रथिने देते. सोयाबीनमधेही प्रथिने जास्त असतात. डाळींपेक्षा मोड आलेली कडधान्ये वापरणे चांगले. एकाच कडधान्यावर वा डाळीवर भर न देता, सर्वच डाळी व कडध्यान्ये वापरावीत. मी सवतः कट्टर शाकाहारी आहे. नियमित आणि समतोल आहार घेतला तर तो आरोग्याच्या दृष्टीने पुरेसा असतो. जोडीला झेपेल इतका व्यायाम व झोपही हवीच. हॉर्लिक्स व कॉम्प्लान चे घटक वाचले तर काहि आवश्यक घटकांची ती खिचडि असते. त्यातले बहुतेक घटक आपल्याला नेहमीच्या अन्नातुन मिळतच असतात, पण चव आणि सोय म्हणुन दोन्ही वापरणे काहि वाईट नाही. भाज्यांपेक्षा प्रत्येक मोसमात मिळणारी फळे खाणे उत्तम, त्यातली नैसर्गिकरित्या तयार झालेली शर्करा आणि तंतु, उत्तम आहार आहेत. बहुतेक फळात काहितरी खास गुण आहेत, अगदी बोरे देखील जस्ताचा पुरवठा करतात.
|
Akhi
| |
| Tuesday, February 19, 2008 - 7:16 am: |
| 
|
हॉर्लिक्स व कॉम्प्लान ने खुपसा फायदा होत नाही. असे मला माझ्या doc ने सांगितले. त्या ऐवजी B -Protine मिळते ते वापरावे. chocalate favour मधे पण मिळते. दुधात पण छान लागते. मी रोज तेच घेते.
|
Sas
| |
| Tuesday, February 19, 2008 - 5:43 pm: |
| 
|
Thank U very so much दिनेश जी 
|
Sas
| |
| Tuesday, February 19, 2008 - 5:46 pm: |
| 
|
Thank you 'Akhi', मी इथे B-Protine मीळत का नक्की बघेल 
|
Arch
| |
| Tuesday, February 19, 2008 - 5:56 pm: |
| 
|
इथे एक सांगावस वाटत की पूर्ण शाकाहारी लोकांच्यात B12 कमी असायचे chances असतात. त्यामुळे additional B vitamines घ्यायची गरज असते. अर्थात आपापल्या डॉक्टरच्या सल्यानुसार ते घ्याव.
|
Wel123
| |
| Wednesday, February 20, 2008 - 1:10 am: |
| 
|
soy milk रोज घेउ शकतो का
|
Dineshvs
| |
| Wednesday, February 20, 2008 - 3:32 am: |
| 
|
सोया मिल्कने काहि त्रास होत नसेल तर रोज घ्यायला हरकत नाही. मागे टाटानी असे उत्पादन भारतात आणले होते. त्यावेळी त्यांच्या कर्मचार्याना कामावर असताना ते फ़ुकट मिळत असे, म्हणुन लोक भरपुर पित असत आणि पुढे त्याचा त्याना त्रास झाल्याने, ते उत्पादन बंद पडले. कदाचित त्यावेळी प्रक्रिया पुर्णत्वाला गेलेली नसावी. आता बाजारात मिळणारे सोया चंक्स वगैरे भाजीत वापरले तरी चालतात. आपल्याला सवयीचे शेंगदाणे व डाळी प्रथिनासाठी घ्यायला हरकत नाही. B12 चा अभाव जे दूध वा तत्सम पदार्थही घेत नाहीत, त्याना जाणवु शकतो. अलिकडे अनेक खाद्यपदार्थात ते अल्प मात्रेत मिसळलेले असते. निकड भासलीच तर डॉक्टरांच्या सल्ल्याने थेट इंजेक्शनद्वारे ते घेता येते.
|
Prajaktad
| |
| Wednesday, February 20, 2008 - 2:07 pm: |
| 
|
सोय मिल्क लहान मुलांना(३ वर्श) द्यावे का? किती प्रमाण असावे? कुठल्याही डाळी(कडधान्य) शिजताना त्यात २-३ थेब तेल टाकले तर मऊ शिजतात..
|
Sas
| |
| Monday, March 10, 2008 - 3:20 pm: |
| 
|
तुप: गायीचे तुप आणी म्हशीचे तुप यात काय फरक आहे? कोणते तुप आरोग्या साठी जास्त चांगले? गायीचे तुप गरम पडते हे खर का? तुपाने कफ-खोकला वाढतो का?? तोंड आल्यवर (Mouth Ulcer) कोणत तुप वापराव?
|
Sas
| |
| Monday, March 10, 2008 - 7:58 pm: |
| 
|
http://www.amritaveda.com/learning/articles/ghee.asp ह्या link वर तुपा विषयी उपयुक्त माहिती आहे, पण वरील प्रश्नांन बाबत एवढा खुलासा नाही 
|
Sas
| |
| Monday, March 10, 2008 - 8:14 pm: |
| 
|
Few more useful links about Ghee: 1.http://www.gowardhanindia.com/importence.html 2. http://freeradicalfederation.com/archive/2006/07/25/Ghee_Comparison_Table.aspx 3. http://www.yoghee.com/benefits.html 4. http://www.usenature.com/article_ayurveda_ghee.htm
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|