|
Manjud
| |
| Saturday, June 16, 2007 - 9:36 am: |
| 
|
ज्वारी, बाजरी, गहू, मका यापैकी कुठलेही पीठ १ ते १.५ चमचा घेउन ते साजूक तुपात भाजुन गार करायचे. मग त्यात ३ चमचे पाणी व कपभर दूध चांगले शिजू द्यायचे. साधारण भज्यांच्या पीठाएवढे घट्ट झाले की कोमट करून बाळाला द्यायचे. ६-९ महीन्याच्या बाळासाठी हा उत्तम आहार आहे.
|
Disha013
| |
| Monday, June 18, 2007 - 4:49 pm: |
| 
|
आणि ते पिठ आधी भाजुन ठेवले तर चालते. मी १५ दिवसाचे वगैरे भाजुन ठेवते आधीच. हे खायला दिले की बराच वेळ पोट भरलेले राहाते बाळाचे. लवकर भुक लागत नाही.
|
Dineshvs
| |
| Monday, June 18, 2007 - 5:13 pm: |
| 
|
दिशा, बाजारात VITA ENERGY या नावाने एक मिक्स मिळते. त्यात हिच कल्पना वापरलीय. त्यात मका, बाजरी, नाचणी. ज्वारी. टोपिओका, शिंगाडा, मुगडाळ, उकडा तांदुळ, चणाडाळ, केळ्याची पावडर, खारकेची पावडर, सोयाबीन, हिरवे चणे, उडिद डाळ, काजु, तुर डाळ, साबुदाणा, बदाम, बार्ली, वेलची, पिस्ता, आक्रोड आणि अश्वगंधा हे घटक आहेत. यातले सगळे चमचाभर घेऊन, घरी असे पिठ करता येईल. हे पिठ दुधात शिजवुन खायचे असते. नुसतेही पिठ छान लागते. लाडुही करता येतात.
|
Riddhi
| |
| Monday, June 18, 2007 - 5:34 pm: |
| 
|
माझी मुलगी ४ महिन्याची आहे तिला मी भाताचे पाणी, पालेभाज्यान्चे पाणी देत असते. तिला आता म उ भात दिला तर चालेल का अजुन काय देउ शकते तिला प्लिज मला सान्गा धन्यवाद
|
Disha013
| |
| Monday, June 18, 2007 - 8:14 pm: |
| 
|
दिनेशदा,तुम्ही नेहमीच छान माहिती देता.
रिद्धि,वरील archives वाचुन काढ. खुप खुप माहिती आहे इथे. माझ्या मुलिला वरचे सुरु केले तेव्हा मला इथल्या माहितीचा खुप उपयोग झाला. आता ती वर्षाची झालिये. काही शंका असतील तर सगळे आहेतच.
|
Kanak27
| |
| Monday, June 25, 2007 - 12:00 pm: |
| 
|
दिनेशदा गुळपापडीच्या वड्या कश्या बनवतात अणि त्या ८ मिहिन्याच्या बाळाला दिले तर चालेल का
|
Dineshvs
| |
| Monday, June 25, 2007 - 4:40 pm: |
| 
|
गूळपापडीच्या वड्या इथेच आहेत. पाकाशिवाय आणि पाकाच्या, असे दोन्ही प्रकार आहेत. ८ महिन्याच्या बाळाला द्यायला आदर्श आहेत त्या. दात येत असतील, तर अवश्य द्याव्यात.
|
Kanak27
| |
| Tuesday, June 26, 2007 - 11:53 am: |
| 
|
Plz link tari dyana. दिनेशदा खुप शोधल पण सापडत नाहि आहे. आणि आजुन एक अडचण आहे सध्या अवनि रात्रि उधते. बहोतेक भुके मुळे त्यावेळेस तीला काय खायला द्यावे मि नाचणि देते डाक्टर नि दुध कमि द्याल सन्गितल आहे आधि ति रात्रभर उधाचि नहि Which is good for her ? is baby need food in 3-4 hours in sleep also ? Or to give food them when only they wake up ? सध्या तिच वजन ६.५ आहे पण अस वाटत आहे तिच वजन कमि होत आहे काल बिबि वाचल्या पासुन तुप परत सुरु केल आहे आजुन कहि करु शकते का
|
कनक, जर अवनी भुकेमुळे उठते असं वाटंत असेल तर झोपायच्या एक तास आधी तिला पोटभर खायला दे. माझ्या मुलाला (सहा महीन्यांचा झाल्यावर)झोपण्याआधी दुधात शिजलेलं नाचणीसत्व खाण्याची सवय केली. सुरुवातीला पाव वाटी खायचा आणि वर्षाचा झाल्यावर ऑलमोस्ट एक मोठी वाटी भरून! दात यायला त्रास झाला नाही. रात्री पोट व्यवस्थीत भरल्यामुळे झोपायचा. (मात्र १० ला झोपला की सकाळी पाचला दुधासाठी ठणाणा!) डॉक्टरला किंवा घरी अनुभवी व्यक्तींना विचारून हा प्रयोग करून बघायला हरकत नाही. पण डायरेक्ट नाचणी न देता सत्व दे. (मुळात नाचणी पचायला अतीशय जड. सत्व खायला घ्यातल्यावर पाणी भरपूर द्यावं लागतं. सुरवात अगदी चमचाभर देण्यापासून करायची. बाळाला पचलं तर मग क्वांटिटी वाढवता येते.)
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 26, 2007 - 5:04 pm: |
| 
|
नाचणीसत्व अवश्य द्यावे. नाचणीत भरपुर कॅल्शियम असते, त्यामुळे दात येण्याच्या काळात अवश्य द्यावे. सुरवातीला साधारण चमचाभर कपभर पाण्यात वा दुधात शिजवुन द्यावे. साखर घालावी. आपण चव घेऊन बघावी. नाचणीचे सत्व बाजारात तयार मिळते. तसे न मिळाल्यास. नाचणी रात्रभर पाण्यात भिजत घालावी. सकाळी निथळुन मिक्सरमधे वाटुन घ्यावी. आधी ती नीट वाटली जात नाही. पण परत परत फिरवल्यावर वाटली जाते. मग थोडे पाणी घालावे. हे सगळे आणखी थोड्या पाण्यात मिसळावे आणि मग बारिक चाळणीने गाळुन घ्यावे. चोथा टाकुन द्यावा. खालचे पाणी न हलवता तसेच ठेवावे. थोड्या वेळाने सत्व खाली बसते. वरचे पाणी ओतुन टाकावे. हा साका ताटात ठेवुन उन्हात वाळवावा. उन नसेल तर फ़्रीजमधे ठेवले तरी चालते. वड्या पडल्या कि परत मिक्सरमधुन काढुन बाटलीत भरावे. गव्हाचेदेखील असे सत्व करता येते. तेही मुलाना देता येते. दुधाबरोबर मुग, रताळी, लाल भोपळा, गाजर, दुधी भोपळा, बटाटा आदींच्या खिरी द्यायला हरकत नाही. साखरेचे प्रमाण अत्यल्प ठेवावे. मुले खिरी आवडीने खातात. मुलाना दिवस आणि रात्र यातला फरक कळायला वेळ लागतो. त्यामूळे भुक लागली कि ती उठतात. अश्यावेळी हाताशी खाऊ तयार असावा. रात्रीच जास्त प्रमाणात सत्व वा खीर शिजवुन थर्मास मधे ठेवली तर उबदार राहते. चण्याची वा मुगाची डाळ शिजवुन त्यात पोहे, गुळ व पिकलेले केळे घालुन द्यायला हरकत नाही. मुले हाही प्रकार आवडीने खातात. गुळपापड्या उद्या लिहीन.
|
Karadkar
| |
| Tuesday, June 26, 2007 - 6:50 pm: |
| 
|
/hitguj/messages/103383/57614.html?1180427240 हे घ्या नाहितर मिलिंदा कावेल लगेच

|
Kanak27
| |
| Wednesday, June 27, 2007 - 11:56 am: |
| 
|
Mrinmayee,Dineshda,karadker Thanks a lot . karadkar , u saved Dineshda's precious time . Thanks! mrinmayee मी अवनिला रात्रि नाचनिसत्वच देते. मला टेन्शन असत कि तिने उपशि राहुने म्हणुन. She wake up in night after each 5 hours . At that time i give her Nachanisatv. before she sleep i give her khichadi of rice & mungdal . Is it ok ? दिनेशदा गुळपापडि ख्याण्यास कशी द्यावि एखादा तुकडा घश्यात अडकु शकतो का Deepa
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 27, 2007 - 4:01 pm: |
| 
|
मिनोति आभार. कनक, मायबोलीसाठी माझ्याकडे भरपुर वेळ असतो. खिचडि देणे चांगलेच. पण रोज एकाच चवीची खिचडी देण्यापेक्षा, त्यात रोजच्या भाजीतला छोटासा तुकडा घालावा. गुळाचा पाक करुन केलेल्या वड्या, चिवट होतात. त्यामुळे बाळाला त्या चघळतच खाव्या लागतात. त्याचा तुकडा सहसा पडत नाही. तरीही बाळाकडे लक्ष ठेवावेच लागते.
|
Kanak27
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:13 am: |
| 
|
Thanks ! पालक टाकला तर चलतो का एकदा मि टाकला होत पन तिल २-३ जुलब झाले म्हनुन बन्द केल अवनिला खुप सर्दि झाली आहे काय करु रात्रि सारखि उथत असते
|
Bee
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:36 am: |
| 
|
फ़क्त ४ महिन्याच्या मुलीला गुळपापडीच्या वड्या, खिचडी इतके काही!!! मला वाटतं हे जरा जास्त होईल तिला पचायला. निदान सहा महिन्याचे तरी मुल होऊ द्यावे. कनक, मध्यंतरी storvi ने लहान बाळाच्या आहारावर खूप काही लिहिले होते. इथे लहान बाळाचे दोन बीबी आहेत. दोन्ही बीबी तू अगदी सुरवातीपासून वाचून काढ. त्यावेळी खूप खोलात चर्चा झाली होती. मीही ती चर्चा माझ्या ताईच्या लेकीसाठी वाचली होती. नाचणी सत्व घेताना त्यात साखर वेलची नाही हे पाहून घे. घरीच साखर टाकलेली बरी राहते. नाचणीची लापशी दिलेली चालते. माझी भाची ३ महिन्याची असल्यापासून नाचणीची लापशी पिते. अजून एक असेच सांगतो की, शेपू खाल्ली तर अंगावरचे दुध वाढते असा प्रत्यय ताईला आला होता.
|
Kanak27
| |
| Thursday, June 28, 2007 - 9:20 am: |
| 
|
Bee , thanks ! My baby is 8 months old. So dont worry असहि मि जाणकाराना विचारल्या शिवाय नविन काहि experiments तिच्यावर करत नाहि Deepa
|
Dineshvs
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:40 pm: |
| 
|
सर्दीसाठी अळशी, तुळस आणि कांदा याचा काढा उपयोगी पडतो. हे सगळे उकळुन, त्यात खडीसाखर घालुन गाळुन घ्यावे व द्यावे. कुशीवर झोपवले तर निदान एकतरी नाकपुडी खुली राहते. व श्वासाला त्रास होत नाही. पण बाळाचा कुठलाही आजार एकदिड दिवस राहिला तर डॉक्टराना अवश्य दाखवावे. बाळाला एखादी चव आवडली नाही, वा असे काहि झाले तर काहि काळ ते देऊ नये.
|
Deepa_s
| |
| Tuesday, July 24, 2007 - 6:51 am: |
| 
|
७ महिन्याच्या मुलाला तान्दुळाच्या पिठीपसून केलेली उकड दिली तर चालेल का? ताक फ़ार आंबट नाही वापरणार.
|
Nkashi
| |
| Monday, January 14, 2008 - 11:26 am: |
| 
|
माझी मुलगी ७ महिन्याची आहे पण अजुन तिला वरचे दुध चालु केले नाही. (पावडर दुध जन्मापासुनच चालु आहे i.e. Dexolac ). तिला कोणते दुध चालु करावे? आम्ही घरी चितळे / कात्रज म्हशीचे दुध घेतो.
|
Prajaktad
| |
| Monday, January 14, 2008 - 8:03 pm: |
| 
|
नक्शी ! म्हशी च्या दुधापेक्षा गायिचे दुध पचायला सोपे असते.. तेव्हा गायिच्या दुधात वावडिंग टाकुन उकळावे.. कोमट असताना गाळुन द्यावे. देताना साखर वैगरे टाकु नये..थोडे देवुन बघावे पचले कि अजुन द्यावे.. वावडिगांनी पोटात वायु धरत नाही..दुध बाधत वैगरे नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|