Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Calphalon cookware

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » Calphalon cookware « Previous Next »

Prady
Wednesday, December 26, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणी काल्फलान ची भांडी वापरतं का इथे? मला त्यांच्या स्टेनलेस स्टील तसंच नॉनस्टिक दोन्ही कूकवेअर बद्दल माहिती हवी आहे. नॉनस्टिकचे कोटिंग कितपत रिलायेबल आहे? स्टीलची भांडी असतील तर ती कॉइल वर वापरता येतिल का. भांड्यांचे तळ कितपत जड आहेत. स्टीलच्या भांड्यांमधे खाली लागणे,जळणे हे प्रकार कितपत होतात? कालफलान बरेच महाग मिळतात. ईतके पैसे घालणं वर्थ आहे का? कृपया जाणकारांनी आपलं मत द्यावं.

Lalu
Thursday, December 27, 2007 - 3:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Prady, माझ्याकडे नॉनस्टिक Calphalon चा सेट आहे. ८, ९ वर्षं तरी झाली घेऊन. तेव्हा नॉनस्टिकच प्रचलित होतं जास्त. एकंदर नॉनस्टिक बद्दल इथे काही चर्चा झाली आहे ती वाच. लिन्क वरचं article ही दिसेल अजून.
नॉनस्टिक
सेट अजून चांगला टिकला आहे. एका छोट्या भांड्याचे कोटिंग बाहेरुन गेले आहे त्यामुळे ते पांढरट दिसते जरा. बाकीची चांगली आहेत. यात खाली काही लागत नाही, तळ बराच जाड असतो पण त्यामुळे तापायलाही जरा वेळ लागतो. तेव्हाही ती महागच होती. जमलेल्या पॉइंटसवर घेतली होती मी.

आता घ्यायची झाली तर स्टेनलेस ची घ्यावीत असं माझं मत आहे. स्टेनलेस ची घ्यायची तर Calphalon शिवाय Cuisinart वगैरे पण चांगली आहेत. त्यांची सुटी काही मोठी भांडी माझ्याकडे आहेत. तळ जाड असतो. खाली लागत, जळत वगैरे नाही. Tools of the trade, Belgique ची कॉपर बॉटम ची पण आहेत. घेताना वरचे झाकणही स्टेनलेस असलेलेच घ्यावे, ते काचेचे नको. एमरिल ची पण आहेत पण नावाचे पैसे जास्त बाकी काही वेगळं नाही. पण असा एखादा चांगला सेट असणं वर्थ आहे. घरी स्वयंपाक करत असाल तर. ~D

Maitreyee
Thursday, December 27, 2007 - 3:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही ही लालू, मी ते वर्थ ऐवजी व्यर्थ वाचलं :-)
मला नॉन्स्टिक पेक्षा स्टेनलेस ची भांडी विथ कॉपर बॉटम बेस्ट वाटतात. cuisineart ची ओके आहेत.


Arch
Thursday, December 27, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Calphalon मध्ये माझी साधी भाजीपण लागते. काय चुकीच करत असेन?

Lalu
Thursday, December 27, 2007 - 5:22 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाजी गॅसवर ठेवून तासन् तास हिंदी TV मालिका बघत बसत असणार! मग काय होणार दुसरं. ... ~d

Arch
Thursday, December 27, 2007 - 5:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खरच की. अगदी बरोब्बर ओळखलस.

बर पण त्या Calphalon च technique तर सांग

Lalu
Thursday, December 27, 2007 - 6:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्टेनलेस की नॉनस्टिक? नॉनस्टिक चं वेगळं काही टेक्निक नाही, भांडं आधी चांगलं तापवून घेतल्यावर (हीट high ठेवून नव्हे. medium वरच तापू द्यावे) फोडणी घालून मग लो हीट ठेवायची. बिर्याणी चांगली होते यात, सगळे मीट खाली घालायचे असते तेव्हा जाड तळामुळे करपत नाही, लागत नाही. पॅन मध्ये झुणका पण चांगला होतो. भाजीसाठी मात्र कॉपर बॉटमची कढईच बेस्ट, नाहीतर sandwich बॉटम चे स्टील चे भांडे. हल्ली माझी स्टील चीच जास्त वापरली जातात.

Prady
Thursday, December 27, 2007 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल्फलान च्या साईटवर Anodized भांडी पण दाखवली आहेत. calphalon 1 म्हणून. त्यामुळे Anodized की स्टील ह्यापैकी काय घ्यावं हे कळत नव्हतं. nonstick घ्यायचं नाहीये. मला स्वत्:ला पण स्टेनलेस स्टीलच जास्त बरं वाटतय.

Karadkar
Thursday, December 27, 2007 - 8:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याकडे calphalon ची नाहीत पण circulon ची आहेत. त्याचा ( Circulon ) एक प्रोब्लेम वाटला मला तो म्हणजे त्यात की त्या रेघांमधे अडकलेले काढावे लागते नीट. लालु म्हणते तसे आधि medium heat वर तापवुन मग बारीक करुन भाज्या चांगल्या होतात. गेले ६ वर्शे वापरतेय फ़क्त एक भांडे खराब झालेय गेल्या वर्षी ते पण जाडा रवा भाजताना.

Calphalon चा एक तवा वापरते आहे गेले वर्षभर काही प्रॉब्लेम नाही.

अलिकडे मला एक Belgique चा सेट गिफ्ट म्हणुन आलाय. मोठ्या भांड्यांमधे रगडा, छोले वगैरे करुन झाले. काही प्रॉब्लेम वाटला नाही जळत वगैरे नाही अज्जिबात. आणि मोठ्या पार्ट्यांसाठी लागणारी मोठी भांडी चांगली वाटली. लहान भांडी नेहेमी वापरली जात असल्याने घासायला वगैरे सोपी वाटली Circulon च्या मानाने. पण स्टीलची असली तरी मी हातानेच घासते कारण मला वाटते जास्त दिवस चकाकी राहील.



Lalu
Thursday, December 27, 2007 - 8:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्राडी,तू नॉनस्टिक म्हणजे अजून वेगळी म्हणते आहेस का? मला वाटलं तू 'नॉनस्टिक' शब्द 'anodized' साठी वापरलास. मला नॉनस्टिक म्हणजे anodized च म्हणायचं होतं. त्यात अजून प्रकार निघालेत माहित नव्हतं. आत्ता साईट पहिली मी. त्या simply nonstick' प्रकाराला आतून वेगळं कोटिंग दिसतंय. anodized आतून बाहेरुन - सारखीच दिसतात.

Prady
Thursday, December 27, 2007 - 10:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो माझाच जरा गोंधळ झाला आधीच्या पोस्टमधे. Anodized बद्दल खरंतर विचारायचं होतं.

Manuswini
Thursday, December 27, 2007 - 11:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी सांगू?

माझ्याकडे कलफलान चा steel set आहे. हो, अगदी मी आवडीने घेतला एकटीला.

मला nostick मध्ये आपली indian style ने चमचे फीरवून वगैरेस मोकळीक मिळत नाही असे वाटते. थोडेफार maitian पण करावे लागते. म्हणजे धूवताना हातानेच धोवावे. soft side वापरून घासावे वगैरे. गशी ज्यास तापवून सोडून जावु शकत नाही.

१ मुख्य काळजी(माझ्या अनुभवाने) गस वर भरपूर तापवून करु शकत नाही, म्हणजे काहीच ना आत टाकता भांडी तापवू शकत नाही. तेल टाकून ही धूर येइपर्यन्त गरम कराअय्चे नाही. ते खराब होते.

फक्त चहाला, omlet ला तवा वगैरे छान आहे non-stick चा वापर. मी तवा नी चहाचे भांडे आईला नको म्हणून आईच्या सेट मधून आणले.

पण steel चा सेट मला आवडले.


Sunidhee
Friday, May 30, 2008 - 10:11 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मी all-clad ची स्टील ची भांडी वापरते. पैसे वसूल. वजनाला जड असतात. लवकर गोष्टी शिजतात, त्यामुळे कमी ईंधन लागते.. पदार्थ लवकर करपत नाही. तळाला फार लागत नाही.. अगदीच दूर्लक्ष केले तरच लागतो.. दिसायला छान असतात त्यामुळे पार्टीला पदार्थ दूसर्‍या भांड्यात काढला नाही तरी चालतो.

Grihini
Friday, October 31, 2008 - 1:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल्फ़लॉन वन इन्फ़्युज्ड आनि हार्ड ऐनोडाइज्ड मधे काय फ़रक आहे? स्टील ची भान्डि पुलाव साठि उपयोगात आणु शकतो का? मि ट्राय प्लाय चे एक भान्डे ऑर्डर केले आहे. मला अजुन भान्डि घ्यायची आहेत. कुणी अनुभव शेअर करेल का?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators