Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
GAS (LPG/CNG) गिझर ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » आधुनिक उपकरणे आणि भांडीकुंडी. » GAS (LPG/CNG) गिझर « Previous Next »

Nandita
Tuesday, November 27, 2007 - 11:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Gas गिझर कोणी वापरत असेल तर त्यबद्दल लिहा प्लिज :-)

Prady
Tuesday, November 27, 2007 - 6:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुंबईला माझ्या आईकडे आहे गॅस गिझर. ईलेक्ट्रिसिटीचं बिल पहिल्याच महिन्यात ४०० रुपयाच्या आसपास कमी झालं. शिवाय लोडशेडिंग असलं तरी गरम पाणी मिळायची सोय होते. पैशाची बचत नक्कीच आहे. वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे. चार वर्षांपूर्वी असा गिझर बसवायला ६००० च्या आसपास खर्च होता. पण पुढे बरीच बचत होते. घरी पाईप गॅसचं कनेक्शन घेतानाच ही सोय करून घ्यावी म्हणजे एकदाच काय ती तोडफोड होते. आणी ते महानगर गॅसचे लोक एकदा काम करून गेले की परत पकडून आणा त्यांना शंभर वेळा फोन करा हा पण एक त्रासच असतो. थोडं खर्चिक असलं सुरवातीला तरी अगदी डोळे मिटून करावी अशी गुंतुवणूक आहे.

Karadkar
Tuesday, November 27, 2007 - 9:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आमच्याकडे पण आहे घरी ते. आणि गस इलेक्ट्रिसिटिच्यामानाने स्वस्त आहे म्हणुन पैशचाची बचत होतेच. एकच गैरसोय आहे ति म्हणजे shower नाही :D

Prady
Tuesday, November 27, 2007 - 9:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शॉवर पण येतो. माझ्या आईकडे आहे ती पण अटॅचमेंट.

Rads
Wednesday, November 28, 2007 - 6:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही सूचना.....

गॅस गिझर वापरताना शक्यतो शॉवरचा वापर टाळावा. तसेच आधि हवेतेवढे गरम पाणी घेवून गिझर बंद करुन मगच बाथरूमचे दार लावावे. लाहान मुलाच्यबाबतीत, त्यांना गिझर चालू असताना शॉवर बाथची सवय लावू नये. मुलांच्याबाबतच नाही पण मोठ्यांनी सुध्दा सावधगिरी बाळ्गायला हवी. आणि हो... शक्य असेल तर गिझरचे टोटल युनिटच बाथरुमच्या बाहेरच बसवावे.

ह्या सूचना लिहायचे कारण, माझ्याच नात्यातल्या एका १९ वर्षिय मुलाच्याबाबतीत गॅस गिझरचा अपघात दोनच महिन्यांपुर्वी घडला. त्याचे आई बाबा नेहमीप्रमाणे ऑफिसला गेले. लहान भाऊ ११.०० वाजता शाळेत जायला निघाला होता. आणि ह्याला सुट्टी होती म्हणून जरा उशीराच अंघोळीला गेला होता. गॅस गिझर चालू ठेवून त्याची अंघोळ चालली होती.

लहान भाऊ तो शाळेत निघाला आहे, दरवाजाचे लॅच लावून घेतो हे सांगण्यासाठी बथरुमपाशी गेला. दादा म्हणून एकदा, दोनदा हाका मारल्या, पण आतुन कहिच प्रतिसाद आला नाही. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्यावर आसपसच्या लोकांना मोठ्यांने हाका मरुन त्याने बोलावले. त्यांनी बाथ. दरवाजा धक्के मारून उधडला. तो पर्यंत ल. भावाने आई,बाबांना फोन पण केले होते. आम्ही २ KM दूर रहातो. तिथेही फोन करुन ऍम्बुलन्सच घेऊन या म्हणुन सांगितले.

आम्ही दहाच मिनिटात तिथे पोहोचलो. तोपर्यंत जवळच्याच एका डॉ. बोलावुन उपचारपण सुरु झाले होते. हा मुलगा बाथ.मधे गॅस गिझरच्या वायू ज्वलनाने तयार होणार्‍या Co2 मुळे बेशुध्द पडला होता. आतमधे त्यला ऑक्सिजन कमी पडला होता. संध्याकाळ पर्यंत तो जवळ्जवळ बेशुध्दच होता.

हे अनुभव कधन केवळ काही सावधगिरीच्या सूचना देण्यासाठीच.


Nandita
Wednesday, November 28, 2007 - 8:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मिनोति, प्रज्ञा अणि पुणेकर धन्यवाद माहितिबद्दल :-)

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators