|
Dineshvs
| |
| Friday, April 21, 2006 - 4:13 pm: |
| 
|
ब्राऊन शुगरला डिमेरारा शुगर असा शब्द आहे. काहि काहि पदार्थात, खास करुन बेक करायच्या पदार्थात ती वापरायला सांगितलेली असते. भारतात ब्राऊन शुगर हे एक ड्रगचे नाव होते. मुलाना शक्यतो साखर देऊच नये. गुळ ऊष्ण वैगरे काहि नसतो. साखरेपेक्षा तो चांगलाच. फक्त त्यात जास्त रसायने घातलेली असु नयेत. रसायन विरहित गुळ जरा काळपट दिसतो. काकवी, मध हे पर्याय आहेतच.
|
Boli
| |
| Friday, April 21, 2006 - 6:51 pm: |
| 
|
thanks Karadkar and Dinesh.
|
Sayonara
| |
| Monday, June 19, 2006 - 7:15 pm: |
| 
|
इथे indian store च्या frozen section ला खवा दिसला. कसा असतो? कुणी वापरला आहे कां?
|
Moodi
| |
| Monday, June 19, 2006 - 9:19 pm: |
| 
|
सायो युसचे तर बाकी सांगतील पण इथे मी जो खवा बघितला साधारण पिवळसर रंगाचा( युरोपात गाईचे दुध असते म्हणुन पांढरा रंग जरा कमी) चव किंचीत खारट असते. मी त्याची मागे बर्फी बनवली होती, बरी लागली. पण गुलाबजाम नाही केले. तसा चांगला असतो. कंपनी कुठली आहे ते बघ. म्हणजे अमुल वगैरे नाव असेल तर भारतातुन आयात केलेला नाहीतर स्थानिक कंपनी असेल तर नक्कीच मी सांगीतला तसा असण्याची शक्यता जास्त( इथल्या लोकांना म्हैस कशी दिसते ते नाही माहीत, तिचे दुध आपण भारतात पितो म्हटल्यावर उडायचे बाकी होते. त्यामुळे खवा गाईच्याच दुधाचा असेल) फार पकवले का गं तुला? 
|
Seema_
| |
| Monday, June 19, 2006 - 10:25 pm: |
| 
|
सायो नानकचा frozen खवा चांगला असतो . ( आता india सारखाच हवा अस असेल तर मग आवडनार नाही )~D फ़क्त room temp वर आणल्याशिवाय वापरु नको . मी तो वापरुन काजु कतली करते बरेच वेळा .
|
Sayonara
| |
| Monday, June 19, 2006 - 10:43 pm: |
| 
|
thanks गं मूडी आणि सीमा. ब्रॅंड कुठला ते नाही पाहिलं मी. पण पुढच्या वेळी पाहीन. मला बर्फी वगैरे करायची नाहीये तर दुधी हलवा किंवा गाजर हलव्यात घालायला हवा होता. तसंच तो जास्त टिकावा म्हणून thaw करुन तुपावर परतून ठेवावा कां?
|
Moodi
| |
| Tuesday, July 18, 2006 - 7:20 pm: |
| 
|
दूध है वंडरफूल. मस्त माहिती. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1761715.cms
|
Sunidhee
| |
| Tuesday, July 18, 2006 - 9:11 pm: |
| 
|
लोकहो, कुठे लिहावे न कळल्याने इथेच लिहिते. आपण बहुतेक जेवणात खुपदा फोडणी करतो. कधीकधी चटणी वगैरे ला अगदी थोडीशी फोडणी लागते. प्रत्येक वेळेला खुप वेळ जातो. म्हणुन मी डबाभर फोडणी करुन ठेवते आणि जशी लागेल तशी थोडीथोडी वापरते. ह्याने वेळ तर भरपुर वाचतोच पण जेवढी हवी तेवढीच फोडणी घेता येते त्यामुळे तेल पण अगदी थोडे वापरले जाते. आणि करुन ठेवली तरिही चव चान्गली रहाते. फ़्रीज़ मधे ठेवावी.
|
Surabhi
| |
| Sunday, November 12, 2006 - 10:55 am: |
| 
|
वरच्या Archive thru' 20th April मधे अळशी उर्फ जवस बद्दल वाचले. त्याचे गुणधर्म, औषधी उपयोग आणि भारतीय जेवणातल्या पाककृती सकट फारच छान माहिती इथे पण आहे. http://www.bhj.org/journal/2003_4502_april/ethnic_334.htm
|
Dineshvs
| |
| Monday, January 15, 2007 - 11:55 am: |
| 
|
केशराबद्दल थोडेसे. केशराबद्दल काहि चर्चा ईथे मागे झाली होती. ईथे लिहितोय ते कदाचित त्यावेळी चर्चेत आलेहि असेल. केशराचे छोटे रोप असते. स्पेन, ईराण आणि काश्मिर अश्या मोजक्याच जागी त्याची पैदास होते. किमतीच्या दृष्टीने व्हॅनिलाच्या खालोखाल त्याचा क्रमांक लागतो. CBDG केशराचे निळा जांभळट रंगाचे फ़ुल असते आणि त्यात मोजुन तीन केसर असतात. ते अलगद हाताने वेगळे केले कि केशर मिळते. केशराची लागवड तितकिशी सोपी नाही, त्या साठी काहि वर्षे जमिन पडिक ठेवावी लागते. तसेच केशराचे पिक हुकमी आहे, असेहि नाही. या सर्वांमुळे केशराची किम्मत खुपच जास्त असते. आणि याच कारणास्तव त्या भेसळहि खुप केली जाते. डॉ. मीना प्रभुंच्या तुर्कनामा पुस्तकात, उघड्या डब्यात आणि तेहि उघड्यावर केशर विकायला ठेवल्याचा उल्लेख आहे. ( भारतात नाही ईस्तंबुल मधे. ) ते बघुन त्या हळहळल्या. पण जवळ जाऊन वास घेतल्यावर, ते छपरावर पसरायच्या लायकिचे आहे, असे त्याना वाटले. रंगद्रव्याच्या दृष्टीने बघितल्यास, प्राजक्ताच्या फुलाचे देठ आणि केशर, हे एकच म्हणावे लागेल. त्यामुळे अर्थातच त्याची भेसळ केली जाते. कृत्रिम रित्या ते सुगंधी करणेहि अशक्य नाही, पण तरिही त्याला अस्सलाची सर येत नाही. कुठलाहि सुगंधी पदार्थ, हवेच्या संपर्कात राहिल्यास, त्याचा सुगंध हळुहळु उडुन जातो. ( आपल्या नाकाला कुठलाहि गंध जाणवतो, याचाच अर्थ तो त्या पदार्थापासुन अलग झालेला असतो. ) त्यामुळे केशर उघड्यावर विकायला ठेवता येत नाही. ते खुपदा हवाबंद प्लॅष्टिकच्या डबीत वा काचेच्या बाटलीत विकायला असते. त्याला असलेले सील बघुनच ते घावे लागते. डबीवर सहसा देशाचे नाव, आणि पिकाचे वर्ष दिलेले असते. हवाबंद डबीत असले तरी, एका वर्षापेक्षा जास्त जुने केशर घेऊ नये. केशराचा वास सराईत नाकाला सहज ओळखता येतो. केशर घातलेल्या पदार्थाला येतो, त्यापेक्षा तो सुगंध बराच तीव्र आसतो. अस्सल केशर रंगाने काळसर लाल असते. आणि त्यात एखादे फिकी छटाहि असते. केशराचा तंतु साधारण दीड सेमी पर्यंत लांब असतो. तो बुडाशी जरा रुंद व पुढे टोकेरी होत गेलेला असतो. तसेच तो खुप चिवटहि असतो. दोन चिमटित धरुन ओढल्यास सहजासहजी तुटत नाही. केशर जर कोरड्या रुपात वापरायचे असेल, तर ते जाड तव्यात किंचीत गरम करुन चुरडुन घातले तर चांगले. जर त्याची कोरडी पुड करायची असेल, तर कोरड्या साखरेबरोबर त्याची पुड केल्यास चांगले. म्हणजे त्याचा सुगंध खुलतो. ईतरवेळी केशराच्या काड्या गरम दुधात भिजत ठेवुन, खलुन घ्याव्या लागतात. ज्या पदार्थात दुध घालता येत नाही, त्या पदार्थात केशर घालताना, ते लिंबाच्या रसात भिजत घालुन, खलुन घालता येते. केशर हे नेहमी पदार्थ शिजल्यावरच घालतात. नाहितर गरम करण्याच्या प्रक्रियेत तो वास उडुन जातो. ईतर घटकांचे, खास करुन मटण, मासे यांचे तीव्र गंध नष्ट करण्यासाठी ( यावर माझे अनेक मित्रमैत्रिणी आक्षेप घेणार आहेत, याची मला कल्पना आहे. ) केशराचा वापर होतो. फ़्रेंच पद्धतीच्या कोलंबीच्या कोशाच्या सुपमधे, किंवा स्पॅनिश पद्धतीच्या पाएला नावाच्या फ़िश बिर्याणित ते वापरतात. आखाती देशात, मिठाईत पामुख्याने ते वापरतात. बाजारात हल्ली, बर्फीवर, हलव्यावर खुपदा केशराची एकेक काडी लावलेली दिसते. त्या मिठाईची किम्मत बघता, ते बनावट केशर आहे, असा कयास सहज करता येतो. एरवी आईस्क्रीम वैगरे पदार्थात, बहुदा कृत्रिम सुगंधच वापरला जातो. केशर पुर्वीपासुन रंगापेक्षा त्याच्या सुगंधासाठी वापरण्यात येत आहे. केशर घालुन पदार्थाला केशरी रंग येत नाही. शिवाजी महाराजांच्या काळात, सुगंधासाठीच त्याचा वापर होत असे. अफझलखानाच्या भेटीला जाण्या पुर्वी, दासीने त्यांच्या शुभ्र अंगरख्यावर, केशराच्या पाण्याची बोटे लावल्याचा उल्लेख मी वाचला आहे. पाडगावकरांच्या, " मोर केशराचे झुलती, पहाटेस दारी " याचा संदर्भ मात्र वेगळा असावा. शास्त्रीय संगीतात आणि खास करुन राजस्थानी लोकगीतात, केसरीयाचे येणारे उल्लेख, हे खुपदा रंगाचेच असतात. केसरीया बालमा ( लता ) केसरिया अंगिया रंग लागी ( शोभा गुर्टु ) केसर रंग मै डालुंगी तुम्हीपर और मलुंगी गुलाल लाल, ( कौन तर्हासे तुम खेलत होली हो, पारंपारिक ठुमरी ) हे सगळे रंगाचेच उल्लेख आहेत. तिथे हा रंग उल्हासाचे, प्रतीक आहे. आयुर्वेदातहि याचा उल्लेख आहे. याबाबत जाणकार सांगु शकतील. पण खोकला आणि कफ सारख्या विकारात केशर देतात असे मी वाचले आहे. केसरी कल्प, केसरी जीवन सारख्या जोम आणि ताकद वाढाव्णार्या औषधात, ते वापरले असल्याचा दावा केला जातो. ( अश्या प्रकारच्या औषधांचे दावे, किती सिरीयसली घ्यायचे, हा ज्याचा त्याचा प्रश्ण आहे. ) काहि सौंदर्य प्रसाधनात व साबणात देखील तो वापरल्याचा दावा केला जातो. अश्या प्रसाधनांचा मला काहि अनुभव नसल्याने, मला काहि लिहिता येणार नाही. केशराची किम्मत आणि अस्सल केशराची दुर्मिळता लक्षात घेता, त्याचा वापर नेहमीच्या जेवणात करणे, जरा अशक्यच आहे. तरिही एक अनुभवसिद्ध, औषध देतोय. कॉपीराईट माझा, ( पण प्रयोग मात्र स्वतःच्या जबाबदारीवर करायचा आहे. ) १०० ग्रॅम अश्वगंधा चुर्ण, १०० ग्रॅम शतावरी चुर्ण, ( दोन्ही बाजारात सहज उपलब्ध आहे. ) ५० ग्रॅम सुंठ पावडर, एक चमचा पिंपळी आणि तीन चिमटी केशर, असे सगळे एकत्र करुन, चाळुन घ्यावे. वर लिहिल्याप्रमाणे केशराची पुड करण्यासाठी, पाव वाटी साखरेबरोबर ते मिक्सरवर फिरवावे. पिंपळीचेहि चुर्ण तसेच करुन घ्यावे. मग ते सर्व दोनतीनदा चाळुन, कोरडेच बाटलीत भरुन फ़्रीजमढे ठेवावे. यातले अर्धा चमचा चुर्ण घेऊन त्यावर उकळते पाणी ओतावे. चवीप्रमाणे साखर व दुध किंवा दुधाची पावडर घालुन, सकाळी चहा ऐवजी प्यावे. स्त्री आणि पुरुष दोघानाहि चालु शकेल, असे हे एक जनरल टॉनिक आहे. दिवसभर तरतरी राहते व मानसिक तणावांपासुन सुटका होते. ( याची सवय लागेल, अशी भिती वाटत असेल, तर याचा वापर करु नये. )
|
Safaai
| |
| Monday, January 15, 2007 - 12:20 pm: |
| 
|
याची सवय लागेल, अशी भिती वाटत असेल, तर <<< याचा अर्थ काय? याची (अयोग्य असलेली) सवय लागू शकते असा याचा अर्थ असेल तर हे येथे देणे धोकादायक नाही का? प्रयोग मात्र स्वतःच्या जबाबदारीवर करायचा आहे<<< मॉडरेटर्स, हे वाक्य बोल्ड, अंडरलाईन करता येईल का? उगाच दिनेश नी लिहीलं म्हणून कोणीतरी करायचं आणि पुन्हा जबाबदारी त्या सदस्याचीच असणार.. तेव्हा काही प्रॉब्लेम व्हायला नको..
|
Bee
| |
| Tuesday, January 16, 2007 - 3:11 am: |
| 
|
दिनेश, केशरची माहिती अतिशय सुंदर दिली. खूपच छान लेख लिहिला असे म्हणता येईल.
|
Shonoo
| |
| Wednesday, January 31, 2007 - 9:03 pm: |
| 
|
इथे अमेरिकेत Tulips चे कंद विकणारे कॅटलॉग वाले कधी कधी केशराचे कंद पण विकतात Crocus Sativus या नावाने. पेन्सिल्व्हेनिया आणि ओहायो या राज्यातले आमिश लोक असे कन्द लावतात घराच्या अंगणात आणि त्यांच्या स्वैपाकात ते घरचंच केशर वापरतात असं ऐकलंय. दर वर्षी ते कंद मागवून लावायचा संकल्प असतो. पण अजून तरी तो योग आला नाही! इथल्या देशी दुकानात मिळणारं स्पॅनिश केशर मात्र अगदी लाजवाब!
|
Lajo
| |
| Tuesday, July 17, 2007 - 9:03 am: |
| 
|
काल आमच्या देशी दुकानदाराने मला उकडा तांदूळ म्हणुन ' SAMBA Rice ' दिला आहे. कोणी सांगू शकेल का की हा उकडा तांदूळचं आहे? आणि नसेल तर त्याचे काय करायचे? मी माझ्या ३ महिन्याच्या मुलीला देण्यासाठी म्हणुन आणला आहे. चालेल का?
|
तीन महिन्यांच्या बाळाला भात देतात?
|
तीन महिन्याच्या बाळाला प्रौढाचा सर्व आहार चालतो!! त्याची पचनसंस्था परिपूर्ण झालेली असते तेव्हा...
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:12 pm: |
| 
|
लाजो, मूळातच साम्बा राईस हा चिकट असतो. तो शिजायलाही वेळ लागतो. खुपदा लाल राईस म्हणुन लाल रंग लावलेला भात मिळतो ( माझा अनुभव ) म्हणुन बाळाला तो देऊ नये. त्या तांदळाला शिजताना एक वेगळा वासही येतो. बाळाला देण्यासाठी आंबेमोहर, किंवा बासमति तांदुळ व मुगाची डाळ भाजुन त्याचे भरड पिठ करुन, ते मऊ शिजवुन देता येईल. असे अनेक प्रकार मी आधी लिहिले आहेत.
|
Lajo
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:27 am: |
| 
|
धन्यवाद दिनेशदा. तांदुळ व डाळ आधी धुवून वाळवून मग भाजायची का? आणि या सांबा चे काय करू???
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 18, 2007 - 9:51 am: |
| 
|
हो धुवुन सावलीतच वाळवायची धान्ये ती. सांबा च्या इडल्या वैगरे करता येतील.
|
Lajo
| |
| Thursday, July 19, 2007 - 1:34 am: |
| 
|
थॅंक्स वेरी मच च दिनेशदा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|