Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through October 03, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » मसाले » मसाले » Archive through October 03, 2007 « Previous Next »

Uno
Thursday, June 01, 2006 - 5:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shonoo,
Tu USA madhe asateka? me kadhi pasun fresh Chiku shodhate aahe pan milala nahi. tuzya post madhe vachal manun vicharla.

Shonoo
Thursday, June 01, 2006 - 7:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

फ़्रेश चिकू न्यू जर्सी मधल्या एडिसन किंवा जर्सी सिटी मधे मिळतात. चिनी दुकानात पण कधी कधी मिळतात. आता पर्यन्त कधीही एकदम तयार चिकू मिळाले नाहीत जरा कच्चे आणि कडक असतात. घरी आणून ब्राउन पेपर बॅगेत घालून मग तांदळाच्या डब्यात ठेवून दोन्-तीन दिवसांनी तयार होतात.

बी त्या चिनी दुकानातल्या अ-भारतीय भाज्यांची नावे मला काय ठाउक? मी आपली आलटून पालटून ताज्या एक्-दोन काहीतरी आणते आणि मग त्याचं trial and terror बनवते झालं.

दुकानातल्या इतर गिर्‍हाइकांना नाहीतर काउंटर वरच्या बाईला विचारयचं की बाई ही भाजी तुम्ही कशी करता. अगदी उत्साहाने सांगतात. त्यातले घरी असतील ते जिन्नस घालून करुन पहायचा तो प्रकार.

कानडीत एक म्हण आहे 'कोन्द पापा, तिन्द परिहारा' म्हणजे काहीतरी मारल्याच्या पापाचे परिमार्जन ते खाउनच केले पाहिजे त्याला मी ' तन्द पापा तिन्द परिहारा' म्हणते आणल्याच्या पापाचे परिमार्जन खाउन करायचे.


Bee
Friday, June 02, 2006 - 2:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चांगली सुचना दिलीस शोनू आणि ती म्हण पण खूप आवडली.

मी थाई चिक्कू नेहमी आणतो. एकदम मोठे असतात आकारानी आणि कच्चेच असतात पण घरी आणलेत की वर जरी ठेवलेत तरी ते आरामात पिकतात. मी कधी गव्हात वगैरे ठेवून बघितले नाही.

.. एक गोष्ट लक्षात येत आहे की ह्या बीबीचा विषय काय नि आपली विचारपूस काय :-)


Uno
Friday, June 02, 2006 - 6:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sorry Bee,
Chiku vachal ani rahayal nahi gela, manun vicharla ke USA madhe miltat ka te.

Moodi
Wednesday, September 06, 2006 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू बहुतेक मी तुझीच पोस्ट( किंवा सल्ला) वाचली होती की मसाला हा मिक्सरपेक्षाही कॉफी ग्राइंडर मध्ये जास्त चांगला दळला / वाटला जातो. तेव्हा मला असे विचारायचे आहे की आपण मसाला तर तेलात भाजून घेतो मग समजा तो त्या ग्राइंडरमध्ये वाटला तर नंतर बाकी कशाकरता आपण वापरु शकतो का? म्हणजे एकदा मसाल्याचा वास लागला की नंतर कॉफी बिया त्यात दळल्या जाऊ शकतील का? त्याला वास येणार नाही ना? अजून काय काय दळले जाते त्यात? म्हणजे खरे तर तो कोरडे पदार्थ वाटण्याकरता आहे ना? खूप प्रश्न विचारलेत मी पण मला आठवतय की बहुतेक तुच हा सल्ला दिला होतास( म्हणजे तू ते आधी वापरुन पाहीलेस म्हणून)

तुझे अनूभव सांग कारण मी तो आणायचा विचार करतेय.


Moodi
Wednesday, September 06, 2006 - 4:31 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया खूप खूप धन्यवाद गं. आत्ताच मी तू दिलेल्या पद्धतीने मसाला केलाय, अतीशय सुंदर झालाय. मस्त वास सुटलाय त्याचा.
फक्त एकच बदल केला की तिखटाच्या ऐवजी अखंड लाल मिर्च्याच वापरल्या. तरी छानच झालाय. मिर्च्या की तिखट हे आपल्या आवडीनुसार ठरवायचे ना?

आता आमटी भाज्यांना चव येईल. आज मुहुर्त लागला एकदाचा.



Bee
Thursday, September 07, 2006 - 3:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उनो, मला अमेरिकेचे माहिती नाही. कदाचित मिळत असावेत पण थाईबद्दल माहिती नाही.

Shonoo
Friday, September 08, 2006 - 12:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी

मी कॉफ़ी कधी घरी दळत नाही. Gevalia किंवा डन्किन डोनट ची कॉफी पावडर वापरतो आम्ही.

मी तो ग्राइंडर फक्त मसाल्या करता ठेवलाय. वापरून झाला की, साफ करून १-२ दिवस झाकण न लावता, उघड्यावर ठेवते. मग झाकून काढून ठेवते. त्यामुळे पुढच्या वेळी वापरताना वास येत नाही. व्हिनेगर अथवा लिम्बाच्या रसानेही वास जाऊ शकेल.

माझ्याकडल्या ग्राइंडर चे भांडे लहानसे आहे. पण माझा मसाले करायचा आवाकाही तेव्हढाच आहे त्यामुळे मला ते बरे वाटते.


Moodi
Friday, September 08, 2006 - 12:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनु खूप धन्यवाद गं चटकन उत्तर दिल्याबद्दल. आम्ही पण विकतची कॉफी पावडरच वापरतो. तू सांगीतलेली कॉफी इथे मिळतेय का ते बघते. मागच्या शनीवारी मी कॉफी ग्राईंडर बघीतला अन मला आठवण आली. तो घेऊन ठेवेन आता.

ही खालची लिंक बघ, यात त्या व्यक्तीने तिळाचे लाडू करतांना तीळही भाजुन कॉफी ग्राइंडरमधून बारीक केलेत. म्हणजे मिक्सर जास्त वापरायला नको. मराठीच आहे तो.

http://thecookscottage.typepad.com/curry/sweet_tooth/index.html

Priya
Tuesday, September 26, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुडी, आत्ता पाहिला ग तुझा निरोप. झाला का मसाला वापरुन? :-) आणि लाल मिरच्या वापरायच्या असतील तर त्या तळुन घेतल्यास की नुसत्याच दळणात घातल्यास? मिरच्या तळल्या तर जास्त खमंग होतात.

Moodi
Tuesday, September 26, 2006 - 3:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

प्रिया अगं त्या तळूनच घेतल्या, खूप छानच वास आला मसाल्याचा. चव पण झणझणीत. त्या मिर्च्या इथल्याच दुकानातुन घेतल्यात तरी एकदम छोट्या आणि तिखट आहेत. लवंगी मिर्चीच्या आकाराच्या आहेत.

Priya
Tuesday, September 26, 2006 - 4:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आता पुढच्या वेळी तुला थोडा बदल करता येईल, तुमच्या आवडीप्रमाणे. रोजच्या जेवणासाठी जास्त तिखट वाटत असेल तर लवंगा वगळता येतील, दालचिनीही कमी करता येईल किंवा वगळता येईल. या गोष्टींचा स्वाद कमी करायचा नसेल तर खोबर्‍याचे किंवा तीळाचे प्रमाण थोडे वाढवलेस तरी चालेल.

किती केलास ग?


Moodi
Tuesday, September 26, 2006 - 4:24 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अगं तू दिलेस ना प्रमाण तेवढाच केला, फक्त तिखटा ऐवजी अख्ख्या मिर्च्याच घातल्या एवढाच बदल केला. आधी भरल्या वांग्यात अन मग आमटीत घातला, एकदम मऽस्त चव आली.

Bee
Wednesday, September 27, 2006 - 2:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आज हा बीबी अथपासून इतिपर्यंत वाचून काढला. खूप काही करुन बघण्याचा मोह आणि अपुरा वेळ.. तरीही वेळ काढण्याचा प्रयत्न करुन बघीन...

मूडी, जर पावकिलो शिल्लक केला असेल तर मला एक पॅकेट पाठवून दे..


Vj1
Wednesday, October 04, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

'कोन्द पापा, तिन्द परिहारा' chhan mhan ahe.. tumhi pun kanadi- marathi ki kay??

me Kanadi pun Punyat wadhalo, ashya kahi chhan mhani mahit astil tar mhanimadhe navin section ughada.. Prantiya eikyasathi..

Prarthana
Friday, November 10, 2006 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I LIKE THIS WEB SITE & "HITAGUJ" IN THAT

Prarthana
Friday, November 10, 2006 - 7:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

I WANT INGREDIENTS OF MAGGI MASALA

Ami79
Monday, April 02, 2007 - 7:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आले लसणाची पेस्ट करताना आल्याचे व लसणाचे प्रमाण किती ठेवावे?

Ami79
Monday, April 02, 2007 - 7:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इथे दिनेश यांनी एक मसाल्याची कृती दिली आहे.
/hitguj/messages/103383/46076.html?1161899369

Jagu
Wednesday, October 03, 2007 - 5:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बिर्याणी, पुलाव मसाल्याची रेसिपी हवी आहे.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators