|
Sauri
| |
| Saturday, October 20, 2007 - 7:37 am: |
| 
|
कूणाला बदामी हलवा बनवण्याची रित माहित आहे का?
|
Manuswini
| |
| Sunday, October 21, 2007 - 12:06 am: |
| 
|
हो माहीती आहे ना, तु US ला आहेस का? कारण मला इथे तरी आरारूट मिळाले नाही. मला हा पदार्थ करायलाच खुप आवाडतो. मेहनतीचे काम आहे हा हलवा बनवणे, plus थोडे कौशल्य आहे ह्यात. माझ्या घरी तरी आरारूट वापरून करतात तेव्हा ती रेसीपी देतेय. काही लोक मैदा वापरतात ती माहीती नाही. १ वाटी आरारूट घे. 1/2 वाटी शुद्ध तूप(वितळून घेतलेले), १ 1/4 वाटी बारीक साखर(इथील साखर granular असते तेव्हा confectioner sugar वापर, २ tbs लिंबू रस, blanch केलेले,साल काढलेले बदाम, पिस्ता, काजु, केसर आवडेल तो खायचा रंग(लाल,पिवळा,हिरवा) आरारूट मध्ये थंड पाणी घालून मध्यम पातळ paste कर, एकही गुठळी नाही पाहीजे, पाक : बाजूला साखरेत १ वाटी पाणी घालून पाक कर, गस मंद ठेव पाक करताना, हा एक तारी नी दोन तारी च्या मध्ये करायचा. म्हणजे बोटाला १ तारी लगत असताना थोड्या वेळाने गस बंद करायचा. साधारण १ तारी होत आला की लिंबू रस टाक. नी मग २-३ मीनीटाने गस बंद कर चांगले ढवळून. पाकातच रंग टाक अगदी शेवटी. केसर पण शेवटी टाक. रंग टाकून खुप उकळवू नये पाक. इथे बाजूला आता पुर्ण focus करून आरारूटचे paste ढवळायला घ्यायची, वितळलेले तूप टोपात घे जाड बुडाच्या, आरारूटचे paste टाकून अगदी मंदाग्नीवर ढवळत बसायचे. paste तूपात आळत येते नी तूप साधारण सुटत आले की,आता हळु हळु पाक टाकत सतत ढवळत जायचे. पारदर्शक दिसत येतो हळु हळु. सगळे Dry fruits टाक. पुर्ण तूप सुटत आले की मोठ्या पसरट थाळीत तूप लावून ठेवायचे नी ह्यात ह्या वड्या थापायच्या. पाकाची consistency ने लिंबू रसाचा ratio बरोबर असेल तर मस्त पार्दर्शक होतो. योग्य चिवत होतो. I lvoe this item a lot
|
Manuswini
| |
| Sunday, October 21, 2007 - 12:14 am: |
| 
|
आणखी एक इथे US ला काही लोक Corn flour म्हणजेच आरारूट सांगतात पण तसे नाही आहे ते. हे आरारूट पांढरे रंगाचे असते.
|
Sauri
| |
| Monday, October 22, 2007 - 7:12 am: |
| 
|
धन्यवाद, मनस्वीनी तू दिल्याप्रमाणे करुन बघते आणि कसा हलवा होतोय ते कळवते.
|
Dineshvs
| |
| Monday, October 22, 2007 - 12:55 pm: |
| 
|
Manuswini लिहिल्याप्रमाणे हलवाई हा अरारूट पासुन करतात. पण पारंपारिक रित्या तो गव्हाच्या सत्वापासुन करतात. एक वाटी सत्व असेल तर पाच वाट्या साखर लागते. तो चवदार होत असला तरी खुप वेळ घाटावा लागतो. साधारणपणे तामिळ लोकात दिवाळीला तो करतात. नाचणीचाही असा हलवा करता येतो. तो डोडोल या नावाने मी लिहिला आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|