|
Shonoo
| |
| Thursday, October 04, 2007 - 12:20 pm: |
|
|
कॉद्देल हा खास मंगळूरी प्रकार्- शेट्टी, सालियन, सुवर्णा, अमीन वगैरे लोकांची खासियत. प्रत्येक घरच्या रेसिपीमधे थोडा फरक असतोच. मी खाल्लेल्याची कृती अशी १ च च चणा डाळ १२ च च मूग डाळ १२ च च उडीद डाळ तिन्ही मंद आचेवर, कोरडं भाजून घ्यावे. ६-७ सुक्या मिरच्या (बेडगी असल्यास तीच घ्यावी) थोड्या तेलात भाजून घ्याव्या. त्याच तेलात २ टे स्पून धणे, एक टे स्पून जिरं अर्धा च चमचा मेथी आणि मोहरी प्रत्येकी, २ लवंगा ४-६ काळे मिरी अन २ दालचिनिचे तुकडे भाजून घ्यावेत. सगळं गार झालं की त्याची पूड करावी. सुरण बटाटा, गाजर, लाल भोपळा, दुधी भोपळा, कोहळा, मोट्ठी काकडी ( तवशे म्हणतात कोकणीत), वांगं, शेवग्याच्या शेंगा या भाज्या मुख्य( मग्गे अन चिबूड पण घालतात. पण त्यांना मराठीत काय म्हणतात ते मला माहीत नाही. दोन्ही काकडी, कोहळा याच फ़ॅमिलीतले प्रकार ) . बाकी गवार, फरसबी, तोंडली वगैरे घालतात कधी कधी, पण ते आपलं उगीच. या भाज्यांचे मोठे तुकडे करून ते पाण्यात क्रमा क्रमाने शिजवून घ्यायचे. सुरण, बटाटे अगोदर घालावेत. भोपळ्याचे सगळे प्रकार शेवटी. शिजत आले की थोडा मसाला शिवरावा. वाटीभर खोबरं कचकचीत वाटून घालावं. वाटी भर तूर डाळ शिजवून, घोटून घालावी. चिंचेचा कोळ, मीठ घालावं. चिंच जरा सढळ हाताने घ्यावी. उरलेला मसाला घालवा अन एक उकळी काढावी. मोहरी हिंग, कढीपत्ता, हळद, सुकी मिरचि घालून फोदणी करावी. आवडत असेल तर खोबरेल तेलात करावी फडणी. किंवा थोडं खोबरेल तेल वरतून घालावं. गरम गरम भाताबरोबर खावं. ताज्या पेक्षा दुसर्या दिवशीच जास्त छान लागतं.
|
Dineshvs
| |
| Thursday, October 04, 2007 - 3:44 pm: |
|
|
मग्गे ला मुंबईत आंबट काकडी किंवा सांबार काकडी म्हणतात. पिवळी चॉकलेटी नक्षी असलेली, लंबगोल काकडी असते ती. नुसत्या मग्गेची अशी भाजी चांगली लागते. सांबारातही घालता येते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|