|
Daad
| |
| Sunday, September 30, 2007 - 3:42 am: |
|
|
कैरीची आमटी एक मध्यम आकाराची साधारण पिकू लागलेली कैरी- साल काढून बाठ सोडल्यास दोन वाट्या तुकडे होतील इतकी. बाठही वापरायची. पाव वाटी गूळ दोन वाट्या ताजं किसलेलं खोबरं (किंवा एक वाटी खोबरं आणि १२ वाटी कोकोनट मिल्क पावडर) अर्धा टी स्पून मेथी दाणे, दोन टी स्पून मोहरी चवीनुसार तिखट (किंवा एखादिच सुकी मिरची + तिखट), मीठ तेल, तूप एका भांड्यात तुपावर मेथी टाकून थोडी लाल झाली की एखादीच लाल सुकी मिरची आणि मोहरी टाकावी. मोहरी तडतडायला लागली की हिंग टाकून आच बंद करायला हवी. ही फोडणी जळता उपयोगी नाही. मिरचीने खमंगपणा येतो पण नसल्यास नंतर तिखट घालायचं आहे. हे थंड होऊद्या. थोड्या तेल+ तुपावर कैरीच्या फोडी घालून, थोडा हिंग, हळद, तिखट घालून, थोड्याच परता. मग पाणी घालून शिजू द्या. पाणी फोडी बुडतिल इतक्यापेक्षा थोडं जास्तं असलं तरी चालेल. कैरीचा आंबटपणा उतरायला हवा पाण्यात. थंड झालेली वरची फोडणी, ओलं खोबरं ग्राईंडरमध्ये अगदी बारिक वाटून घ्या, गंधा sss सारखं! हे आधी करून फ़्रीजमध्ये ठेवता येतं. कैरी शिजल्यावर त्यात गूळ, मीठ घाला. गूळ विरघळला की त्यात कोकोनट मिल्क पावडर घेतली असल्यास ती थोड्या पाण्यात कालवून घाला. आता आच मंद करून, केलेलं वाटप लावा. आणि आमटी "फुटू"नये म्हणून ढवळत रहा. ही आमटी आंबट गोड करायची आहे. कैरीच्या आंबटपणानुसार मीठ आणि गूळ adjust करावं लागेल. सुंदर वासाचा भात, पोळी, पुरी कशाही बरोबर छान लागते. अतिशय महत्वाचं म्हणजे परत गरम करताना फुटू नये म्हणून मध्यम आचेवर ढवळत रहाणं आवश्यक आहे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|