|
Chakali
| |
| Tuesday, September 18, 2007 - 5:17 pm: |
|
|
नमस्कार, दुपारी चहाच्या वेळी कुरकूरीत खायला पालकाच्या पुर्या हा उत्तम पर्याय आहे. या पुर्या बनवायला सोप्या, तसेच टिकाऊ आणि चवीलासुद्धा छान लागतात. नक्की करून बघा http://chakali.blogspot.com/2007/09/palak-puri.html
|
Zakki
| |
| Tuesday, September 18, 2007 - 8:37 pm: |
|
|
दोन प्रश्न. १. कसुरी मेथी म्हणजे काय? साधी फ्रोझन मेथी टाकली तर? २. तेलाचे मोहन घालणे म्हणजे काय? ३. तेलकट खाण्यापेक्षा त्या पुर्या टोस्टर ओव्हनमधे नुसत्या भाजल्या तर? धन्यवाद.
|
Chakali
| |
| Tuesday, September 18, 2007 - 11:53 pm: |
|
|
नमस्कार Zakki १. कसूरी मेथी म्हणजे सुकलेला मेथीचा पाला. कसूरी मेथीचे पाकीट कुठल्याही ज़नरल स्टोर मध्ये 'ज़नरली' मिळेल, आणि US मध्ये असशील तर इन्डियन स्टोअर मध्ये. फ़्रोझन मेथी पण घालु शकशील, पण मेथी चविपुरतीच घालायची असल्याने, आणि पालकाची चव जास्त अपेक्षित आहे मला म्हणून कसूरी मेथी वपरल्यास चान्गले. आणि कसूरी मेथी चा वाळवल्यामुळे एक प्रकरचा वेगळा स्वाद असतो. पन जर तू फ्रोज़न मेथि वापरलीस तर रेसिपी कशी झाली ते सान्ग २.तेलाचे मोहन म्हणजे थोडे तेल कडक गरम करून पिठावर घालायचे, आणि मग बाकिचे जिन्नस टाकून पिठ मळायला चालु करायचे. हे मोहन घातल्याने पुर्या खुसखुशित होतात. याला मोहन का म्हणतात ते मात्र मला माहित नाही ३. अगदि चालेल. पण मी करून बघितले नहि. पुढच्यावेळी मी पुर्या करेन तेव्हा न तळता करून बघेन. पण तळून पदार्थ जास्त छान लागणारच!
|
Manuswini
| |
| Tuesday, September 18, 2007 - 11:58 pm: |
|
|
त्याला 'मोहन' का म्हणतात?? चकली, कारण ज्याने हा प्रकार सुरु केला त्या व्यक्तीचे नाव 'मोहन' होते. एव्हढी शींपळ गोष्ट कळत नाही, शीऽऽ. BTW अग झक्की हे जुने जाणते(वयाने) काका आहेत मायबोलीचे. 'तु' बरे दिसत नाही take it easy
|
Chakali
| |
| Wednesday, September 19, 2007 - 3:26 am: |
|
|
झक्की काका, माफ़ करा, तुम्हाला तू लिहल्याबद्दल. चू भू द्या घ्या मनू ताई, मी लिम्बूटिम्बू आहे म्हणून मला रगिन्ग कर्त्येस का? पण खरच, कोणाला महितेय का हा मोहन घालनरा मोहन कोण आहे ते?
|
Zakki
| |
| Wednesday, September 19, 2007 - 1:44 pm: |
|
|
अहो चकली, मलाच माफ करा. मला ना उद्योग ना धंदा. काही माकडांच्या हाती की बोर्ड दिला तर ते म्हणे अनेक वर्षांनी शेक्स्पियर सारखे लिहीतील. मी मात्र अनेक वर्षे की बोर्डवर बसून नुसतीच टिंगल टवाळी करत असतो. पण आता मला या BB वर जाऊ नका अशी सौ. ने सक्त ताकिद दिली आहे. कारण मी इथल्या कृति छापून तिच्या हातात देतो. 'मी इतकी वर्षे निरनिराळे पदार्थ करते ते आवडत नसतील, तर जा, तुमच्या मायबोलीकरांकडे. ते घालतील तुम्हाला खायला'! शिवाय केवळ मी मोठा आहे म्हणून आदराला पात्र होत नाही. मी मोठा असण्यात माझी काहीच कर्तबगारी नाही.
|
Arch
| |
| Wednesday, September 19, 2007 - 2:51 pm: |
|
|
ए, त्यात काय झाल तू म्हटल म्हणून? आपण काका मामांना नाही का तू म्हणत? पण झक्की मोठे असूनही सगळ्यांनाच आदरार्थी संबोधतात त्यामुळे त्यांना " आपण " म्हटलेल जास्त चांगल.
|
Zakki
| |
| Wednesday, September 19, 2007 - 9:53 pm: |
|
|
खरे म्हणजे his majesty , महाराज (म्हणजे आचारी नव्हे!) असेहि म्हंटलेत तरी चालेल!!
|
Runi
| |
| Thursday, September 20, 2007 - 2:34 pm: |
|
|
मी लिम्बूटिम्बू आहे म्हणून मला रगिन्ग कर्त्येस का? >>>> अरे देवा या लिंबु भाउ ने किती किती डुप्लीकेट आय्डी घेतलेत. LT दिवा घ्यालच.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|