|
Manjud
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:44 am: |
| 
|
हि काकडीची वेगळ्या चवीची कोशिंबीर आहे. फारच सुंदर लागते. साहित्य: - काकड्या २ टोकाचा कडू भाग काढून जाडसर चोचवून घ्याव्यात. आणि पाणि निथळवण्यासाठि फडक्यात बांधून ठेवाव्यात. डाळिंब १ / २ लाल आणि एकदम गोड, दाणे काढून घ्यावेत. भोपळी मिरची १ / २ बारीक लांबट तुकडे करून घ्यावी. दही अंदाजाने पण एकदम गोड हवं. मिरपूड, मीठ, साखर चवीप्रमाणे. काकडितलं पाणि पूर्ण काढून घ्या. दह्यातलं पाणि काढून ठेवावं. चक्कासदृश दही झालं पाहिजे. सगळे पदार्थ एकत्र करा आणि दहि (चक्का) घाला. मीठ साखर घातल्यावर कोशिंबिरीला पाणि सुटते. त्या बेताने दही घाला. हि कोशिंबीर तशी घट्ट असते.
|
Manjud
| |
| Wednesday, September 05, 2007 - 7:52 am: |
| 
|
या चवीची कोशींबीर देखिल खुपच छान लागते. लांब मोठी गावठी काकडी साल काढून किसून घ्या. पाणि पूर्णपणे काढून निथळवण्यासाठी किस पिळुन पाणि काढून टाका. लाल मोहरी १ / २ चमचा आणि दोन मिरच्या अगदी थोडं पाणि घालून मिक्सरमधून वाटुन घ्या. दही गाळण्यात घालून पाणि काढून चक्का करून घ्या. काकडीच्या किसात मीठ आणि मिरची मोहरीचं वाटण घाला. आणि मग दहि (चक्का) घाला. मीठ साखर घातल्यावर कोशिंबिरीला पाणि सुटते. त्या बेताने दही घाला. हि कोशिंबीर तशी घट्ट असते. ज्याना मोहरी चढणं किंवा लोणचं नाकात जाणं आवडतं त्याना हि कोशींबीर खुप आवडेल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|