|
Vishee
| |
| Thursday, August 23, 2007 - 7:11 pm: |
| 
|
वरीचे तांदुळ, बटाटा, तुप, जिरं, हिरव्या मिरच्या, मिठ, साखर, दाण्याचं कुट, थोडं आलं किसुन (हवच), ओलं खोब्रं ( optional ), कोथिंबिर बारिक चिरुन, आणि अर्थात पाणी. वरीचे तांदुळ पण शिजताना खूप फुलतात (रवा किंवा नेहेमीच्या तांदुळासारखे) त्यामुळे त्या अन्दाजाने घ्यावेत आणि त्या अन्दाजाने जरा जास्तच मिठ, साखर, मिरच्या घालाव्या. वरीचे तांदुळ आधी खरपुस वास येईपर्यंत भाजुन घ्यायचे. मग पातेलं gas वरुन खाली उतरवुन त्यात गार पाणी घालुन तांदुळ धुवायचे एकदा. मग तुप तापवुन त्यात जिरे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालुन मग बटाट्याच्या फोडी घालायच्या. जरा परतुन घ्यायचं. नंतर धुतलेले वरीचे तांदुळ घालुन थोडावेळ परतुन पाणी घालायचं. त्यात मीठ, साखर, दाण्याचं कुट आणि आलं किसुन घालायचं. ओला नारळ पण घालावा असल्यास. झाकण ठेवायचं मग शिजेपर्यंत. आधी दुप्पट पाणी घालावं, झाकण ठेउन एक वाफ आली की पहावं वरी शिजल्येय का ते. लागल्यास थोडं पाणी पुन्हा घालावं. शिजुन अगदी गोळा होईल एवढं पानी घालु नये. खाताना वरुन थोडं तुप आणि कोथिंबिर चिरुन घालायची.
|
Prady
| |
| Tuesday, October 16, 2007 - 8:56 pm: |
| 
|
एक बदल सुचवू का? आपण बटाटे नेहेमीच घालतो. बदल म्हणून भोपळ्याचे तुकडे घालावेत. कधी रताळ्याचे तुकडे घातले तरी छान लागतात. वाफेवर छान शिजतात आणी थोडा बदल. चव पण छान लागते.
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 17, 2007 - 12:00 pm: |
| 
|
याचा एक प्रकार म्हणजे वरीचे तांदुळ लालसर भाजुन, चौपट कोमट पाण्यात भिजवायचे. अधुन मधुन ढवळायचे. तासाभराने ते चाळणीवर निथळुन पुर्ण कोरडे करायचे. आणि मग वरच्याप्रमाणे परतुन घ्यायचे. हे तांदुळ वाफ़ेवर शिजतात, पाणी घालायची गरज रहात नाही. शिवाय अगदी मोकळे होतात. साबुदाण्याच्या खिचडीप्रमाणेच दिसतात.
|
Vishee
| |
| Friday, November 02, 2007 - 6:27 pm: |
| 
|
prady , भोपळा घालुन केला बरं उपमा ह्या वेळेस पण तो halloween साठी मिळतो तो आणलेला त्याला आपल्या भोपळ्यासारखी चव नव्हती ( in fact काहीच चव नव्हती). त्यामुळे आता नेहेमीचा लाल भोपळा आणला की पुन्हा करेन. good suggestion. आणि दिनेशदा, वरी पण मी भिजवुन ठेवलेली पण मग भोपळ्याच्या फोडी घातल्यावर लक्षात आलं, अरे ह्या कशा शिजतील वाफेवर? त्यामुळे पाणी घातलच थोडं.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|