|
Chioo
| |
| Tuesday, February 28, 2006 - 5:45 pm: |
| 
|
अंडे फ़ोडलेले असले तरी त्यातला yolk म्हणजेच पिवळा बलक फ़ुटलेला हवा. तो तसाच अख्खा गोल राहिला तर अचानक फ़ुटतो. मग काय होइल याची कल्पना करावी.
|
Milindaa
| |
| Tuesday, February 28, 2006 - 6:05 pm: |
| 
|
पब्लिक, आता नवीन ठिकाणी परत एवढे आर्काईव्हज तयार करु नका. नंतर त्यात कोणीही शोधत नाही आणि साफसफाईचे काम वाढते. तुम्ही त्या त्या बीबी वर रेसिपी लिहून इथे लिंक का देत नाही ?
|
Moodi
| |
| Tuesday, February 28, 2006 - 6:11 pm: |
| 
|
प्रज्ञा अन चंद्रिका मेल केलीय.
|
Chandrika
| |
| Tuesday, February 28, 2006 - 8:07 pm: |
| 
|
Thank you Moody ani Prady. Recipe miLali. Chhan ahe. Karun baghen lavakarach.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 02, 2006 - 4:20 pm: |
| 
|
ह्या कृति माय्क्रोवेव्ह ओव्हनचे कौतुक म्हणुन लिहितोय. ओव्हन न वापरताहि करता येतात. मालवणी फ़िश करी. २५० ग्रॅम पापलेट किंवा तत्सम मासा साफ करुन घ्यावा. चार पाच कोकमं अर्धा कप पाण्यात भिजत घालावी. एक कंदा बारिक कापुन घ्यावा. ३ हिरव्या मिरच्या ऊभ्या चिरुन घ्याव्यात. चार सहा लसुण पाकळ्या, अर्धा चमचा तांदुळ, एक टेबलस्पुन जरा भाजलेले धणे व एक टिस्पुन जिरे, चार मिरीदाणे व अर्धा कप ओले खोबरे, थोड्या पाण्यात बारिक वाटुन घ्यावे. त्यात एक चमचा लाल तिखट घालुन परत वाटावे. एक टेबलस्पुन तेल २० सेकंद गरम करावे, त्यात कांदा घालुन एक मिनिट हाय वर ठेवावे. मग त्यात वाटण घालुन तीन मिनिटे हाय वर ठेवावे. अधुन मधुन ढवळावे. मग त्यात कोकमाचे पाणी, एक कप पाणी, हिरव्या मिरच्या, मीठ व माश्याचे तुकडे घालावेत. पाच ते सहा मिनिटे हाय वर ठेवावे. वरुन कोथिंबीर पेरावी. गोवानीज प्रॉन करी लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ काढुन घ्यावा. एक कप नारळाचे दुध तयार ठेवावे. कोलंबी सोलुन साफ करुन घ्याव्या. सोलल्यावर २५० ग्रॅम झाल्या पाहिजेत, ईतक्या घ्याव्यात. अर्धा ईंच आले, पाच सहा लसुण पाकळ्या, एक टेबलस्पुन जरा भाजलेले धणे व एक टिस्पुन जिरे, एखादी लवंग वाटुन घ्यावे. एक टेबलस्पुन तेल २० सेकंद गरम करावे. त्यात चिमुटभर मेथीदाणे, एक बारिक कापलेला कांदा, दोन तीन ऊभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालुन दोन मिनिटे हाय वर ठेवावे. मग त्यात वाटण आणि हळद घालुन परत दोन मिनिटे हाय वर ठेवावे. त्यात प्रॉन्स व कोळ मिसळुन ५ मिनिटे हाय वर ठेवावे. मीठ व नारळाचे दुध घालुन दोन ते तीन मिनिटे लो वर ठेवावे. वरुन कोथिंबीर पेरावी. हरियाली चिकन कबाब. सहा सात लसुण पाकळ्या, एक ईंच आले, ३ हिरव्या मिरच्या, कपभर कोथिंबीर, पुदिन्याची पाने अर्धा कप, एक चमचा हळद, एक चमचा गरम मसाला व दहा बारा काजुगर एकत्र वाटावेत. त्यात थोडा हिरवा रंग घालावा किंवा पालकाची काहि पाने वाटणात घ्यावीत. ६०० ग्रॅम चिकन पिसेस यात दोन तास मुरवत ठेवावेत. अगदी आयत्यावेळी त्यात एक अंडे फ़ेटुन घालावे व ५० ग्रॅम फ़्रेश क्रीम घालावे. नीट मिसळुन हे पिसेस आठ ते दहा मिनिटे हाय वर ठेवावेत. अधुन मधुन परतावेत. सुटलेला रस निथळु द्यावा. परत काहि सेकंग ग्रिल करावेत. Pineapple Chiken हा एक कमी मसालेदार, गोडसर प्रकार. १५० ग्रॅम बोनलेस चिकन घ्यावे. एक अंडे, एक टेबलस्पुन प्रत्येकी मैदा व कॉर्न फ़्लोअर, मीठ व मिरीपावडर एकत्र करुन त्यात हे तुकडे घोळवुन घ्यावेत. थोडे पाणी घालावे लागेल. प्रत्येकी एक कांदा, टोमॅटो व सिमला मिरची यांचे मोठे मोठे तुकडे करुन घ्यावेत. एक टेबलस्पुन तेल २० सेकंद गरम करावे. त्यात चिकन पिसेस घालुन ४ मिनिटे हाय वर ठेवावे. त्यात टीनमधल्या अननसाच्या ३ चकत्यांचे तुकडे व त्यातला एक कप ज्युस, कांदा, टोमेटो व सिमला मिरचींचे तुकडे, अर्धा कप टोमॅटो केचप, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ व मिरीपावडर मिसळुन घ्यावे. एक टेबलस्पुन कॉर्न्फ़्लोअर थोड्या पाण्यात मिसळुन तेहि त्यात ओतावे. नीट ढवळुन चार ते पाच मिनिटे हाय वर ठेवावे. अधुन मधुन ढवळावे.
|
Mai
| |
| Sunday, March 05, 2006 - 11:45 pm: |
| 
|
माय्क्रोवेव मध्ये बेसनाचे लाडू होतात छान मी करते नेहेमी मस्त होतात जसे कढयीत भाजतो आपण तसेच बेसन भाजणे. फक्त दोन दोन मिनिटानी हलवणे.
|
Milindaa
| |
| Monday, March 06, 2006 - 11:27 am: |
| 
|
माय्क्रोवेव मध्ये बेसनाचे लाडू होतात छान फक्त दोन दोन मिनिटानी हलवणे <<< आणि मग आतमध्ये लाडू कोण वळतं ?
|
milindaaaa!!!!!!.. .. .. .. ..
|
Mai
| |
| Monday, March 06, 2006 - 11:43 pm: |
| 
|
हा, हा, हा, मिलिन्दा, ही बी बी रेसिपीजची आहे पीजे ची नाही
|
Shonoo
| |
| Tuesday, March 28, 2006 - 1:07 pm: |
| 
|
माई मायक्रो वेव्ह मधे बेसन लाडु करायची for Dummies रेसिपी देणार का प्लीज? किती बेसन, किती तूप, किती वेळ भाजायचे, साखर किती आणि केंव्हा घालायची, अमेरिकेत मिळते ती साखर पण दळून घ्यावी लागते का? काही लोक बेसनाबरोबर थोडा रवा पण घालतात तो किती आणि कधी घालायचा माझ्या लेकीला फार आवडतात्- आजी चा फोन आला की दर वेळेला लाडू मागते.
|
Mai
| |
| Wednesday, March 29, 2006 - 12:55 am: |
| 
|
आपण जेव्ह्ढे साहित्य नेहमीच्या बेसन लाडवान्करिता घेतो तेवढेच घ्यायचे. जर बेसन ४ वाट्या असेल तर एक ते दिड वाट्या तूप घेऊन काचेच्या भान्ड्यात २-२ मिनिटे हाय वर भाजावे. अन्दाजे ८-१० मिनिटात ख़मन्ग भाजून होते. बेसन कोमट झाल्यावर पिठिसाखर घालुन त्यात वेलची पावडर, ज़ायफळ काजु व बेदाणे घालुन लाडु वळ्णे. If you don't have pithisaakhar, you can use castor sugar instead !
|
Meenu
| |
| Friday, June 16, 2006 - 3:33 pm: |
| 
|
इथे दिलेल्या पाककृती OTG वापरुनही करता येतात का ...? त्यावेळी साधारण काय बदल करायला लागेल ..?
|
चांगला मायक्रोवेव्ह ओव्हन कोणता?
|
hello माझ्या कडे LG चा microwave आहे. मला त्या मधे भात वरण बनवायचा आहे. एका व्यक्तिला पुरेल इतका. भात आणि वरण किति वेळ ठेवायच microwave मधे? पाणि किति घालायचं?
|
Dineshvs
| |
| Friday, February 23, 2007 - 8:00 am: |
| 
|
अरुंधति, मायक्रोवेव्हमधे वरणभात करण्याचा सल्ला मी देणार नाही. डाळ मनासारखी शिजत नाही. तसेच बोल जर मोठा वापरला नाही तर सगळे फ़सफ़सुन बाहेर येते. तरिही साधारण कपभर तांदळाचा भात दहा मिनिटात होतो. अर्धी वाटी डाळ शिजायला १२ मिनिटे लागतात. ( बाहेर थेट गॅसवरहि तितकाच वेळ लागतो. ) हे दोन्ही आधी अर्धा तास भिजत घातले तर चांगले शिजतात. तांदुळ आणि डाळीच्या प्रतीवरहि वेळ अवलंबुन असतो. काहि तांदुळ बारिक दिसले तरी शिजायला वेळ लागतो. वरणभाताला प्रेशर कुकर किंवा राईस कुकरच योग्य आहे. ओव्हनबरोबर मिळालेल्या कुकबुक मधे पाण्याचे वैगरे नेमके प्रमाण दिलेले असते.
|
hello दिनेश. thank you very much मझा अन्दाज होता कि microwave मधे कमि वेळ लागेल. anyways thanks for information.
|
Dineshvs
| |
| Friday, February 23, 2007 - 3:49 pm: |
| 
|
अरुंधति, बाहेर गुजराथी पद्धतीची खिचडि करुन, ती फ़्रीजमधे ठेवुन, त्यातली रोज थोडी मायक्रोवेव्ह मधे गरम करुन खाल्ली तर वरणभाताचे सुख मिळते. ईथेच थोडक्यात कृति लिहितो. एक पेला बारिक तांदुळ व एक पेला मुगडाळ एकत्र धुवुन अर्धा तास भिजवावे. मुठभर शेंगदाणेहि भिजवावेत. तेलाची हिंग जिरे घालुन फ़ोडणी करावी. त्यात पाव कप मेथीदाणे घालुन गुलाबी परतावेत. त्यात चमचाभर मिरीदाणे जरा ठेचुन घालावेत किन्वा दोन तीन लाल मिरच्या घालाव्यात. शेंगदाणे घालावेत. मग त्यात पाच पेले पाणी ओतावे. हळद घालावी. पाण्याला उकळी फ़ुटली कि डाळ तांदुळ निथळुन वैरावेत. मीठ घालुन मऊसर शिजवावे. हा प्रकार थंड करुन फ़्रीजमधे ठेवावा. रोज यातली थोडी खिचडि बोलमधे घेऊन, ३ ते ५ मिनिटे मायक्रोवेव्ह करावे. वरुन तुप वा गुजराथी कढी घ्यावी.
|
Arch
| |
| Friday, February 23, 2007 - 4:08 pm: |
| 
|
३ ते ५ मिनिटे मायक्रोवेव्ह करावे.>> दिनेश, इतका वेळ गरम करायला ठेवली तर ती खिचडी कडकडीत होऊन जाईल न.
|
Dineshvs
| |
| Friday, February 23, 2007 - 4:15 pm: |
| 
|
आर्च, हि खिचडी फ़्रीजमधे ठेवलेली आहे, म्हणुन ईतका वेळ. शिवाय हि पातळहि असते. पाणी जास्त असते. एक वाडगाभर खिचडीला ईतका वेळ लागतो. थॉ करुन घेतली तर कमी वेळ लागेल. माझा रोजचा प्रयोग आहे हा.
|
Mumbai12
| |
| Tuesday, April 10, 2007 - 7:02 pm: |
| 
|
साबुदाणा खिचडि( for 1 people ) साबुदाणे १५-२० min पाण्यात भिजत ठेवा मग राहिलेले पाणि कधुन साबुदाणे ४-५ तास भिजत ठेवा नंतर साबुदाणे मीठ आणि शेंगदाण्याचा कुट घालुन चांगले mix करावे. bowl मधे तुप ३० sec high वर गरम करावे or till it melt मग त्यात मिरचि जिर घालुन ३० sec ठेवा . मग साबुदाणे mircrowave मधल्या bowl मध्ये घालुन नीट mix करावे. हे मिश्रण ३ ते ४ min high वर microwave मधे ठेवा . पहिली २ मिन झाले की एकदा साबुदाणे हलवुन घ्यावे.मग परत १ किंव्हा २ min ठेवा . झाली खिचडि तयार.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|