|
Dineshvs
| |
| Monday, July 09, 2007 - 6:11 pm: |
|
|
काळी गोल, कमी बिया असलेली वांगी दोन ते तीन घ्यावीत. त्याच्या फ़ोडी करुन मिठाच्या पाण्यात घालाव्यात. एवढ्या वांग्यासाठी दोन कप पोहे घ्यावेत. एखादा कांदा बारिक चिरुन घ्यावा. दोन चमचे चिंचेचा कोळ तयार ठेवावा. तेलाची हिंग मोहरी घालुन फ़ोडणी करावी. त्यात बारिक चिरलेला कांदा परतावा.कांदा लाल झाला कि वांग्याच्या फोडी घालाव्यात. त्यावर हळद, लाल तिखट व एक चमचा काळा मसाला घालावा. जरा परतुन. त्यावर चिंचेचा कोळ घालावा. झाकण ठेवुन वांगी शिजु द्यावीत. तोवर पोहे धुवुन घ्यावेत. वांगी शिजली आणि तेल सुटले कि पोहे घालावेत. मीठ घालावे. थोडी साखर घालावी. चांगले ढवळुन एक दोन वाफा आणाव्यात. यात बटाट्याच्या फोडी किंवा मटारदाणेही घालता येतील. हे सगळे वांग्याबरोबरच घालावे. वरुन हवे तर ओले खोबरे आणि कोथिंबीर शिवरावी.
|
Deepa_s
| |
| Tuesday, July 10, 2007 - 11:37 am: |
|
|
धन्यवाद दादा. आता करून बघेन.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|