|
Dineshvs
| |
| Friday, July 06, 2007 - 5:02 pm: |
|
|
आपल्या शंकरपाळ्याची व्युत्पत्ति मला वाटते शक्करपार्यापासुन झाली होती. असो हा आपला एक जुना पदार्थ. म्हंटला तर सोपा, पण भाजण्याचे तंत्र मात्र जमले पाहिजे. पाऊण वाटी साजुक तूप परातीत घेऊन ते खुप फेसावे, फेसल्यावर ते अपारदर्षक होते. मग त्यात एक वाटी पिठीसाखर घालुन परत हलके होईस्तो फेसावे.त्यात थोडी वेलची जायफळ पुड घालुन जरा फ़ेसावे. पाव चमचा खायचा सोडा घालुन फ़ेसावे आणि मग त्यात दोन वाट्या जाडसर कणीक घालुन फ़ेसावे. कणीक हळुहळु मिसळत जावी. सगळी कणीक घालुन झाली कि कणकेचा गोळा तयार होईल. तो एकत्र करुन घ्यावा. हलक्या हाताने मळुन घ्यावा. तो दोन तीन तास झाकुन ठेवावा. मग त्याची जाडसर पोळी लाटुन तूप लावलेल्या ताटात पसरावी. त्याच्या चौकोनी वड्या कापाव्यात. प्रत्येक वडीवर चारोळी वा इतर सुकामेवा दाबुन बसवावा. मग अगदी कमी तपमानावर खमंग वास सुटेपर्यंत या वड्या भाजुन घ्याव्या. सोनेरी रंग येतो. यात वड्यात पाणी नसल्यामुळे भाजताना लक्ष ठेवावे लागते. लवकर भाजल्या जातात.
|
Arch
| |
| Saturday, July 07, 2007 - 5:18 am: |
|
|
Thanks दिनेश. आईची आठवण आली. आई खूप सुरेख करायची ह्या वड्या. लंगडीवर खालती वरती निखारे ठेऊन भाजायची. आम्ही लहान असताना घरात oven नसायचा.
|
Dineshvs
| |
| Saturday, July 07, 2007 - 4:38 pm: |
|
|
आर्च, खालीवर निखारे हे आता फक्त कल्पनेतच. त्याकाळी बायकांचा अंदाज इतका अचुक असायचा, कि ती खास चव प्रत्येकवेळी यायची. मी या वड्या दोन नॉन स्टिक फ़्राईंग पॅन घेऊन करतो. अगदी मंद गॅसवर एक बाजु करुन घ्यायची आणि मग दुसरे पॅन पालथे घालुन झटकन उलटे करायचे. या पद्धतिनेही चांगल्या होतात.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|