|
आवळ्याच्या सरबताची क्रुती कोणी दे ईल का
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 03, 2007 - 4:33 pm: |
| 
|
दोन्ही प्रकारचे आवळे उकडुन त्याचा गर हाताने कुस्करुन घ्यायचा. पिळुन त्याचा रस काढायचा. चवीप्रमाणे साखर, मीठ व आल्याचा रस घालायचा. वासाला वेलचीपुड वा केशरही घालता येईल. कच्च्या आवळ्याचे म्हणजे आवळे न उकडता केलेल्या आवळ्याचे सरबत मला आवडते. पण त्याला जरा तुरट चव येते, त्यामुळे सगळ्यानाच आवडेल असे नाही. असे सरबत करताना आवळे नुसते किसुन वा ठेचुन रस काढला तरी चालतो. आवळ्याच्या सरबतात साखरेच्या जागी मध घातला तर आणखी छान चव येते.
|
Dineshvs
| |
| Monday, December 10, 2007 - 12:59 pm: |
| 
|
आवळा टिकवण्यासाठी सरबतापेक्षा मोरावळा चांगला. आवळा सुपारी पण चांगली.
|
Bedekarm
| |
| Saturday, June 28, 2008 - 7:41 am: |
| 
|
एक किलो आवळे बेताचे शिजवायचे. बिया काढून आवळ्यान्च्या फ़ोडी करायच्या. हाताने आवळ्याच्या नैसर्गिक रचनेप्रमाणे लांबट फ़ोडी होतात. फ़ोडींमधे पाऊण किलो पिठीसाखर घालायची. दोन दिवसांनी त्याला भरपूर रस सुटतो. चाळणीवर गाळून रस बाजूला करायचा. त्यात थोड आल्याचा रस थोडे मीठ घालायचे. बाटलीत भरून ठेवायचे. फ़्रीज मधे हे सरबत टिकते. यात एक भाग हे सरबत व दोन भाग पाणी घालून पिता येते. आवळ्याच्या फ़ोडि उन्हात सुकवून , सात ते आठ उन्हे द्यावीत, बरणीत भरून ठेवाव्यात. याही फ़ोडी टिकतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|