|
Dineshvs
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:29 pm: |
| 
|
आपण जी भेंडी खातो त्यापेक्षा वेगळी म्हणजे जरा जाड व बुटकी भेंडी आफ़्रिकेत मिळते. त्याचे सुप आफ़्रिकेत खुप लोकप्रिय आहे. ते करतात तो प्रकार खुप वेळखाऊ आहे. हे जरा सोपे व्हर्जन. आठ दहा कोवळ्या भेंड्या घेऊन त्याचे पातळ काप करुन, त्याला जरा मीठ लावुन ठेवावे. एखादा लहान कांदा उभा चिरुन घ्यावा. ( आफ़्रिकेत कांदा वापरत नाहीत, पण ते बीफ़ वैगरे वापरतात. ) दोन मोठे टोमॅटो उकळीच्या पाण्यात टाकुन, लगेच गार पाण्यात टाकुन सोलुन घ्यावेत. मग बारिक चिरुन घ्यावेत. टिनमधले स्वीट कॉर्न ( क्रीम स्टाईल ) दोन चमचे घ्यावे. ( आफ़्रिकेत ताजे मक्याचे दाणे वापरतात. पण ते शिजवण्यात खुपच वेळ जातो ) तेल तापवुन त्यात एखादी लसणीची पाकळी घालावी. मग त्यात भेंडीचे काप सोनेरी रंगावर कुरकुरीत तळुन घ्यावेत. बाहेर काढुन कांदा सोनेरी रंगावर परतावा. त्यात बारिक चिरलेले टोमॅटो परतुन घ्यावेत. मग त्यात तीन चार कप पाणी घालुन उकळु द्यावेत. मका घालावा. अर्धे भेंडीचे तुकडे घालावेत. नीट उकळु द्यावे. चवीनुसार मीठ मिरी घालावे. व पिताना वरुन उरलेले भेंडीचे काप घालावे. मी मक्या ऐवजी बटाटा वापरला होता. तसेच थोडे कोकमाचे आगळ घातले होते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|