Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through May 15, 2007

Hitguj » Cuisine and Recipies » विविधा » मुलांचे खाणे » लहान बाळांसाठी खाद्य » Archive through May 15, 2007 « Previous Next »

Robeenhood
Friday, February 09, 2007 - 3:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

French Fries तर अगदी आवडीने खात असत. अजूनही खातातच म्हणा.

>>>आता बाळाची आईच फ्रेंच फ्राईजच्या शर्यतीत असेल तर काय होणार?

Manuswini
Friday, February 09, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बटाटा चालु शकतो नक्कीच भाची अनुभव..

तिला आम्ही ३ ते ४ वाजता मध्ये दही आणी उकडलेला बटाटा mashed करुन भरवायचो.
त्यांच्यानंतर वाजता भरवले तर पोटाला gas होवु शकतो असे डॉकटरचे म्हणणे.
बहिण अगदी किंचीत जिरा पुड टाकायची.
हा प्रकार उन्हाळ्यात सुरु कर आता थंडीत माहीत नाही ते दही खावु शकते का?


Storvi
Friday, February 09, 2007 - 8:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

न दिलेला बरा.. बटाट्या पेक्षा इतर भाज्या आहेत की त्या द्याव्या... भोपळा, beans , मटर वगैरे.. बटाट्या पेक्षा रताळे बरे... आणि jam द्यायला हरकत नाही पण इत्क्या लहान वयात एवढी साखर कशाला द्यायची? आणि विकतचा jam असेल तर त्यात इतरही काही बाही असते... त्यापेक्षा फ़ळं उकडुन puree करून पोळीत भरावीत. किंवा तुप मीठ घालावे मस्त लागते अशी पोळी. थंडीच्या दिवसात तुप गुळ पण चालतो, साखरे पेक्षा गुळ बरा. फ़क्त फ़ार देऊ नये, नाहीतर उष्ण पडेल...

आणि दही देऊन पहावे, त्रास नाही झाला तर द्यावे. दह्याने खोकला सर्दी होऊ शकते. मी थंडीच्या दिवसात दह्याचे नावही नाही काढत. अंबट नसेल तर सर्दी नाही होणार मात्र.



Bee
Saturday, February 10, 2007 - 9:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hmmm... छानच माहिती अर्थात अनुभव सांगितले सर्वांनी...

शिल्पा thanks गं.. मला तुझे पोष्ट खूप अपेक्षित होते..

सर्वांचेच आभार..


Bee
Saturday, February 10, 2007 - 9:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिल्पा, रताळ इडलीसारखं घशात अडकत नाही का? भोपळा नक्की कसा द्यायचा? लहान बाळाला द्यायचे आहे म्हणून सर्व माहिती काढूनच देणार आहे..

Shonoo
Friday, February 16, 2007 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी
रताळं, लाल भोपळा, फरासबी, पालकाची पानं, हिरवे वाटाणे, सफरचंद, pears वगैरे सर्व प्रकार प्रेशर कूकर मधून शिजवून, mash करून देता येतात. वर्ष पूर्ण होईपर्यंत मीठ घालू नये म्हणाले होते माझ्या मुलांचे डॉक्टर. दहा-अकरा महिन्यांवर मुलांना मौ गोष्टी आपल्या हाताने खाऊ द्याव्यात. इडलीचे, पोळीचे छोटे तुकडे, उकडलेल्या भाज्यांचे छोटे तुकडे प्रेमाने खातात. पण खाताना लक्ष ठेवावेच लागते.


Shilpag
Wednesday, March 14, 2007 - 4:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार मंडळी
बाळ ५.५ ते ६ महिन्याचे होईस्तोवर
breast feed हाच पोषक आहार असतो हे आज काल सगळेच Doctor आणि TV सांगतोच, पण तरीही आपल्याला वाटत की बाळ ४ महिन्याचे झाले की त्याला top feed द्यायाला हवे. पण माझ्या अनुभवावरुन सांगते की तुमच्या बाळाला ५ महिन्यानंतरच top feed देण्याचा विचार करा. ५ महिन्यानंतर त्याला हळुहळु भाताची कांजी, डाळीचे पाणी, नाचणीचे सत्व, रव्याची पेज, चिकु, केळ, पपया. ९-१० महिन्यानंतर मऊ वरण भात, टोमटो, बीट, गाजर सूप, उकडलेल्या आपण पाव्-भाजी घालतो त्या(सिमलामिरचि सोडुन सगळ्या) भाज्या द्यायला हरकत नाही. बाळ १.५ वर्षाचे झाले की त्याला आपण खातो ते सर्व द्यायला हवे. junk food, chocolates, biscuite शक्यतो टाळा.

Dineshvs
Wednesday, March 14, 2007 - 10:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Shilpag, esp for your baby !!!
लहान मुलांसाठी एक खास पदार्थ.
एक वाटी भट्टीत फ़ुलवलेले पोहे. ( नाही मिळाले तर साधे जाड
पोहे चालतील. काहि ठिकाणी ज्वारीचे पोहे मिळतात, ते घ्यावेत. )
एक मोठा चमच्या भाजलेल्या शेंगदाण्याचे कुट किंवा पंढरपुरी
डाळ्यांचे पीठ. एक चमचा पिठी साखर, चिमुटभर मीठ, एक मोठा
चमचा साजुक तुप.

लोखंडाच्या कढईत साजुक तुप गरम करावे. ते पातळ झाले कि लगेच
त्यात पोहे व मीठ टाकुन परतावे. पोहे कुरकुरीत झाले कि गॅस बंद करावा
मग त्यावर पिठीसाखर शिवरुन ढवळावे. मग दाण्याचे कुट वा डाळ्यांचे पिठ
घालुन मिसळावे.

यावर स्वादासाठी खालील घटकांपैकी एक घटक चिमुटभर घालावा.

सैंधव, चाट मसाला, सुंठ, वेलची पुड, दालचिनी पुड, जिरेपुड, हिंग,
मिरपुड. धणेपुड, बडीशेप पुड, बाळशेप पुड, ओवा पुड ( सगळे गरम मसाले
आयत्यावेळी गरम करुन, त्याची पुड करुन वापरावी. )
तयार ईसेन्स पैकी अननस, आंबा, केशर ईत्यादींचे वापरता येतील

लहान मुलाना संध्याकाळी वा सकाळी हे खायला द्यावे. वरिल प्रमाण
एका बाळासाठी पुरेसे आहे.
आज नेमका कुठला स्वाद वापरलाय ते आवर्जुन सांगावे. ( शक्यतो खाऊन
झाल्यावरच सांगावे. ) प्रत्येकवेळी स्वाद बदलावा. वासाची आणि
घटक पदार्थाची सांगड घालायला शिकवावे. जर एखादा स्वाद परत
वापरला तर तो ओळखता आला पाहिजे.

बघा बरं प्रयोग करुन.



Shilpag
Wednesday, March 14, 2007 - 10:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजी, मी हे नक्की करुन पाहीन.
शौनकला चवीचीही ओळख होण्यास मदत होइल.
खूप धन्यवाद


Gajeetha1
Friday, March 16, 2007 - 2:46 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

hi,
i have a son of 5 yrs old...
he likes to eat chicken...but i am vegiterian n i dont cook non veg at home...so whenever we dine outside he happily eats his fav food...

but now a days it seems that he is avoiding vegi diet.. n wants his fav food all the time..
Is it really a cause to worry?

do u have any suggestions regarding this matter?

Visoba_khechar
Friday, March 16, 2007 - 3:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घरगुती गावठी उपाय!

but now a days it seems that he is avoiding vegi diet.. n wants his fav food all the time..
Is it really a cause to worry?

do u have any suggestions regarding this matter?

कानाखाली दोन आवज काढून आमचा बाप म्हणाला असता, "भोसडीच्या घरचं अन्न गिळायला तुझ्या घशात काय काटे आहेत का? चुपचाप घरचं पानात पडेल ते खा, नाहीतर रहा उपाशी! हे तुझे चिकन खायचे लाड रोज रोज पुरवले जाणार नाहीत!"

लहानपणी आम्ही आमच्या बापाच्या हातचा असा वेळोवेळी भरपूर मार खाल्ला आहे. आता आमचा बाप या जगात नाही. वारला बिचारा. पण आजही त्याने यावं आणि आमच्या दोन कानफटात माराव्यात असं उगिचंच वाटतं आणि जीव हळवा होतो! ;)

लहानपणी त्या माराचा खूप राग यायचा. पण त्या थोबाडीचं महत्व आणि त्यामागचं ममत्व आज कळतंय!

आपला,
(गाल रंगलेला!) तात्या.

ता क -

गजीथा १,

वरील उपाय आम्ही आपणास सुचवत नाही. आम्ही फक्त आमच्या बापाने काय केलं असतंन एवढंच सांगितलं! ;) हल्लीच्या सुजाण पालकत्व, पालक-मुलं सुसंवाद, वगैरे वगैरे फालतू थेरांच्या गदारोळात गाल रंगवायचे हे जुने, घरगुती, गावठी उपाय रुचणं थोडं कठीण आहे. हल्ली ते मुलांचं कौन्सिलींग का काय ते म्हणतात ते करतात म्हणे! ;)

आपला,
(लहानपणी माराच्या भितीने अनेकदा चड्डी ओली झालेला!) तात्या.

Deepa_s
Saturday, May 12, 2007 - 6:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्या साडेचार महिन्याच्या बाळाला मला साळीच्या लाह्यांच पाणी द्यायच आहे. ते उन्हाळ्यात थन्डावा देतं अस ऐकलं आहे. पण ते कसं बनवायच माहित नाही. कृपया सान्गा.

Bee
Monday, May 14, 2007 - 8:21 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एका वर्षाच्या बाळाला केलॉगचे corn flakes दिले तर चालतात का? मी माझ्या बहिणीला तिच्या लेकीला द्यायला सांगितले आहे. तिने ते आणलेतही. पण इथे एकदा विचरून बघावे असे वाटले..

तसेच मी तिला complain दे असे सुचविणार आहे. चालेल का इतक्या लहान बाळला complain दिले तर?


Bhramar_vihar
Tuesday, May 15, 2007 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार, माझी लेक ७.५ महिन्याची आहे. कालच चेक अप केले तेव्हा डॉक्टर म्हणले की calcium थोडे कमी आहे. एखादा आहार सुचवु शकता का की ज्यायोगे कॅल्शिअम भरपुर प्रमाणात मिळेल? आगाउ धन्यवाद!

आणि ती गायब मूडी कुठे आहे बरं


Psg
Tuesday, May 15, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दीपा, साळीच्या लाह्या पाण्यात भिजव २-३ तास. त्या मऊ होतील. मग पाणी गाळण्यातून गाळ, गाळण्यात लाह्या येतील, त्याही चुरड, त्याचं सत्वही पाण्यात येईल. चवीसाठी लागलीच तर साखर घाल, पण बाळ नुसतं पीत असेल हे पाणी तर तसच दे. खूप पौष्टिक असतात साळीच्या लाह्या.

बी, हरकत नाही cornflakes द्यायला, पण बाळ बाकी सगळे खात असेल, तर अजून थोडे दिवस जाऊदे मधे. तेच complan बद्दल. दूध एरवी व्यवस्थित पीत असेल तर वरून काही चव वाढवणे टाळावे. एकदा का अश्या flavours ची सवय लागली की मुलं साधं दूध पीत नाहित, तेव्हा शक्य असेल तर देऊ नये.

भ्रमा, calcium tonic दिले नाही डॉक्टरने काही? दूधात calcium असते. गायीचे दूध उत्तम. दूध पीते ना २ वेळा व्यवस्थित?


Bee
Tuesday, May 15, 2007 - 5:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम धन्यवाद, सूचना दिल्याबद्दल..

Bhramar_vihar
Tuesday, May 15, 2007 - 6:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम, कॅल्शिअम टॉनिक आहेच. पण त्याव्यतिरिक्त काही??

Deepa_s
Tuesday, May 15, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम धन्यवाद. असं पाणी देऊन बघेन.

Zakasrao
Tuesday, May 15, 2007 - 6:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भ्रमा
इथे बघ
काही सुप किंवा ज्युस करुन देता येइल का बघ. आणि हो डॉक्टरला आधी कल्पना दे तशी.

Suyog
Tuesday, May 15, 2007 - 4:52 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

nachanich satwa deu shakato tyat calcium asate
pith panyat kiwa dudhat shijavun chawila sakhar ghalane

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators