|
Dineshvs
| |
| Thursday, June 07, 2007 - 5:11 pm: |
| 
|
अलिकडेच इझी कूक नावाचे उपकरण बघितले. यात तळाशी एक प्लॅष्टिकचे भांडे असते त्यात पाणी घालायचे, वरती तीन ते पाच प्लॅष्टिकचे डबे असतात. त्यात आणखी स्टीलचे डबे असतात. या डब्यात डाळ, तांदुळ, भाज्या वैगरे ठेवता येतात. उपकरण विजेवर चालते. यात प्रेशर वैगरे नसते पण पदार्थ केवळ वाफेवरच शिजतो. वरण, भात व भाजी अर्ध्या तासात तयार होते. जास्तीची वाफ वरच्या डब्यातुन बाहेर पडते. यात तेलाची अजिबात गरज नसते. भाज्या वैगरे छान शिजतात. मासे, चिकन वैगरेही शिजते. इडली, ढोकळा करता येतो. दूध गरम करता येते. एकदा लावल्यावर अजिबात लक्ष द्यायची गरज नसते. पाणी संपल्यावर आपोआप विजपुरवठा बंद केला जातो. व जेवण बराच वेळ गरम राहते. विजेची खपत पण अगदीच कमी आहे. वजनाने हलका असल्याने कुठेही नेता येतो. हे उपकरण दुकानात उपलब्ध नाही, पण कुणाला हवे असेल, तर मी संपर्क देऊ शकेन.
|
Sunilt
| |
| Thursday, June 07, 2007 - 5:24 pm: |
| 
|
दिनेश, कृपया मला संपर्क द्यावा.
|
Zakasrao
| |
| Friday, June 08, 2007 - 4:35 am: |
| 
|
दिनेशदा हे उपकरण मी पुण्यात उत्सव मधे पाहिले होते. त्याची किंमत किती आहे?
|
Swa_26
| |
| Friday, June 08, 2007 - 6:14 am: |
| 
|
हो, दिनेशदा, मला पण सांगा त्याची किंमत!! आणि भाज्या वगैरे कशा शिजवायच्या यात i mean फोडणी वगैरे बाहेर देऊन त्यात घालायच्या कि कसे?
|
Dineshvs
| |
| Friday, June 08, 2007 - 8:29 am: |
| 
|
Sunlit सन्ध्याकाळी कॉन्टॅक्ट नंबर ईमेलने पाठवीन. झकास, तीन डब्यासाठी सगळ्या युनिटची किम्मत २८०० रुपये आहे. स्वाती, यात भाज्या कापुन त्याला फक्त तिखट मीठ लावुन ठेवायचे. शिजल्या कि वरुन हवी तर फोडणी द्यायची. पण द्यायलाच पाहिजे असे नाही. थोडे कच्चे तेल टाकुन घेतले तरी चालेल. ज्याना तेलातुपाचे खायचे नाही त्यांच्यासाठी छान आहे हे. चवीत अजिबात फरक जाणवत नाही. यात पदार्थ वाफेवरच शिजतो. पण प्रेशर नसते. भाज्या नेमक्या शिजतात. मऊ गाळ होत नाहीत.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|