|
Dineshvs
| |
| Friday, June 01, 2007 - 12:38 pm: |
|
|
शेवळाची भाजी. पहिल्या पावसानंतर रानात शेवळाची भाजी उगवते. खरे तर त्यासारख्या दिसणाया अनेक वनस्पति असतात, त्यामुळे स्वतःचे डोके लढवुन, कुठलेही कोंब खायचे नसतात. बाजारात या कोंबाबरोबर आवळ्यासारखी दिसणारी काकडं नावाची फळे मिळतात. याचा कोंब घेऊन खालचा काळा पडलेला भाग काढुन टाकायचा. याची वरची गडद रंगाची सालही काढुन टाकायची. या साली सोडवुन घ्यायच्या. आत एक पांढरा कोंब असतो, तोही खाजरा असतो. तोही खात नाहीत. हि साले कापताना खुप काळजी घ्यावी लागते कारण याला खुप खाज येते. हि बारिक कापत जायची व तशीच चिंचेच्या पाण्यात टाकायची. थोडावेळ पाण्यात ठेवुन द्यायची. काकडं वाटुन त्याचा रस काढुन घ्यायचा. या भाजीत, खिमा, करंदी किंवा सोडे घालतात. शाकाहारी करायची असेल तर भिजवलेली चण्याची डाळ घालतात. बारिक कापलेला कांदा परतुन त्यावर हि भाजी परतायची. मग त्यावर काकडांचा रस घालुन भाजी शिजवायची. यात कांदा खोबर्याचा मसाला चांगला लागतो. नाहीतर आपल्या आवडीप्रमाणे घालावा. खाज पुर्ण जाण्यासाठी शिजतानाही चिंच घालावी लागते. मग ती घोटुन घेतात. खिमा, करंदी सोडे वैगरे जे काहि घालायचे असेल ते आधी परतुन थोडे शिजवुन भाजीत घालायचे. काहि जण डाळीचे पिठ पेरतात. अशी पिठ पेरुन केलेली भाजी वापरुन, रुमाली वड्याही करतात.
|
वर दिनेशनी सांगितल्याप्रमाणे तो कोंब काढावा लागतो. त्याबरोबरच त्याखालचा शेन्दरी भाग पण काढावा लागतो.
|
Swa_26
| |
| Tuesday, June 05, 2007 - 6:27 am: |
|
|
पण बाहेरच्या साली आणि मधला सफेद कोंब याच्या मधील भाग घ्यायचा ना?
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 05, 2007 - 7:19 am: |
|
|
स्वाती, हो हो तेच घ्यायचे.
|
Swa_26
| |
| Thursday, June 19, 2008 - 9:42 am: |
|
|
दिनेशदा... ती काकडं जर नसतील तर काय घालु शकतो ह्यात आपण??
|
Dineshvs
| |
| Thursday, June 19, 2008 - 1:40 pm: |
|
|
ती नसतील तर भरपूर चिंच घालता येते. कापून थोडावेळ चिंचेच्या पाण्यात भिजवुन, पिळून घ्यावीत आणि नेहमीप्रमाणे शिजवावीत. आता आपल्याकडे ऊन नसते, पण हि भाजी सुकवूनही ठेवतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|