|
Bee
| |
| Monday, May 28, 2007 - 10:10 am: |
|
|
२ वाट्या चण्याची डाळ ६ तास भिजत ठेवायची. ती छान भिजली की त्यात दोन इंच सुके खोबरे, एक चमचा तिळ, एक इंच आल्याचा तुकडा, कढीपत्त्याची पाने, जिरे, हिंग, एक चमचा मीठ, ६ ते ७ लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरवर बारीक वाटून घ्यावी. डाळ खूप पातळ वाटली जाऊ नये. जरा घट्टच वाटावी. एक खोल परात घेऊन त्या परातीच्या अर्ध्या खोलीपर्यंत त्यात वाटलेली डाळ घालावी. नंतर २० मिनिटे ती वाफ़वून घ्यावी. गार झाली की त्याच्या वड्या पाडाव्यात. वरतून कोथिंबीर आणि ओले खोबरे पसरावे. खूप चवदार होतात ह्या वड्या. ह्याच रितिने कुठल्याही कडधान्याच्या वड्या करता येतात. पण त्यात चिकटपणा म्हणून थोडी चन्याची डाळ घालावीच लागते.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|