|
Supermom
| |
| Tuesday, May 08, 2007 - 1:10 pm: |
| 
|
कच्च्या कैरीची कढी ही नागपूरकडे केली जाणारी एक खास कढी. उन्हाळ्यात आणखीच रुचकर लागते. आंबट आवडत असेल त्या प्रमाणात एक वा दोन कैर्या उकडून घ्याव्यात. गर काढून, थोड्या पाण्यात नीट कुस्करून मिसळावा. यालाच थोडेसे बेसन लावावे. मिश्रण फ़ार घट्ट नाही व फ़ार पातळ नाही असे असावे. फ़ोडणीसाठी थोडे साजूक तूप एका जाड बुडाच्या पातेलीत गरम करावे. जिरे, हिंग, हळदीची फ़ोडणी करावी. त्यात तिखट आवडत असेल त्या प्रमाणात हिरव्या मिरचीचे तुकडे घालावे. त्यावर कैरीचे पाणी, चवीप्रमाणे मीठ घालून उकळावे. गोडसर आवडणार्यांनी किंचित साखर घातली तरी चालेल. मी घालत नाही. वर थोडी कोथिंबीर घालावी. गरमगरम भाताबरोबर ही कढी मस्त लागते. कैरी आंबट हवी.
|
Amayach
| |
| Wednesday, May 09, 2007 - 3:51 pm: |
| 
|
सुपरमॉम, खरच ही कढी खुप छान लागते. पण इथल्या कैर्या इतक्या आम्बट कुठे असतात? तु कुठली कैरी वापरतेस इथे?
|
Supermom
| |
| Thursday, May 10, 2007 - 12:05 pm: |
| 
|
अमया, भारतीय स्टोर्स मधे मिळणारी कैरीच घेते मी. छान आंबट असते ती.
|
Deepag12
| |
| Thursday, September 06, 2007 - 10:28 am: |
| 
|
मी तुम्हाला अजून एक पद्धत सांगते एक मध्यम आकारची कैरी एक वाटी किसलेले खोबरे चार मिरच्या, थोडस आल, मिस्कर मध्ये एकत्र वाटाव हे वाटण थोडे पातळ करावे जितके पातळ हवे तेवढे पणी टाकावे नंतर फोडनी साठी एका पातेल्यात तेल घेवुन जिरे हिंग कडीपत्याची फोडनि द्यावी. नंतर वरील वाटण गस मंद करुन त्यात टाकावे. व मीठ चवी नुसार टाकावे आनि हळु हळु हलवावे. ते फुटु देत कामा नये किंवा उकळि येता कामा नये नंतर वरती कोथीबिर टाकुन गरम गरम वाढावी. ह्या बरोबर एकाधी तिखट भाजी असेल तर ते तुम्हाला नक्कीच आवडेल
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|