|
Prady
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:29 am: |
| 
|
बी मी आधी देखील ह्या बीबीवर लिहिलय. लाटताना त्रास झाला म्हणतोस म्हणून परत लिहितेय. पुरणाची पोळी लाटताना तो उंडा तांदळाच्या पिठीत घोळवून मग प्लास्टिक शीटमधे ठेऊन लाटावा. आपली डाळीची किंवा तत्सम ग्रोसरीची जी पिशवी येते ती कापून वापरता येते. हलक्या हाताने लाटता येतं आणी पोळी फुटतही नाही. बघ पुढच्या वेळी अशी करून. आम्ही पुरणपोळीत साखर आणी गूळ दोन्ही घालतो ( म्हणजे एकत्र)
|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:44 am: |
| 
|
मला त्रास झाला नाही असे लिहायचे होते प्रज्ञा. तरीही धन्यवाद! उरलेल्या पुरणाचे मी मोदक करण्याचा विचार करतो आहे. पण पुरण आधीच चाखल तेंव्हा देवाला नैवेद्य देखील दाखवू शकत नाही. काल मात्र मी पहिली पुरणपोळी देवालाच नैवेद्य म्हणून दाखवली. नंतर आज डब्यात आणली.. आमच्याकडे देवाचा नैवेद्य खाल्ला तरी चालतो. इथे आता गायी-गुरं नाहीत म्हणून तसे केले..
|
Moodi
| |
| Tuesday, August 22, 2006 - 8:23 am: |
| 
|
आमच्याकडे मात्र पुरणपोळी गुळाचीच असते, कधीतरी आपली चमचाभर साखर घालतो. आणि ताजी पुरणपोळी भरपूरऽऽऽर साजूक तुपाबरोबर तर शिळी पोळी तूप आणि दूधाबरोबर पण चालते. अहो शेवटी पुरणपोळीच ती, उरले पुरण तर करा कडबु नाहीतर तसेच खा, अहाहा!! बी तांदळाचे पीठ नसेल तर पोळी मैद्यावर लाटली तरी चालते. 
|
आमच्याकडेही पुरणपोळ्या गुळाच्याच करतात आणिभरपुर नव्हे वारेमाप तुप घेउन खातात. पण पोळी पातळ मऊसुत व्हायला हवी. पोळीला कडा न रहाता पुरण शेवटपर्यंत पसरायला हवे. कोकणस्थांच्या पोळ्या अशाच असतात. पण देशस्थांच्या पोळ्यांना आमच्याकडे गमतीने पुरणभाकर्या म्हणतात,कारण त्या बर्यापैकी जाड असतात.[इथे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही सहज आठवलं--गंमत म्हणुन सांगिततं तेव्हा कृपया वाद नकोत] [इथे जातीयता आणत नाही गैरसमज नको.]
|
Moodi
| |
| Tuesday, August 22, 2006 - 9:14 am: |
| 
|
बी या तुझ्यासाठी टिप्स.(या मी लिहून घेतल्यात, मी यातला अर्धाच प्रयोग करुन पाहीलाय, चांगले झालेय). १) हरभरा(चणा) डाळ आधी थोडा वेळ भिजत घालावी. त्यामुळे डाळ लवकर शिजते. २) पुरणपोळी तव्यावर टाकण्याकरता कागदच्या जाड घडीचा वापर करावा, म्हणजे ती फुटत नाही. ३) पोळीला पीठी राहिली असेल तर मऊ रुमालाने वा कपड्याने हलकेच पुसुन घ्यावी. ४) कणिक जर तार येणार्या गव्हाची नसेल तर त्यात थोडा मैदा घालावा. २ वाट्या कणकेला अर्धी वाटी मैदा पुरतो. ५) पुरण सैल असेल तर पोळी लाटतांना त्रास होतो म्हणून ते घट्ट भिजवावे. ६) कणिक बारीक चाळणीने चाळून पाण्याने घट्ट भिजवावी आनि मग तासाभराने चिमुटभर मीठ घालुन तेल आनि पाणी एकत्र करुन त्या हाताने चांगलीच मळावी, म्हणजे तिंबावी. तिला तार आली पाहीजे. तवा चांगला तापला की मध्यम आंच करुन पोळी बदामी रंगावर भाजावी. गॅस मोठा ठेऊ नये. वरती आधीच्या पानांवर प्रियाने व्यवस्थीत लिहून दिलेय ते वाचा. ओके. गंमत गंमत. आमच्याकडे असे म्हणतात की देशस्थांचा लाडू मोठा आणि सैल असतो, म्हणून त्याला रेळ्या लाडू म्हणतात.कोकणस्थांचा मात्र मायक्रोस्कोपी लाडू असतो( कारण तो मायक्रोस्कोपमधुन बघावा लागतो.) इतरांचा बत्ता लाडू असतो.( विषय भरकटवल्याबद्दल क्षमस्व. यातही कुणाच्या भावना दुखावण्याचा अजीबात उद्देश नाही, वाद तर नाहीच.) 
|
Bee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 9:30 am: |
| 
|
काल माझी पोळी पुरणभाकरीच झाली होती. बरा सापडला योग्य शब्दप्रयोग.. पण मी कुठलाच 'स्थ' नाही. मूडी, छान टापटिपीची आहे, सगळ्या टिपा गोळा केल्यात. मला ते मीठ, पाणी आणि तेल एकत्र करायचे नीट समजले नाही. खरच मीठ, पाणी आणि तेल एकत्र करुन ते मिश्रण वापरायचे का? माझ्या कणकेत नेहमीच तार तुटतात म्हणून तर हाताला चिकटून बसते.
|
Moodi
| |
| Tuesday, August 22, 2006 - 9:38 am: |
| 
|
बी अरे मीठ तसे कणकेत आधी भिजवतांना घातले तरी चालेल. नंतर हाताला तेल लावुन वरुन थोडेसे पाणी घालुन कणिक मळायची. खरे तर गूळ सुद्धा चांगलाच हवा यासाठी. आम्ही मागे कर्हाडहून गुळाची ढेप / भेली आणली, पण इकडे त्यातला थोडा आणायचा विसरलो. कोल्हापूरकडील गूळ छानच. काही वेळेस चिक्कीचा गूळ मिळतो परदेशात, तो घेऊ नये. वाटल्यास पावडर घ्यावी तुकड्यांऐवजी. आणि टिप्स मला दिल्यात रे, माझ्या नाहीत. 
|
Aandee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 9:49 am: |
| 
|
दिनेश तुम्ही एकदम छान सल्ले देता.बी पुरण पोळी करुन पाहिलीत ह्याच कौतुक वाटल.पुरणाची डाळ शिजवताना त्यात थोडी हळद(चिमुट भर) एक टे.स्पुन गोड तेल घातल तर पुरण छान शिजत तेलाने नरम होत आणि वाटताना डळिम्ब्या पण रहात नाही. हळ्दीमुळे छान सोनेरी रंग येतो.जेव्हा पुरण करायच असेल त्याच्या एक,दोन तास आधी डाळ भिजत घातली तर शिजायला वेळ कमी लागतो.कट जरी कमी निघाला तरी काही हरकत नाही वाटलेल पुरण थोड पाण्यात मिसळुन घेतल तरी चालत चवीमधे विषेश फ़रक होत नाही.पुरणा साठी कणिक भिजवताना गव्हाच्या पिठ बरोबर थोडा मैदा घालवा मोहन घालताना तेलाच मोहन घालव. पुरणात निमे निमेसाखर आणि गुळ घालावा म्हजे पुरणाचा रंग काळपट होत नाही आता पुराण खुप झाल. बी जायफ़ळ आणि सुपारीतला फ़रक उलगडला की नाही.
|
Savani
| |
| Tuesday, August 22, 2006 - 1:50 pm: |
| 
|
माझ्या पण थोड्याश्या टीप्स मी पुरण गुळाचं घालते. माझ्या नेहेमीच्या पोळ्या सुद्धा आकाराने मोठ्या असतात त्यामुळे पुरणाची पोळी तशीच मोठी होते. आणि आमच्याकडे जाड पोळी अजिबात आवडत नाही त्यामुळे पातळ करावी लागते. पण पुरण मात्र व्यवस्थित पसरतं. detail कृती देण्यापेक्षा टीप्स सांगते. १. डाळ शिजवायला लावताना त्यात किंचीत हळद आणि तेल घालायचं. हळदी ने छान रंग येतो आणि तेलाने नरमपणा येतो. २. ग़ूळ चांगला किसून घ्यावा. माझं प्रमाण तरी जेवढी डाळ तेवढाच गूळ असं आहे. ३. पुरण शिजलं की नाही बघण्यासाठी त्यात उलथनं घालून बघावं. ते उभं राहिलं की पुरण शिजलं असं समजावं. ४. कणीक चांगली तिंबली जाणं हे सगळ्यात महत्वाचं. ५. भारतात नुस्त्या गव्हाची कणीक असते तर थोडा मैदा घालावा त्यात. पण इथे मी मैदा घालत नाही. माझ्या अनुभवाप्रमाणे golden temple नेहेमीच्या पोळ्यांसाठी खास नसलं तरी पुरणपोळ्या त्याच्या छान होतात. त्यात already मैदा असतो. ६. आधी नेहेमीसारखी कणीक घेऊन त्यात तेल, पाणी घालून भिजवून ठेवायची. ७. साधारण तासाभराने त्यात मीठ घालून, नेहमीपेक्षा सैल कणीक मळावी. कणीक मळताना तेलाचा सढळ हाताने वापर करावा. ४ बोटांनी उलट्या बाजूने दाब देत जावा. कणीक मळताना ती पोळपाटावर चांगली आपटून घ्यायची. तार सुटली पाहिजे. आणि अशी छान मळलेली कणीक भान्ड्यात तेल घालून त्यात बुडवून ठेवावी. कणकेचा गोळा पुर्ण भिजेल एवढं तेल पाहिजे. ७. पोळी लाटताना जेवढा कणकेचा उंडा त्यापेक्षा दीडपट आकाराचा पुरणाचा उंडा घ्यावा. दुप्पट घेतला तर उत्तम. मग तांदळाच्या पीठीवर पोळी हलक्या हाताने लाटावी. पोळी लाटताना लाटणे सगळीकडे समान फ़िरायला हवे आणि अजिबात जोर देऊ नये. तवा खुप तापवू नये. मध्यम आंच असावी. पोळी हाताने टाकायला भीती वाटत असेल तर लाटण्यावर गुंडाळून ती तव्यावर हळु हळू उलगडावी. मी तरी भाजताना तूप टाकत नाही. दोन्हिकडून छान गुलाबी शेकली गेली की खाली काढल्यावर भरपूर तुप घालून वाढावी.
|
Mrinmayee
| |
| Tuesday, August 22, 2006 - 2:09 pm: |
| 
|
भारताबाहेर राहणार्यांना पुरण यंत्र हवं असेल तर ही लिंक बघा. http://www.amazon.com/MIU-France-Stainless/dp/B0006IVY8I/sr=1-34/qid=1156166389/ref=sr_1_34/103-3447756-0493457?ie=UTF8& यात खाली वाचत गेलात तर आणखी काही कंपन्यांची यंत्र पण दिसतील. food mill नावानी गुगल सर्च केलात तर बर्याच sites आहेत. आता इतक्या छान टिप्स वाचल्यावर पुरणपोळ्या करायलाच हव्यात. By the way , पुरणात केशर घालतात का?
|
Savani
| |
| Tuesday, August 22, 2006 - 2:15 pm: |
| 
|
मृ, पुरणात केशर घातल्याने छान चव येते आणि रंग पण. केशर मी पुरण शिजताना घालते पण वेलची आणि जायफ़ळ मात्र पुरण शिजत आलं की शेवटी घालते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 22, 2006 - 5:06 pm: |
| 
|
Savani छान आहेत टिप्स, मला वाटते हे मी आधी लिहिले होते, पुरण शिजवल्यावर वाटणे जरा कठीण जाते. त्यापेक्षा डाळ जास्त शिजवुन डावेने नीट घोटुन घेतली तर मग वाटावी लागत नाही. मी मागच्या वेळी पुरणात बेळगावचा कुंदा मिसळला होता. मस्तच चव आली होती.
|
Arch
| |
| Tuesday, August 22, 2006 - 5:17 pm: |
| 
|
आमच्याकडे, पुरणात आणि पिठात दोन्हीत केशर घालतात. त्याने, वास, चव, आणि रंग अस सगळच छान होत. पोळ्या तेलावर लाटतात आणि त्यामुळे पुरणपोळीला तेलपोळीपण म्हणतात. खर तर पोळी म्हटल तर पुरणपोळी आणि चपाती म्हणजे साधी पोळी असा अर्थ धरतात आमच्याकडे
|
Chioo
| |
| Monday, September 04, 2006 - 9:59 am: |
| 
|
इथे टिप्स देणार्या सग्गळ्या-सग्गळ्यांना माझे खूप खूप धन्यवाद. मी इथले वाचून शुक्रवारी गौरीसठी पुरणपोळ्या केल्या. प्रथमच. आणि चक्क छान झाल्या. मला पुरण बनेल याची खात्री नव्हती म्हणून मी कणीक जास्त नाही भिजवली. त्याची ऐन वेळी चपाती करता येईल इतपतच भिजवली , त्यामुळे cover थोडे जाड झाले. जर अशी भिजवलेली कणीक जास्त झाली तर त्याचे काय करता येते? सर्वांना परत धन्स.
|
Manuswini
| |
| Wednesday, September 06, 2006 - 10:55 pm: |
| 
|
सावनी जसे सांगितले तसेच अगदी पोळी केली जाते आमच्याकडे. जाडी पोळीला सगळे हसतात. पुरणपोळी मऊ आणी पातळ म्हणजे सुगरण असे आहे कोकण्यांकडे. (जातियवाद नको इथे just असेच सांगते). मऊ, पातळ पण पुरणाने गल्लेलठ्ठ भरलेली अशी पोळी. आश्च्रय म्हणजे मी कालच केल्या होत्या पोळ्या छान. मी सुद्धा केशर डाळ शिजताना घालते आणी आम्ही पण नुसता गुळच घालतो. मी थोडेसे शुद्ध तूप पण घालते डाळ शिजताना. घमघमाट येतो. आईची Recipe मुठभर गव्हाच पिठ असते २ वाट्या मैद्याला. भरपुर तेलात छान मळावे मग पोळी मऊसुत होते. मी पिठ मळताना मिठ टाकते. आणी भिजवुन झाकुन ठेवते. थोडेसे मिठ सारणात पण टाकावे. पोळी मैद्यावरच छान लाटली जाते हा माझा अनुभव. एक सांगायचे विसरले पिठात तेल घालावे. दुसरे म्हणजे पुरणात सुंठ सुद्धा घालते आई कारण चणाडाळ खाल्ली की वायुचा त्रास होतो ना पोटाला आणी त्यात कढण म्हणजे द्वनी प्रदुक्षण सुद्धा
|
Surabhi
| |
| Thursday, September 07, 2006 - 7:03 am: |
| 
|
आर्च, माझा एक भारी प्रश्न आहे! हसू नकोस! पुरणपोळीत, डाळ आणि गुळाच्या उग्र वासात केशराचा सौम्य वास समजतो का? मला वाटत होतं की गुळाच्या पदार्थांन जायफळ, वेलची, सुंठ असे स्वादाला वापरतात व साखर दुधाच्या पदार्थांनाच केशराचा स्वाद खुलून येतो! अर्थात मुबलक मिळतं म्हणून वापरणे वेगळे! CBDG
|
Himscool
| |
| Thursday, September 07, 2006 - 12:06 pm: |
| 
|
सुरभी तुझा प्रश्न तसा भारीच आहे पण पुरणामध्ये केशर घालतात आणि त्याचा वास नक्किच कळतो.. अर्थात ते केशरही चांगल्या क्वॉलिटीचे हवे...
|
Manuswini
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:03 pm: |
| 
|
केसह्र ते केशर त्याचा वास का लपुन राहील. मी परवाच केल्या होत्या पोळ्या भरपुर केसर घालुन. उलट छान रंग पण येतो. डळीतच घालते होते. try करुन बघ सुरभी
|
Bee
| |
| Friday, September 08, 2006 - 4:32 am: |
| 
|
तरीही रव्याच्या लाडवात जसे केसरचा गंध येतो तसा पुरणात नाही. पुरणामध्ये वेलचीचा स्वाद चांगला येतो. केसरची प्रथा नविनच निघाली आहे असे वाटते...
|
एक ताजी ताजी टिप: वाटलेल पुरण जर सैल झाले तर अजिबात घाबरू नका. चक्क एका पसरट प्लेटमध्ये काढा. मायक्रोवेव मध्ये high वर २ मिनिटे ठेवा. बाहेर काढून गार होऊन द्या. छान कोरड होत. अगदी हव तस. थोड्या वेळापूर्वीच पुरणपोळ्या करताना आलेला हा प्रॉब्लेम. पुरण सैल म्हणजे खूपच सैल झाल होत. आधी मी घाबरले होते ते बघून. मग हा प्रयोग करून पाहीला आणि यशस्वी झाला म्हणून सांगतेय. सुरेख पोळ्या झाल्या. या खायला!
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|