|
महाराष्ट्रामधल्या बहुतेक लोकांच्या घरी जेवणाच्या ताटामधे पदार्थांच्या जागा ठरलेल्या असतात. घड्याळाशी resemble केलं तर १२ - आमटी, २ - भाजी, ३ दुसरी भाजी, ६ - पोळी / भात, ८ / ९ - चटण्या कोशिंबिरी, ११ - मीठ लिंबू वगैरे. हे कशावरून ठरवलं किंवा ह्या मागे खरंच काही logic आहे आहे असं वाटतं का?
|
Arch
| |
| Tuesday, March 27, 2007 - 3:55 pm: |
| 
|
हो! जे जास्त खाल्ल जात ते म्हणजे चपाती भात, हाताजवळ. जास्ती तोंडी लावण असत ते उजव्या हाताला जस भाजी वगैरे. कमी लागणार तोंडी लावणं म्हणजे चटणी वगैरे डाव्या हाताला. बघ पटतय का ते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 27, 2007 - 4:36 pm: |
| 
|
हो आर्च तेच लॉजिक आहे. त्यावेळी पदार्थ किती प्रमाणात वाढायचे याचेहि तंत्र होते. आणि ते तेवढ्या प्रमाणातच खायचे असतात. लोणचे, चटणी वैगरे कमीच खावे व मुख्य भर आमटी, भात, चपाती, भाजीवर असावा.
|
हमम... असू शकेल असं. तसं आपल्याकडे जेवणाची प्रत्येक स्टेप well-reasoned आहेच त्यामुळे ह्यामागे काहीतरी असेलच असं वाटलं होतं. तसा खूप फ़रक पडतो असं नाही पण, ही मांडणी उजव्या हातानी जेवणार्यांसाठी आहे (जे होणं पूर्वी अगदीच सहाजिक होतं)
|
अमेय ताटाऐवजी 'केळीचे पान' लक्षात घ्यायला हवे. ताट ही आधुनिक सोय आहे.. जेवण वाढण्याच्या पध्दती त्यावर बसवलेल्या असतात.. पूर्वी 'घराण्याचं वळण' रीत वगैरे या वाढण्याच्या कलेवर ठरवली जात असे...
|
ह्या लिन्कवर खुप छान माहिती दिलेली आहे. http://www.marathiworld.com/pakkala/pangat.htm
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|