|
Prady
| |
| Wednesday, March 14, 2007 - 6:21 pm: |
|
|
"पॉलाज होम कुकिंग" च्या शो मधे मागच्या आठवड्यात पाहिलेली कृती. छान वाटली म्हणून इथे देत आहे. हे सॅँडविच करताना दोन कडांना दोन वेगळे ब्रेड वापरावे.एका कडेला व्हीट ब्रेड आणी एकिकडे व्हाईट ब्रेड. फिलिंग साठी क्रीम चीझ घ्यावं त्यात एक चतुर्थांश मेयोनीज घालावं. नीट मिसळून ह्याचे दोन भाग करावेत. एका भागात किसून नीट पिळलेली काकडी घालावे, दुसर्या भागात क्रश्ड अननस टाकावं. चवीप्रमाणे मीठ मीरपूड घालावी. ब्रेडचे कुकी कटरने आवडतील त्या आकाराचे तुकडे कापून घ्यावेत. आता तयार फिलिंग्स दोन ब्रेड स्लाईसमधे घालावीत. काकडीच्या फिलिंगच्या सँडविचच्या कडा बारीक चिरलेल्या कोथिंबिरीत घोळवाव्यात. अननसाच्या सँडविचेस ना बेकनचे तुकडे वापरायला सांगितले होते पण मला वाटतं चीझच्या किसात घोळवलं तरी छान दिसेल. अशी आपल्या आवडी प्रमाणे वेगवेगळी फिलिंग्स वापरता येतील.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|