Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
तेलाचे भांडे कसे स्वच्छ करावे? ...

Hitguj » Cuisine and Recipies » उपयुक्त माहिती » Household Cleaning » तेलाचे भांडे कसे स्वच्छ करावे? « Previous Next »

Shonoo
Thursday, March 08, 2007 - 1:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message


माझ्याकडे खालील लिंक वर असलेले तेलाचे Decanter आहे. ते डिशवॉशर सेफ़ आहे. पण दोन-दोनदा डिशवॉशर मधून काढले तरी आतून आणि बाहेरून स्वच्छ होत नाही. मी गरम पाण्यात भरपूर साबण घालून उकळून पण पाहिलं. काही फरक नाही.

अजून काही उपाय कोणी करून पाहिले आहेत का?
What do you use for 'everyday' oil that is easy and safe to use and easy to keep clean, doesn't cause oil-rings every where?

माझ्या सारख्या अनेकांना हाच प्रश्न असेल म्हणून हा प्रश्न प्रपंच.
http://www.lnt.com/product/index.jsp?productId=1364380&;cp&sr=1&origkw=oil&kw=oil&parentPage=search

Dineshvs
Thursday, March 08, 2007 - 5:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पुर्वापार वापरात असलेले शकुंतला भांडेच मला सोयीचे वाटते.
अलिकडे जे प्लॅस्टिकचे कॅन मिळतात, त्यानी जर नीट धार पडत असेल तर त्यातुनच ओतुन घेता येते तेल.
पण चपातीला वैगरे वरुन लावण्यासाठी शकुंतलाच चांगले. हल्ली त्याचा चांदीसारखा दिसणारा व थोडी नक्षी असणारा प्रकार मिळतो. यात जो चमचा मिळतो, तोही खास असतो, व तो चमचा आत ठेवला तरी झाकण व्यवस्थित लागते. पुर्वी अशी सोय नव्हती.
या भांड्याचे नाव शकुंतला कसे पडले, याचा पण एक किस्साच आहे. पंगतीत तुप वाढताना, शकुनाची कुंतली कुठे ? असे घाईत विचारताना या भांड्याचे नाव शकुंतला पडले, असे म्हणतात.


Chinnu
Friday, March 09, 2007 - 2:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू नॉनस्टिकवरचे ग्रीस काढण्यासाठी SOS scrub मिळतो Walmart मध्ये, तो वापरुन बघ. माझे नॉनस्टीक तवे बर्‍यापैकी निघतात त्याने. थोडे कष्ट पडतात पण! :-)

Shonoo
Friday, March 09, 2007 - 6:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

त्याने करून पाहिले होते मी. फक्त चरे पडले त्या भांड्याला. पण तेलकटपणा काही गेला नाही. ते SOS scrubs प्रेशर कूकर करता पण एकदम चांगले असतात..

या तेलकटपणावर काहीतरी केमिकल उपायच चालेल असं वाटतं


Anjali28
Friday, March 09, 2007 - 8:04 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू,
माझ्याकडेही हीच तेलाची Decanter आहे. साफ करणे खरच जिकरीचे काम आहे. मी dishwasher मधे टाकायच्या आधी गरम साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवते. नन्तर dishwasher मधून काढले की bounty च्या नपकिनने पुसून घेते. नपकीन आत घालायला लांब दांड्याचा चमचा वापरते. बर्‍यापैकी स्वच्छ होतो. मला पण शोनूने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर हवे आहे.


Dineshvs
Saturday, March 10, 2007 - 10:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि तेलामधे, खास करुन कॉर्न तेलामधे किंवा सोयाबीनच्या तेलामधे असे घटक असतात, ज्याने भांड्याना आतुन ओशटपणा येतो.
कोरड्या कणकेने किंवा तांदळाच्या पिठाने घासुन हा ओशटपणा बर्‍यापैकी जातो.
मग साबणाचे गरम पाणी घालुन चार पास तास ठेवले कि भांडे स्वच्छ होते.
हल्लि जे डिश वॉशिंग लिक्वीड्स मिळतात, ते वापरले तर चांगले.


Manaswii
Saturday, March 10, 2007 - 8:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बेकिंग सोडा वापरुन पाहिला आहे का कोणी?? मी तेलाच्या भांड्याला नाही वापरला तरी कुकरसाठि आणि माझ्या अगदि खराब डाग पडलेल्या stovetop साठि वापरला आहे. रात्री सोड्याने भांडे जरा जोर लावुन घासावे आणि जरा तसेच थेवावे आणि सकाळि परत घासुन घ्यावे. ८०% ओशटपणा निघेल.

Arch
Saturday, March 10, 2007 - 9:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

dishwashing liquid soap आणि water softner घालून त्या पाण्यात भांड उकळायच अगदी स्वच्छ होत. मी water softner Calgon च वापरते.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators