|
काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर एशियन स्काय शॉप मध्ये demo पाहीला होता. जेव्हा विकत घ्यायला गेले तेव्हा त्या ब्लेड्स प्रत्यक्ष पाहील्यावर घाबरले. म्हटल नको ते आपल्याला. घाईत असताना वापरला तर हाताच काही खर नाही. अजिबात वाटेला गेले नाही. पण गेल्या महीन्यात मैत्रिणी कडे पाहीला. तिने केलेली स्तुती ऐकली. आणि आणल शेवटी V Slicer . I swear its so convenient and useful! कांदा, टोमॅटो, सिमला मिरची, कोबी, गाजर वगैरे फटाफट चॉप होत. juiliennes thick as well as thin छान होतात. जाडे व पातळ स्लाईसेस पण छान होतात. २-३ वापरानंतर माझी भिती पण गेली. नियमित वापरते. अप्रतिम आहे. किंमत रुपये ६५०/=. but its worth . धुवायला पण सोपे आहे. फूड प्रोसेसर सारखी कटकट नाही. महत्वाची सूचना: safety holder शिवाय चुकुनही वापरू नका. माझ्या डोळ्यांसमोर दोन उदाहरणे आहेत. अक्षरश: बोटाचा कपचा निघतो. लहान मुलांपासून दूर ठेवणे. पण with safety holder काही म्हणजे काहीही प्रॉब्लेम नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:46 pm: |
| 
|
शर्मिला, मीपण बोट कापुन घेतलेय त्यावर. पण खुपच उपयोगाची वस्तु आहे ती. ज्याना जपुन उपकरणे वापरता येतात त्यानी अवश्य घावे. पावभाजी, राजमा साठी कांदा टोमॅटो बारिक कापण्यासाठी छान उपयोग होतो त्याचा. गाजर, कोबी छान कापुन होते. त्याचे भारतीय अवतार आहेत, पण त्यात एवढे झटपट काम होत नाही. हा व्ही स्लाईसर साफ करताना, टिव्हीवर दाखवल्याप्रमाणेच साफ करावा लागतो. अगदी जर काही अडकले असेल तर जुना टुथब्रश किंवा काडी वापरावी.
|
मी जो घेतला आहे तो इंडिअन आहे पण त्याच्या ब्लेडस जर्मन आहेत. दिनेश तुम्ही safety holder शिवाय वापरलात वाटत!
|
Dineshvs
| |
| Friday, March 09, 2007 - 8:37 am: |
| 
|
अति आत्मविश्वास नडला. आपल्या कल्पनेपेक्षा खुप लवकर कापुन होते यावर म्हणुन, बोटापर्यंत कधी आले ते कळलेच नाही. सगळी जर्मन पात्यांची करामत आहे. अंजलीचा पण असा प्रकार मिळतो, तो जास्त सुरक्षित असला तरी त्याला धार नाही.
|
U.S. मधे कुठे मिळेल v-slicer? कुठल्या company चा चान्गला असतो ? आणि काय price असते साधारण?
|
आरती, Yahoo Shopping वर बघ.. हा मिळाला.. http://www.amazon.com/exec/obidos/ASIN/B0000632QE/yahoo-kitchen-20/ref=nosim
|
माझ्याकडे हा progresive चा slicer आहे. ... works amazing जाड बारिक चकत्या बटाटा,तोंडली मस्त झटपट कापुन होतात..सलाद साठी किस वैगेरे हि पटकन होतो..साफ़ करायला एक्दम सोपा आहे. http://www1.epinions.com/content_362792259204
|
Prr
| |
| Monday, May 12, 2008 - 4:06 pm: |
| 
|
शर्मीला, दिनेशदा...तुमच्या कडे कुठल्या कंपनीचा आहे v-slicer जर्मन ब्लेडचा? आणी किती ब्लेडस आहेत ?
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 13, 2008 - 3:15 pm: |
| 
|
मला वाटते V Slicer असेच नाव होते. त्याला तीन ब्लेड्स होती. खरे तर ब्लेड म्हणजे तो व्हीचा आकारच. एक ब्लेड साधे प्लॅस्टिकचे होते. ते दोन बाजूने लावता येत असे व त्याने पातळ व जाड काप निघत. मग एक फ़्रेंच फ़्राईज टाईप आणि त्याहून छोटे तुकडे करण्यासाठी, दोन वेगळी ब्लेड्स होती. शिवाय पदार्थ पकडण्यासाठी एक सेफ़्टी कव्हर. त्यासोबत बाकि काहि किसण्या वगैरे फ़्री मिळाल्या होता.
|
Prr
| |
| Thursday, May 15, 2008 - 8:47 pm: |
| 
|
धन्यवाद! मला वाटले तुम्ही Borner V-slicer असे काहीतरी नाव लिहाल. मला खरेतर गाजर, कोबी , कांदा यांचा छान किस होत असेल तरच घ्यायचे आहे. पराठयांसाठी कोबी/गाजर किसायला नेहमीच्या किसण्यांवर खुप वेळ जातो. आणी कोबी किसताना तर एक एक पान वेगळे होत जाते त्यामुळे फार त्रास होतो.
|
Dineshvs
| |
| Friday, May 16, 2008 - 2:45 am: |
| 
|
यावर हे तिन्ही छान बारिक कापता येतात. राजमा. पावभाजी करताना भरपुर कांदा लागतो, त्यावेळी हे सोयीचे पडते. कांद्याच्या चकत्या आणि बारिक, असे दोन्ही कापून होतात. गाजराचे मॅचस्टिक्स, पण छान होतात. कोबी आणतानाच जर तो घट्ट बघुन आणला, आणि मधला दांडा तसाच ठेवुन कापायला घेतला तर पाने सुटी होत नाहीत.
|
Prr
| |
| Tuesday, May 20, 2008 - 3:48 pm: |
| 
|
अगदिच काही पाने वेगळी नाही होत पण रोज कोबी किसावा लागतो तेव्हा थोडा त्रासच होतो. V-slicer ने झटपट आणी व्यवस्थित होत असेल तर खरेच घ्यायला हवे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 21, 2008 - 5:52 am: |
| 
|
आपण कोबी किसला तर तो किस मऊ पडतो आणि त्याला पाणीहि सुटते. किसणीला धार नसते त्यामुळे जोर द्यावा लागतो, पण या स्लाईसरची धार खुप असल्याने कोबी पटकन बारिक चिरून होतो. जर चौकोनी किसणी असेल तर तिची स्लाईस करायची बाजू वापरूनदेखील, कोबी नीट कापुन होतो. इथे या स्लाईसरची किंमत, २००० रुपयांच्या आसपास आहे.
|
Prr
| |
| Tuesday, May 27, 2008 - 2:07 pm: |
| 
|
अगदी बरोबर बोललात तुम्ही. थोडा जोर द्यावा लागत असल्याने खुप पाणी निघते. माझ्या इथे एका शॉप मध्ये मिळतेय. तुम्ही सांगताय तेच असावे. पण २च ब्लेडस आहेत. जर्मन ब्लेडस असतील तर तेच घेईन. http://www.target.com/B%C3%B6rner-V-Slicer-Pro-White/dp/B000TDDVPE/sr=1-1/qid=1211896597/ref=sr_1_1/602-2999773-0795836?ie=UTF8&index=target&rh=k%3Av%20slicer&page=1
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|