|
Bee
| |
| Monday, February 26, 2007 - 4:41 am: |
|
|
हा शिरा त्वरीत न खाता त्याला दुसर्या दिवशी खा. लहान मुलांना आयत्या वेळी काही करणे जमत नसेल तर घरात हा शिरा असला तर फ़ार उपयोगी पडतो. साहित्या, एक वाटी कणिक, अर्धा वाटी पिठी साखर, पाव वाटी साजूक तुप, एक वाटी दुध, हवे असेल तर केसर, वेलची ईत्यादी. सर्वप्रथम, पिठ पाव वाटी तुपात खरपूस भाजून घ्यावे. भाजताना पिठ जळणार नाही ह्याची खात्री करावी. त्यासाठी जाड बुडाचे पातेले किंवा कढई ग्यावी आणि आच मंद करावी. नंतर उकळून कोमट केलेले दुध घालावे. हा शिरा सैल न होता खूप घट्ट होतो, पळीला चिकटतो. त्यामुळे दुध घातल्यानन्तर कढईच्या कडेने दोन चमचे तुप सोडावे म्हणजे पळीला शिरा चिकटून बसणार नाही. नंतर सर्वात शेवटी साखर घालावी. एक वाफ़ येण्यासाठी वर झाकण ठेवावे. वाफ़ आली की शिर्यात वेलचीची पुड घालावी. हा शिरा गार झाला की बंद डब्यात fridge मधे ठेवून द्यावा. आठवडाभर छान राहतो. उलट जितके दिवस ठेवाल तशी चव मुरत जाते. पण शक्यतोवर कुठल्याही खायच्या वस्तू लोणच्यासारखा टिकवू नये. लवकर संपवून टाकाव्यात. बर्याच स्त्रियांना शिर्यामधे खूप dry fruits टाकण्याची सवय असते. माझ्या मते अशानी त्या पदार्थाची अंगभूत चव मरते. मोजक्याच वस्तू घालाव्यात.
|
Manuswini
| |
| Wednesday, October 24, 2007 - 9:53 pm: |
|
|
हा शीरा कन्नड लोकांमध्ये ज्यास्त करतात. तूप कमी टाकले की चिकट होती नी का कुणास ठावूक मला ती पिठाळ चव आवडत नाही. दुसरे गुरुद्वारात पण असाच करतात, तो मात्र तूपात बुडलेला असतो. पण हा मात्र आवडतो, all pyschological I guess शीरा हा अतीशय फ़ेव पदार्थ आहे माझा.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|