|
Saket
| |
| Thursday, February 08, 2007 - 2:30 am: |
| 
|
इथे कोणाला रोटी मेकरचा अनुभव आहे का? कितपत उपयोगी आहे? अमेरिकेत मिळणारे Tortilla maker आणि भारतातले रोटी मेकर सारखेच आहे का, कारण वेब साईटवरच्या चित्रांवरुन दोन्ही सेमच वाटले.
|
Bee
| |
| Thursday, February 08, 2007 - 8:31 am: |
| 
|
हे रोटी मेकर म्हणजे तेच ना जे लोखंडाचे असतात. वरतुन दाब दिला की कणकेचा गोळा गोल पोळीसारखा होतो. मला तरी तो प्रकार चार दिवस करुन बघिल्यानंतर आपलं लाटण पोलपाट बर आहे असे वाटायला लागले. कारण हाताचे दंड दुखायला लागले होते. वेळेची बचत होते असेही काही नाही. सगळ्यात भारी बाब म्हणजे त्या एकदम तंतोतंत गोलसर पोळ्या आणि प्रत्येक चपातीची जाडी सारखीच खरच ताटात वाढली की खावीशी वाटत नाही इतका कृतिमपणा feel होतो त्या पोळ्यांचा
|
Saket
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:14 pm: |
| 
|
बी, ते बहुतेकतरी पूरी मेकर असावे आणि फ़क्त पूर्या, पोळ्या लाटण्याच्याच उपयोगाचे असते ते, पण मी जे म्हणते आहे ते इलेक्ट्रीकल असते आणि त्यावर पोळ्या लाटुन शेकता सुद्धा येतात. इथे कोणालाच रोटीमेकरचा काही बरा-वाईट अनुभव नाही का?
|
Sami
| |
| Thursday, February 08, 2007 - 4:51 pm: |
| 
|
मला आहे ना. मी घेतला होता काही वर्षांपूर्वी.. लगेच ६ महिन्यातच टाकला. ads मधे दाखवतात तसं काही होत नाही. पोळी परत लाटावी लागायची आणि नीट भाजली ही जायची नाही. मी कोणाला suggest नाही करणार.
|
Arch
| |
| Thursday, February 08, 2007 - 5:09 pm: |
| 
|
समीशी सहमत. San Jose च्या BMM मध्ये विकत होते म्हणून मी घेतला तो Tortilla maker का roti maker . एकदम useless आहे. ४० डाॅलर्स फ़ुकट
|
Boli
| |
| Thursday, February 08, 2007 - 5:30 pm: |
| 
|
त्यावर भाजलेल्या पोळ्या वात्तड होतात. खुप जास्त heat असल्यामुळे कणकेतले max moisture निघुन जाते.
|
Malavika
| |
| Thursday, February 08, 2007 - 6:08 pm: |
| 
|
tortilla maker मधे पुर्या चांगल्या होतात. मी करुन बघितल्या अहेत.
|
Bee
| |
| Friday, February 09, 2007 - 9:29 am: |
| 
|
अगदी बरोबर.. वर कुणीतरी म्हंटलं तसच अगदी ह्या पोळ्या एकतर भाजल्या जात नाही आणि गेल्या तर वातळ होतात. शिवाय पोळ्यातील आर्दता निघून जाते. अशा पोळ्या पचनी पडतील असे वाटत नाही..
|
Saket
| |
| Friday, February 09, 2007 - 4:00 pm: |
| 
|
थॅंक्स बी, समी, आर्च, बोली आणि मालविका. सगळ्यांच्या अनुभवांवरुन मला रोटीमेकर घेण्याचा विचार मनातुन काढुन टाकावा लागणार असं दिसतयं. पुन्हा एकदा सर्वांचे मनापासुन आभार.
|
Gajanan1
| |
| Wednesday, August 12, 2009 - 5:14 am: |
| 
|
बरे झाले हे वाचले............. आपला हात जगन्नाथ
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|