|
Dineshvs
| |
| Sunday, January 28, 2007 - 4:22 pm: |
|
|
सुरती बटर १ टिस्पुन जिरे जरासे भाजुन घ्यावे. ते थोडे रगडुन घ्यावे व त्यावर कपभर गरम पाणी ओतावे. हे तासभर आधी करुन ठेवावे, म्हणजे पाण्याला जिर्याचा वास लागतो. पाव कप साखरमिश्रित कोमट पाणी घेऊन त्यावर चमचाभर ड्राय यीस्ट पसरावी. १० मिनिटानी ते फसफसल्यावर, २२५ ग्रॅम मैदा घेऊन त्यात ते ओतावे. १ टिस्पुन मीठ घालावे. मग जिर्याच्या कोमट पाण्याने मैदा मऊसर भिजवावा. भिजवताना २ टेबलस्पुन तेल घालावे. नीट मिसळुन, ४० मिनिटे झाकुन ठेवावे. परत उलट्या मुठीने दाबुन मळावे. मग त्याचे सुपारी एवढे गोळे करावेत. कोरड्या पिठात घोळवुन ते गोळे ट्रेमधे ठेवावेत. वरुन तेलाचा हात लावुन दाबावे, व ट्रे झाकुन ठेवावा. परत ते गोळे फ़ुगुन येतील. ओव्हन २३० अंश सेंटिग्रेड किंआ ४५० F वर गरम करत ठेवावे, मग ट्रे ठेवुन १५ मिनिटे बेक करावे. याच पिठात तीळ, खसखस वैगरे घालता येईल. ओवा, मिरी पण वापरता येईल. याच मिश्रणाच्या सुप स्टिक्स करता येतील.
|
Prady
| |
| Tuesday, November 20, 2007 - 9:27 pm: |
|
|
अजून एक सोपी पद्धत. इंटरनेटवर वाचली आणी करून बघितलं. खूप छान खुसखुशीत बटर झालेत. ३ कप बिसक्वीक किंवा कुठलंही तयार पॅनकेक मिक्स १ कप मैदा १ कप दही १ कप तेल दीड चमचा जिरं वरील सर्व साहित्य एकत्र करून छान मळून घ्यावं. मीठ घालायची तशी गरज नाही कारण पॅनकेकच्या मिश्रणात ते असतंच. पण तरी हवं असेल तर तेल दही घालायच्या आधीच चवीप्रमाणे घालून घ्यावं. पीठ चांगलं मळून त्याचे लिंबाएवढे गोळे करावेत आणी बेकिंगशीटवर ठेवावेत. ओव्हन ३५० F वर गरम करून त्यात हे गोळे खालच्या रॅकवर १५ मिनिटं बेक करावेत. मग २ मिनिटांसाठी वरच्या रॅकवर ठेऊन ब्रॉईल करावेत. आता ओव्हनचं टेम्परेचर १७० F करावं. बटरचा ट्रे परत खालच्या रॅकवर ठेवावा. आणी दोन तास बेक करावं. छान खुसखुशीत बटर तयार चहा बरोबर खायला.
|
थँक्स प्रज्ञा. बरेच दिवसानपासना पॅनकेक मिक्सच अजुन काय करत येइल हा प्रश्न पडला होता. आता हे करुन पाहते.
|
Prady
| |
| Tuesday, November 20, 2007 - 10:05 pm: |
|
|
तृप्ती त्याचे गुलाबजाम पण खूप छान होतात. ईथे मालविकाने दिली आहे रेसेपी किंवा गूगल सर्च करून पण मिळेल. मी केले नाहीत पण खाल्ले आहेत. छान लागतात गुलाबजाम पण.
|
प्रज्ञा, खुपच छान झाले बटर आम्हला दोघाना फ़ार आवड्ले काल केले होते ते आज फ़स्त हि झाले
|
Neerma
| |
| Saturday, February 02, 2008 - 8:01 pm: |
|
|
प्रज्ञा, तुम्ही दिलेल्या प्रमाणात किती बटर होतात हे सान्गू शकाल का?
|
Suyog
| |
| Monday, February 04, 2008 - 12:53 am: |
|
|
here is the demonstration. http://www.youtube.com/watch?v=POx_roipZNU&feature=related Trying to make it today
|
Amruta
| |
| Monday, February 04, 2008 - 5:04 pm: |
|
|
वा!! काय दिसतायत बटर. नक्किच करुन बघेन.
|
Chioo
| |
| Tuesday, February 19, 2008 - 1:05 pm: |
|
|
दिनेशदा, मी तुमच्या कृतीने बटर केले. खूप छान झाले. निम्मे तर नुसते जाता-येता खाऊन संपले. पण हे microwave oven मधे करता येतील का? त्याचे कोणते setting वापरावे लागेल?
|
Amruta
| |
| Tuesday, February 19, 2008 - 3:40 pm: |
|
|
मी पण केले बटर पॅनकेक मिक्सचे. मस्त एकदम बेकरीसारखे झालेले. पटपट संपले.
|
Dineshvs
| |
| Tuesday, February 19, 2008 - 4:09 pm: |
|
|
चिऊ, माझे मायक्रोवेव्हमधे फ़सले होते. आतुन कडक झाले पण वरुन मऊ आणि चिवट झाले.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|