|
तीन पिकलेली केळी एक वाटी घट्ट गोड दही दोन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे किंवा ठेचलेली मिरची मुठभर कोथिंबीर मीठ, साखर चवीनुसार केळी सोलुन बारीक कापावीत.वरील सर्व साहित्य मिसळून कालवून घ्यावे. पटकन होते आणि नेहमीच्या कोशिंबीरींपेक्क्षा थोडा change म्हणून छान लागते. १)आवडत असेल तर अर्धी वाटी खवलेला नारळ घालावा. २)एक सफ़रचंद बारीक चिरुन कोशिंबीरीत घालून वरून डाळींबाचे दाणे घालून सजवावे.पार्टीसाठी सुंदर डिश होते. ३)जीरे भाजून केलेली पूड किंवा चाट मसाला घालून ही वेगळी चव लागते.
|
Dineshvs
| |
| Sunday, January 28, 2007 - 11:05 am: |
| 
|
यात काहि जण, फ़ेसलेली मोहरी पण घालतात.
|
Prajaktad
| |
| Sunday, January 28, 2007 - 1:27 pm: |
| 
|
सोनु ! अशीच पेरुची हि कोशिंबीर करता येते.आमच्याकडे पुर्वी गौरी च्या नवैद्याला ५ कोशिंबिरी , ५ चटण्या असा बेत असायचा.तेव्हा मग केळाची कोशिंबीर असायची फ़क़्त दही साखर आणी केळ.
|
प्राजक्ता, यात खूप विविधता आणता येते.दह्या ऐवजी एका लिंबाचा रस,एक चमचा जीरे भाजून केलेली पुड, सफ़रचंदासोबत पेरूच्या फ़ोडी करून घातल्यास फ़्रुट चाट सारखी लागते
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|