Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
मासवड्या

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » खमंग » मासवड्या « Previous Next »

Arunima
Monday, November 21, 2005 - 7:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मासवड्या :

पातवड्यांसारखे पीठ ताटावर पसर्‍अले कि मग त्यावर भाजलेले मिक्सर मध्ये बरिक केलेले तीळ आणि भाजलेला खोबरयाचा किस, काळा मसाला / गरम मसाला, किंचीत मीठ, बारिक चिरलेली कोथींबीर ह्यांच आधी करुन ठेवलेल सारण पसरवायच. आणि मग त्याचा रोल करुन त्याच्या वड्या पाडायच्या.

ह्या प्रकारात रोल करावा लागत असल्यामुळे ताटावर पीठ पसरवल तर रोल करायला थोड अवघड पडेल. त्यामुळे नवीन करणारयांनी ओल्या पातळ कापडावर पीठ पसरवून नंतर ते कापड हळूहळु काढुन घेत त्याचा रोल केला तर वड्या करण सोप जाइल.

मला खुप नीट explain नाहि करता आलय. पण थोडि मदत होईल अशी अपेक्षा.


Megha16
Monday, November 21, 2005 - 9:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निवेदीता
Thanks,
अग खुप दिवसापासुन ही रेसीपी हवी होति.
तु दिलेल्या सारनात शेंगदाने नाही घालायचे का?तस मला पण जास्त काही माहीत नाही माझी आजी करायची त्यात बहुतेक ती दाणे पन घालायची.
बर झाल तु थोडफार तरी सांगीतल,या
w/e ला करायची आहे.

Arunima
Tuesday, November 22, 2005 - 2:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा अग नासिक, नगरकडे मी तरि दाणे घातलेले बघितले नाहित. पण तु ट्राय करुन बघु शकते. हा प्रकार इतका छान लागतो, दाण्यांशिवायहि. करुन बघ आणि सांग. मीहि आईला विचारुन बघते आणि जर काहि अजुन ऍड करायच असेल तर पोस्ट करेन.

Dineshvs
Tuesday, January 23, 2007 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्धी वाटी खसखस, एक वाटी तीळ, एक वाटी किसलेले सुके खोबरे हे सगळे खमंग भाजुन हाताने चुरुन घ्यावे. त्यात थोडा वाटलेला लसुण, बारिक चिरलेली कोथिंबीर, चवीला मीठ व साखर घालुन, थोडा काळा मसाला घालावा, हे झाले बाकर.

एक वाटी पाणी उकळायला ठेवुन, त्यात थोडी वाटलेली लसुण, तिखट मीठ हळद हिंग घालुन त्यात एक वाटी बेसन घालावे. चमचाभर तेल घालावे. नीट ढवळुन गुठळ्या मोडाव्यात. झाकण ठेवुन दणदणीत वाफ येऊ द्यावी.
दरम्यान एक मोठा रुमाल ओला करुन, पोलपाटावर पसरावा. हे शिजलेले पिठ गरम असतानाच त्या रुमालावर पसरावे. त्यावर बाकर नीट पसरुन घालावे व हाताने दाबावे. रुमाल उचलुन त्याची वळकटी करावी, व रुमाल सोडवुन घ्यावा. परत रुमालात गुंडाळुन आपोआप थंड होवु द्यावे. थंड झाले कि त्याच्या चकत्या करुन, त्या तळुन घ्याव्यात किंवा त्यावर फोडणी घालावी. रश्श्यात घालुनहि खातात.
पिठ पसरण्याची कृति झटपट करावी लागते. बेसनाला चिकटपणा नसेल तर चमचाभर मैदा मिसळावा. पिठ नीट शिजणेहि गरजेचे आहे, नाहितर वळकटी न जमता त्याचा भगरा होतो. बाकरात तळलेला कांदाहि चुरुन मिसळतात.


Bee
Wednesday, January 24, 2007 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, वर तुम्ही 'बाकर' शब्द वापरला त्यावरुन लक्षात आलं 'बाकर वडी' मधील 'बाकर' हा प्रकार काय आहे. कृती छानच..

Rupali_county
Thursday, January 25, 2007 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश दा आणि बी

आताच भारत वारी हुन आलेय ह्याच पध्दतिने माझ्या आईने मासवड्या बनवल्या होत्या


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators