Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
ब्राऊनी

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केक » ब्राऊनी « Previous Next »

Dineshvs
Saturday, January 20, 2007 - 1:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अर्धा कप अनसॉल्टेड बटर आणि दोन चौकोन अनस्वीटन्ड कुकिंग चॉकलेट एकत्र करुन डबल बॉयलर मधे वितळुन घ्यायचे.
स्लाईटली सॉल्टेड बटर व नेहमीचे चॉकलेट वापरले तरी चालेल. फक्त मग पुढचे साखर आणि मीठ कमी करायचे.
त्यात एक कप साखर, दोन फ़ेटलेली अंडी, पाऊण कप मैदा, आवडीचा ईसेन्स घालावा. नीट मिसळावे. चिमुटभर मीठ घालावे.
अर्धा कप आक्रोडाचे तुकडे जरा भाजुन घ्यावेत. तेहि त्यात मिसळावे.

आट ईंच चौकोनी बेकिंग ट्रे घेऊन त्याला लोणी लावावे, त्यात हे मिश्रण ओतुन, ३५० F वर २५ ते ३० मिनिटे बेक करावे.
यात मनुका वैगरे घालता येतील. रम देखील घालता येईल.
हि एक बेसिक कृति. आपल्या आवडीनुसार बदल करता येतात.
तसेच वर आवडीप्रमाणे टॉपिंग करावे.



Priyab
Tuesday, January 30, 2007 - 8:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश brownie try करुन पाहिलि चविला चांगलि झालि होति..पण थोडि कडक झालि होति... double boiller च्या ऐवजि microwave मधे मि सगळे melt करुन घेतले होते..
It was good for the first time I felt..may be next time अजुन improvement होइल
do you think boiler च हवे melt करायला??


Manuswini
Tuesday, January 30, 2007 - 9:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

madhye ram ghaatalee ek chhaan chav nee softness येतो.

न घालता पण होते चांगली. पण माहीत नाही तुझी कडक का झाली
दिनेशदा सांगतीलच पण next time तु रम घालुन बघ.
त्याला soaking period म्हणतात.

माझी एक recipe आहे ती लिहिते मी नंतर.


Manuswini
Wednesday, January 31, 2007 - 12:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही घे brownie recipe with rum, tried n tested. This really comes out shiny, soft inside and crispy outside., if you don’t want to use rum then also fine.
मी ह्या साठी नेहमी माझे measuring cup वापरते. काही गोष्टी measure करुन केलेल्या बर्‍या baking मध्ये.
२०० gram मैदा(जवळ जवळ सव्वा दोन कप),
४ medium अंडी,
२२५ grams unsalted (must) butter, try using Crisco vegetable shortenings if you want less fat ,
४५ ग्रम unsweetned original cocco, try getting bitter taste cocco , I like this bitter taste original cocco as in my experience brownie comes out well.
५० ग्रम कुठलेही dark choclate, I used dark choclate with rum till date (godiva has dark chocolates or ghirardelli) .

३५० ग्रम brown sugar ,
४ tbs whole milk ,
१ tsp vanilla essence ,
१ चमचा बेकिन्ग सोडा,
४ tbs रम,
चविपुरते मिठ,

कृती:
१) २ tbs बटर वितळवुन warm असतानाच त्यातच रम टाकुन whisk करुन घे नी बाजुला ठेव.
२)जर double boiler नसेल तर एक जाड बुडाचे भांडे घेवुन त्यात पाणी टाकुन उकळ मग दुसरे भांडे त्यावर ठेवुन त्यात वरती उरलेले वितळलेले बटर, दूध, dark choclate टाक. दूध टाकल्याने चकाकी येते. हे पण छान whisk कर नी बाजुला ठेव.
३)मैदा, सोडा, कोको पॉवडर mix करुन तीनदा चाळुन घे.
४)आता अंडी फोडुन चांगलीच फेट( use electric egg beater, egg should eventually look baby yellow , मग ह्यातच साखर टाकुन फेट, जितके ज्यास्त फेटशील तेव्हढे हलके होवुन light yellow दिसेल. vanilaa essence टाक.
५)आता ह्या अंडी मिश्रणातच हळु हळु कोको पॉवडर,मैदा टाक. बीट करत रहा, आता spatula वापर. सगळे छान mix झाले कीथोडे(२ त्ब्स) रम नी बटर मिश्रण टाक, आता हे जवळ जवळ २० ते २५ मिनीटे soak कर,
६)नंतर oven 350 degree वर १० मिनीटे चालु करुन हे mix बटर लावलेल्या pan मध्ये ओतुन बेक कर ३० ते ३५ मिनीटे. मिश्रण खुप चकक्चकीत दिसते जर छान फेटले असेल तर.

कूल झाल्यावर उरलेले रमचे मिश्रण warm करुन ओत नी पुन्हा थंड कर.

नक्की करुन बघ.




Dineshvs
Wednesday, January 31, 2007 - 2:23 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

डबल बॉयलरच हवा असे नाही. पण तसे केले तर जास्त चांगले.
रम घालुन चव चांगली येते हे खरेच. माझ्यासकट अनेक जणांचा असा समज असतो, कि रम म्हणजे दारु.
पण जेंव्हा आपण केक वैगरे मधे रम वैगरे घालतो, तेन्व्हा खाईपर्यंत त्यातले सर्व अल्कोहोल उडुन गेलेले असते.


Shonoo
Wednesday, January 31, 2007 - 4:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ghirardelli चे ब्राउनी मिक्स चे पाकीट मिळते. त्याने पण एकदम मस्त होतात ब्राउनी. त्यावर लिहिल्या प्रमाणे अंडे, तेल, पाणी घातले की झालं. वजनं, मापांची भानगड नाही. prep time is less than 5 minutes!

Me_mastani
Tuesday, December 11, 2007 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा, वरील रेसिपी अंडे न घालता करता येते का?

Dineshvs
Wednesday, December 12, 2007 - 3:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अंड्याच्या जागी, एक सपाट चहाचा चमचा बेकिंग पावडर वापरता येईल.

मिश्रण खुप फ़ेटणे महत्वाचे. असे केले कि त्यात हवा मिसळली जाते, आणि त्याचे बुडबुडे तयार होतात. अंडे घातले कि हे बुडबुडे टिकुन राहतात. अंडे नाही घातले तर ते कमी होतात इतकेच.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators