|
Varsha11
| |
| Friday, January 12, 2007 - 10:59 am: |
|
|
कोलंबीचे लोणचे साहित्य कोलंबी, तिखट, मीठ, हळद, तेल (नेहमीपेक्षा जास्त), मोहरी, हिंग, थोडे मेथीचे दाणे, चिंचेचा घट्ट कोळ. क्रुती कोलंबी दोरे काढून, धुवुन घेणे. त्यातील पाणि जेव्हढे काढता येइल तेव्हढे काढून घ्यावे. कोलंबीला तिखट, मीठ, हळद लावुन अर्धा तास ठेवावे. नंतर तेल जरा जास्त घेऊन हिंग, मोहरी, मेथी घालुन फोडणी करुन त्यात कोलंबी टाकयची. झाकण ठेऊन शिजवावी. थोडी शिजली की त्यात चिंचेचा कोळ घालायचा. * चिंचेचा कोळात पण पाणि नसावे. हे लोणचे करताना पाण्याचा वापर करु नये व हे लोणचे फ़्रिज़ मध्ये २-३ दिवस चांगले राहते. (सर्व साहित्य आपल्या आवडीनुसार घ्यावे. हे लोणचे तिखट्- आंबट असे लागते.)
|
Megha16
| |
| Friday, January 12, 2007 - 2:49 pm: |
|
|
thanks वर्षा रेसीपी वाचुन तर तोंडाला पाणी सुटल... केल्यावर सांगते तुला......
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|