Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through February 13, 2006

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » थाई » Archive through February 13, 2006 « Previous Next »

Megha16
Tuesday, November 29, 2005 - 3:42 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कुणाला थाई रेसीपीज माहीत आहे का?
असल्यास इथे रेसीपीज टाकावीत.
२-३ दिवसा पुर्वी एकाकडे थाई करी खाल्ली.
छान होती एकदम.कशी करायची माहीत नाही.थाई रेसीपीचा वेगळा मसाला आहे का?असल्यास कुठे मिळतो?

Sai
Tuesday, November 29, 2005 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

थाई मसाला साधारण पणे ओरिएन्ट्ल दुकानात मिळतो.Curry Paste ह्या नावाने. बरेच प्रकर आहेत , पण सुरुवातीला Green किन्वा Red वापरुन बघायाला हरकत नाही
साधारणपणे पध्धत अशी ,
मला प्रमाण मोजून मापून लिहीता येत नाही तेव्हा अन्दाजानेच!
थोडे chicken --अन्दाजे १ Pound
२/३ चमचे Curry Paste
0.5 Tin नारळाचे दूध
थोडा Fish Sauce(नसल्यासsoya sauce वापरावा)
चिमुटभर साखर
आवडत असेल तर थोडी पुदीना पाने
कढईत थोडे नारळाचे घट्ट्सर दूध घेवून गरम करावे उकळी येऊ देऊ नये.
त्यात Curry Pasteघालून खमन्ग वास सुटे तोवर परतावे
त्यात chicken घालुन थोडे परतावे , हव्या असल्यास काही भाज्या पण घालता येतील.
chicekn पान्ढरे दिसू लागले की आवडी प्रमाणे अजून नारळाचे दूध घलवे --हे दूध पातळ चालेल
मना इतका रस्सा ज़ाला की त्यात थोडे Fish Sauce- नसल्यास Soya Sauce घालावा
थोडी साखर घालावी

चव घेऊन मगच मीठ हवे का ते ठरवावे , बहुतेक वेळा लागत नाही

वर पुदिन्यची पाने चिरून टाकावीत
google var baryaach recipes aahet



Megha16
Tuesday, November 29, 2005 - 8:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय सई
ओरीन्टल शॉपस म्हणजे नक्की कुठे ग?
मला माहीत नाहीत म्हणुन विचारत आहे.
तस मी पण गुगल वर बरयाच रेसीपी शोधल्या आहेत.
सई तु कुठे असतेस ग


Rachana_barve
Tuesday, November 29, 2005 - 9:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Ranch 99 मध्ये try करून बघ..

Sai
Tuesday, November 29, 2005 - 10:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय मेघा,
अग , ओरिएन्टल दुकन म्हणजे , chinese or Asian stores ...
अमेरिकन दुकानात पण मिळेल कदचित .. पण मी Try नाही केले

btw मी Chicago-Schaumburg मधे आहे .. तू?

Megha16
Thursday, December 01, 2005 - 6:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय सई
Thanks मी पाहीन Chinese Store मधे.
मी
Lodi,NJ ला राहते. आणी सध्या घरी बसुन माश्या मारायच काम करते

Raahul80
Thursday, December 01, 2005 - 7:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बापरे NJ मधे माश्या आहेत?
मला कसकाय नाही दिसल्या?


Megha16
Monday, December 05, 2005 - 3:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय सई
अग मी आमच्या इकडे कोरीन मार्केट मधे शोधला अग करी पेस्ट मसाला पन मिळाला नाही.मग आम्ही करी पावडर अस आणल चालेल का हा पन.
अरे राहुल मी घरी बसुन माश्या मारते ना म्ह्णुन तुला दिसल्या नाहि


Sai
Monday, December 05, 2005 - 7:54 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग , बहुतेक Curry Powder नाही चालणार :-( पण Thai मसाला ओळखायची सोप्पी खुण म्हणजे , Green Curry किन्वा "Red Curry"अशी रन्गान्ची नावे असतात
चल बकि नन्तर लिहिते , आज जरा Busy आहे:-((

Sas
Tuesday, December 06, 2005 - 7:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Koni शाकाहारी Thai Recepies सांगेल का without egg,
chiken,meat,beef,pork.....


Moodi
Tuesday, December 06, 2005 - 7:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

sas तु थाई मसाला न्युडल्स मध्ये वापरु शकतेस की. मी तसाच आणते suitable for vej / vegans असा. तु पण आणुन बघ. मात्र कोरडा बघ, कदाचीत पेस्टमध्ये फिश सॉस वगैरे असु शकतो.
अन जमल्यास पनीर, टॉमेटो, कांदा अश्या पनीरच्या डिशमध्ये वापरुन बघ.


Shmt
Tuesday, December 06, 2005 - 7:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Sai: Thai Kitchen brand cao baroca product jewel, dominicks stores maQyao imaLtat. %yaaMcao curry paste, noodles, ready to eat p`kar baiGatlao Aahot. %yaaMcaI site pNa Aaho. maI kQaI Gaotlao naahIt.
Sas: site vartI bayaa-ca receipe imaLitla. tu %yaa vaogavaogaL\yaa Baajya Gaalauna kÉ Xaktosa.
cau.Bau.Va.Gyaa.


Asawari
Wednesday, December 28, 2005 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मेघा मी थाइ सूपची रेसिपि दिली आहे सूपच्या विभागात. जर तुला थाई आवडत असेल तर हे सूप आवडेल

Me_mastani
Thursday, January 05, 2006 - 4:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Hi, Thai restaurant madhe "Fried tofu in peanut Sauce" ha prakar mala khup aavadala. Peanut sauce chi recipe konala mahiti aahe ka?

Dineshvs
Thursday, January 05, 2006 - 4:53 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मस्तानी, पीनट सॉसची चव आपल्या हातात असते. तयार पीनट बटर वापरता येईल, पण जास्त ओरिगिनल चव हवी असेल तर ताजे शेंगदाणे वापरुन करता येतो.
शेंगदाण्याचे तेल तापवुन त्यात शेंगदाणे तळुन घ्यायचे. हे अजिबात न करपता सोनेरी रंगावर कुरकुरीत तळले गेले पाहिजेत. आपल्या पद्धतीने भाजुन सोलुन परतले तरी चालतील.
मग थंड करुन ते ब्लेन्ड करायचे. त्यावेळी त्यात लाल मिरच्यांचे फ़्लेक्स, आल्याचे तुकडे वा रस, लसुण आणि सोया सॉस घालायचा. चवीसाठी थोडी साखर व अगदी आयत्यावेळी थोडी बारिक चिरलेली कोथिंबीर घालायची. या सगळ्या कच्च्या मसाल्याचा स्वाद चांगला लागतो. लिंबाचा रसहि घालायचा. यात थोडे कोकोनट क्रीम पण घालतात, त्याने तेलकटपणा कमी होतो. हे घटक चवीप्रमाणे कमी जास्त करुन आपली चव आणायची.
हे, पण आपली दाण्याची चटणी अशीच करतात कि !


Me_mastani
Thursday, January 05, 2006 - 5:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you very much Dineshbhau...


Dineshvs
Sunday, February 12, 2006 - 11:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काहि थाई शाकाहारी पदार्थ.

थाई रेड करी

चार सुक्या कास्मिरी मिरच्या, ऊघडुन बिया काढुन कोमट पाण्यात दहा मिनिटे भिजवाव्यात. एक छोटा कांदा कापुन घ्यावा. आठ दहा लसणाच्या पाकळ्या सोलुन घ्यावा. मोठ्या असतेल तर चारच घ्याव्यात. अर्धा ईंच आले तुकडे करुन घ्यावे. लेमन ग्रास मिळाले तर एक काडी बारिक कापुन घ्यावी. आपल्याकडे बाजारात गवती चहाच्या पाती विकायला असतात, त्याचे झुडुप जवळ असले तर त्याचा जमीनीकडचा भाग घ्यावा. ( आपल्याकडे बाजारात फ़क्त पानेच विकायला असतात. ) ते नाही मिळाले तर एका छोट्या लिंबाची फ़क्त पिवळी साल किसुन घ्यावी. त्याच्या आतला पांढरा भाग घेऊ नये. दीड चमचा धणे, अ चमचा जिरे व पाच सहा मिरीदाणे जरा शेकुन घ्यावेत, पण आपल्यासारखे खमंग भाजु नयेत.
या सगळ्याची पेस्ट करायची आहे मिक्सरमधे केली तर आधी धणे, जिरे व मिरे बारिक करुन घ्यावे, व नंतर बाकिचे सामान घालावे. मिरच्या भिजवलेलेच पाणी वापरावे.
शक्य असेल तर दगडी खलात हे वाटावे. तो नसेल तर एखादा गोल दगड तरी घरात ठेवावा. ( तो ठिसुळ नसावा, नाहितर वाटणात त्याचे तुकडे येतात. ) दगडी खलात वाटले तरच याला छान चव येते.

आता मिळत असेल तर १०० ग्रॅम टोफ़ु किंवा पनीर तलोन घ्यावे. भाज्यांमधे बेबी कॉर्न, एक गाजर, आठ दहा ब्रोकोलि चे तुरे पाच सहा मश्रुम घ्यावेत, भाज्या आपल्या आवडीप्रमाणे घ्याव्यात. बांबुचे कोंब घेतले तर टिनमधले घ्यावेत. ताजे कोंब विषारी असतात व ते चोवीस तास कापुन पाण्यात भिजवुन ठेवावे लागतात. सगळ्या भाज्या कापुन घ्याव्यात.

तेल तापवुन त्यात हि रेड पेस्ट घालावी व परतावी. मग भाज्या घालाव्यात आणि एक कप नारळाचे दुध घालुन भाज्या शिजु द्याव्यात. मग त्यात आणखी एक कप नारळाचे दुध, अर्धा चमचा सोया सॉस, आणि लिंबाची पाने पाच सहा घालावीत. व भाज्या शिजु द्याव्यात ( ही लिंबाची पाने काफ़िर लाईम नावाच्या एका वेगळ्या लिंबाची असतात. त्यांचा आकार 8 सारखा असतो. या लिंबाचा आकार अगदी छोटा असतो व त्यात रस फ़ारच कमी असतो. लिंबापेक्षा पानाचाच ऊपयोग करतात. हि पाने नाही मिळाली तर कडीपत्ता वापरावा. ) भाज्या नीट शिजल्या कि तळलेले पनीर वा टोफ़ु घालावे. चवीप्रमाणे मीठ घालावे. चवीपुरती साखर व लिंबुरस घालावा. वरुन बासिल पाने किंवा तुळशीची पानी आठदहा घालावीत. भाताबरोबर खावी.

थाई ग्रीन करि

या करीची कृति वरच्याप्रमाणेच फ़क्त लाल मिरचीच्या ऐवजी हिरव्या मिरच्या आठ दहा घ्याव्यात.

भाज्यामधे झुत्सीनी, फ़रसबी, छोटी वांगी वैगरे घेता येतील.

थाई क्रिस्पी भाज्या

पाव कप तांदुळ वा तांदळाचे पीठ घ्यावे. पीठ मंद आचेवर जरा भाजुन घ्यावे. किंवा तांदुळ तसेच कोरडे भाजुन त्याचे पीठ करुन चाळुन घ्यावे. त्यात एक लेमन ग्रास बारिक चिरुन घालावे. पाऊण कप कॉर्न फ़्लोअर, एक टेबलस्पुन सोया सॉस, अर्धा चमचा मिरची पुड ( शक्यतो भरड, म्हणजे फ़्लेक्स ) व मीठ घालुन त्यात साधारण पाऊण कप थंडगार पाणी घालावे.

एक टेबलस्पुन लिंबाचा रस, एक टेबलस्पुन तेल, ४ कास्मिरी मिरच्या, १ टेबलस्पुन ब्लॅक बीन सॉस ( बाजारात मिळतो ) ३ टेबलस्पुन तयार मॅंगो चटणी वा चिंचेचा कोळ, १ टेबलस्पुन सोया सॉस, १ ईंच दालचिनी, एक टेबलस्पुन टोमॅटो केचप, एक टेबलस्पुन मध आणि मीठ हे सगळे बारिक वाटुन घ्यावे. बीन सॉस नाही मिळाला तर सोया सॉस जास्त घालावे.

आता फ़्लॉवर, ब्रोकोलि, मश्रुम, बेबी कॉर्न, सिमला मिरच्या, भेंडी, वांगी याचे लांबट तुकडे करुन घ्यावेत. सर्व भाज्या साधारण चार कप असाव्यात.

या सगळ्या भाज्या कॉर्नफ़्लोअरच्या मिश्रणात बुडवुन तेलात कुरकुरीत तळुन घ्याव्यात. काहि सिमला मिरच्यांचे तुकडे बाजुला ठेवावेत.

खायच्या वेळी तेल तापवुन त्यात १ टेबलस्पुन लसुण पेस्ट घालावी. एका कांध्याचे आठ तुकडे करुन परतावेत, त्यात सिमल्या मिरच्यांचे बाजुला ठेवलेल तुकडे घालावेत
मग त्यात वाटण घालावे. २ मिनिटे परतुन त्यात पाव कप पाणी घालावे. त्यात तळुन घेतलेल्या भाज्या घालुन हलक्या हाताने परतावे. वरुन बसिल वा तुळशीची पाने घालावी. हवी तर फ़ोडणीत एखादी हिरवी मिरची परतुन घ्यावी.



Vaishali_hinge
Sunday, February 12, 2006 - 1:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमची रेसिपी वाचणे एखादी कवीता वाचल्यासारखेच वाटते...

Anjalisavio
Monday, February 13, 2006 - 4:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश Thai chilli sauce मिळतो तो कसा करायचा. माझी मुले तोच जास्त खातात. मला ठाण्यात big Bazar मधे दोनच बाटल्या मिळाल्या होत्या. हा ईतर chilli sause सारखा तिख़ट नाही म्हणुन मुले कदाचित आवडिने खात असतिल. दिसायला पण छान दिसतो.

Dineshvs
Monday, February 13, 2006 - 4:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याचे दोन सोपे प्रकार देतो.
लिंबाएवढा चिंचेचा कोळ घेऊन त्यात थोडे पाणी घालुन जरा ऊकळायचे ते गाळुन अर्धा कप गुळ घालायचा आपल्या चवीप्रमाणे मीठ व लाल तिखट घालायचे व परत जरा आटवायचे.

दुसरा प्रकार
२ टेबलस्पुन व्हीनीगर घेऊन त्यात १ कप पाणी व पाऊण कप साखर घालुन पाक करायचा थंड झाले कि त्यात मीठ व भरड मिरचीपुड घालायची. हे पाचसहा तास तरी मुरायला हवे.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६






 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators