|
Rava Idli: 2 cup rava, 1 tbs chana DaL, 1tbs urad Dal, 7-8 curry leaves, 2 tbs. oil, pinch of hing. rai. dahi Pratham tel taaplyaavar mohari,hing ghaalun khamang phoDaNi karavi tyaat curry leaves, chaNa, urad DaL ghaalun lal hoiparyant partaave. tyaat rava ghaalun thoDa bhaaju dyava.thoDa paandharatch bhaajaava. nanter he mishran dahyaat kaalvaave. salt ghaalaave. 15 min. nanter chimutbhar khaayachaa soDa ghaalun Idlipatraat vaafvun ghyaavyaat . Chaan idlyaa tayaar. Halli microwave egg boiler miLato tyaat idliche he batter ghaalun 1:30 min. microwave madhe thevaave. chaan pluffy idlyaa hotaat. Try it and let me know.
|
Dineshvs
| |
| Wednesday, December 13, 2006 - 5:43 pm: |
|
|
रवा इडली. दोन वाट्या मध्यम जाडीचा रवा घ्यावा. त्यातला पाव वाटी रवा वेगळा काढुन, तो कोमट पाण्यात भिजत घालावा. उरलेला रवा, दोन चमचे तुपावर मंद आचेवर रंग न बदलता परतुन घ्यावा. तुप सगळीकडे लागले पाहिजे. तो थंड झाला कि त्यात एक वाटी आंबट ताक घालावे. ताक पुरेसे आंबट नसेल तर त्यात अर्धे लिंबु पिळावे. आधी भिजत ठेवलेला कच्चा रवा त्यात मिसळावा. ( आधी जर साध्या इडल्या वा डोसे केले असतील तर त्यातले पाव वाटी पिठ, अश्या रव्या ऐवजी वापरावे. ) सगळे मिश्रण तासभर तरी भिजवावे. मग त्यात मीठ घालावे. एक मोठा चमचा चण्याची डाळ, तेलात परतुन ती त्यात मिसळुन घ्यावी. चिमुटभर हिंग टाकावा. पाणी उकळत ठेवावे. इडलीच्या स्टॅंडला तेलाचे बोट लावुन ठेवावे. पाण्याला उकळी आली कि, अर्धा चमचा सोडा पिठावर पसरुन टाकावा, व एकाच दिशेने ढवळावे. मग भराभर साच्यात थोडे थोडे पिठ घालुन पंधरा मिनिटे वाफवावे. वाफवायला ठेवण्यापुर्वी, प्रत्येक इडलीवर थोडे ओले खोबरे, गाजर वा लाल भोपळ्याचा किस, एखादा काजु वैगरे ठेवावे. गाजर घ्यायचे ते केशरी घ्यावे. लाल गाजराने कडवट चव येते. जर बारिक किस असेल तर तसाच सर्व पिठात मिसळला तरी चालेल. जाड असेल तर जरा परतुन मिसळावा. याने छान केशरी रंग येतो. अर्धा चमचा साखर पण घालावी. एवढ्या पिठाला एका मध्यम गाजराचा किस लागेल. एक वाटी पालकाची पाने, घेऊन. तेलावर दोन हिरव्या मिरच्या टाकुन त्यावर चिमुटभर हळद घालुन, परतुन घ्यावीत. फार परतु नयेत, मग ती वाटुन घ्यावीत. व पिठात मिसळुन घ्यावीत. याने छान पिस्ता रंग येतो. एवढ्या प्रमाणात आठ इडल्या होतील.
|
Prajaktad
| |
| Wednesday, December 13, 2006 - 7:41 pm: |
|
|
दिनेशदा ! इडली रवा चालेल का?का नुसताच इडली रवा फ़ारच जाड होईल..
|
Dineshvs
| |
| Thursday, December 14, 2006 - 1:29 am: |
|
|
नाहि हा गव्हाचा रवा. नेहमी शिर्याला वापरतो तो.
|
प्राजे, ही इडली खूप छान होते व लागते try कर. no fermentation required म्हणून पटकन होते सुद्धा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|