|
Moodi
| |
| Tuesday, September 26, 2006 - 11:43 am: |
|
|
सफरचंद पुडिंग : १ सफरचंद, ३ कप ब्रेडचा चुरा, दिड कप दुध, २ अंडी, केकमध्ये घालायचे ड्रायफ्रुटस २ चमचे, 7-8 काजु, बेदाणे, मनुका, ५ टेस्पुन साखर. कृती : सफरचंदाची साल काढुन बारीक चिरा. ब्रेडचा चुरा गरम दुधात भिजवा. नंतर त्यात फेसलेली अंडी, साखर, काजु, बेदाणे, मनुका, ड्रायफ्रुटस घाला. मोल्डला पातळ लोणी वा तुपाचा हात फिरवुन हे मिश्रण त्यात घाला व गरम ओव्हनमध्ये ३० मिनिटे बेक करा. नंतर सुरी घालुन पहा. काही न चिकटता निघाली की पुडिन्ग झालय असे समजा. हे वाफवुन पण करता येते. मात्र वरुन बटर पेपर बांधा अन ३० ते ३५ मिनिटे वाफवा.
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 13, 2005 - 1:41 am: |
|
|
सफ़रचंदाच्या पुडिंगचा एक प्रकार. कुठलिही सफ़रचंदे बिया काढुन ऊकडायची. ती कुस्करुन त्यात चवीप्रमाणे साखर घालुन आटवायचे. ब्रेडचा चुरा लोण्यात परतुन घ्यायचा. मग ऊंच ग्लासात. या दोन्हीची थरावर द्यायचे. वरचा थर पावाच्या चुर्याचा असावा. दाबुन बसवावे. थोडा वेळ सेट होवु द्यावे. वरुन क्रिम घालावे. व संत्र्याची साल कातरुन घालावी.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|