|
Jagu
| |
| Friday, November 24, 2006 - 7:18 am: |
|
|
रवा उत्तप्पा १ वाती रवा रवा भिजेल एवढे दूध टोमटो कांदा मिरची कोथींबीर मिठ टोमटो, कांदा, मिरची कोथींबीर बारीक चीरुन घ्यावे, दूध टकून रवा भिजवून घ्यावा, सर्व एकत्र करुन उत्तप्पे टकावेत.
|
Manuswini
| |
| Thursday, March 27, 2008 - 4:24 am: |
|
|
प्राजक्ता, लाल भोपळी मिरचीचे काय करायचे विचारत होती. मी बोर झाले की घरात असेल नसेल त्या भाज्या उत्तप्प्यावर घालते(काय हा जंगलीपणा ना असे म्हणाल ना.. शेवटी जिभेला चांगले लागल्याशी मतलब). एक वेगळेपणा म्हणून मी 2:1 तांदूळ नी उडीद घेवून हा उत्तप्पा बनवला. त्यावर कांदा, broccolli, लाल मिरचीचे तुकडे(उरलेली होती म्हणून टाकली )
|
Prajaktad
| |
| Thursday, March 27, 2008 - 2:51 pm: |
|
|
ग्रेट! मने तुझ्याकडे जेवायलाच यायला पाहिजे आता..उरक दांडगा आहे तुझा.. उत्तपा छान फ़्लपी किंवा स्पॉंजी होण्यासाठी काय करावे... टिपा द्या..
|
Maitreyee
| |
| Thursday, March 27, 2008 - 3:55 pm: |
|
|
मनु काय गं हे! तू गर्रम तव्याला हात लावलायस चक्क? कसं काय
|
Manuswini
| |
| Thursday, March 27, 2008 - 4:53 pm: |
|
|
अग मैत्रेयी, जवा हाताला चटके तवा मिळतो उत्तप्पा (नवीन वर्जन ऑफ़ दी सॉन्ग. अग तव्याला कुठे हात आहे जस्ट जवळ आहे.
|
Manuswini
| |
| Thursday, March 27, 2008 - 4:56 pm: |
|
|
spongy? उत्तप्याला 2:1 तांदूळ नी उडीद घेवून डाळ मस्त पानी कमी घालून वाटायची. तांदूळ सुद्धा अगदे कमी घालून वाट. हाताने मिक्स कर. मिश्रणाला चांगला फेस दिस्तो. मिश्रण घट्ट ठेवून जाड घालायचे तव्यावर.
|
Chioo
| |
| Friday, March 28, 2008 - 8:59 am: |
|
|
मनु, जरा सविस्तर सांगणार का? म्हणजे डाळ आणि तांदूळ वाटायच्या आधी किती वेळ भिजवले आणि नंतर किती वेळ आंबवले ते.
|
तांदूळ एक अक्खा दिवस(आदल्या रात्री ते दुसर्या रात्री वाटेपर्यन्त) भिजत ठेव नी डाळ सुद्धा. पण हे US साठी आहे. आता मुंबईत काहीच्या काही उकडत असेल (होळीनंतर) तेव्ह सकाळी घाल नी रात्री वाट. हातानी घोट. रात्री ठेव वाटून नी सकाळी कर.
|
Chioo
| |
| Monday, March 31, 2008 - 10:09 am: |
|
|
मनु, लग्गेच उत्तर दिल्याबद्दल धन्यवाद. आणि मीपण हे केले. थंड ठिकाणी रहात असल्याने मी जास्त वेळ भिजवले. उत्तप्पा मस्त spongy झाला होता. आणि जाळीही खूप छान पडली. तुझी ती फेटायची टिप मस्त आहे. मी फक्त व्हिपरने फेटले. आळशीपणा. :P
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|