|
Dineshvs
| |
| Wednesday, November 22, 2006 - 5:53 pm: |
|
|
पाव किलो पनीरचे एक ईंच लांबी रुंदीचे तुकडे. पनीर घट्ट असावे. सहज कापता आले पाहिजे. घरगुति वापरायचे असेल तर एक कप छान्याला एक चमचा मैदा घालुन ब्लेंड करावे आणि वजन ठेवुन पाणी काढुन टाकावे. एक कप घट्ट दही वा चक्का फ़ेटुन घ्यावा. त्यात एक चमचा लाल काश्मिरी तिखट, चिमुटभर ओवा. एक चमचा तंदुरी मसाला, मीठ, चिमुटभर साखर, थोडा हिंग घालुन फ़ेटुन घ्यावे. पनीरच्या तुकड्याना एक ईंच आले, तीन चार लसुण पाकळ्या व एखादी हिरवी मिरची यांचे वाटण चोळुन घ्यावे. चोळताना अर्ध्या लिंबाचा रस घालावा. मीठहि लावावे. दहा मिनिटाने पनीरचे तुकडे फ़ेटलेल्या दह्यात घालावे. हलक्या हाताने मिसळुन, झाकुन फ़्रीजमधे तासभर तरी ठेवावे. दोन सिमला मिरच्या, दोन मोठे कांदे, आणि दोन घट्ट टोमॅटो यांचे पनीरच्या आकाराचे तुकडे करावे. या सर्व तुकड्याना थोडे तेल व मीठ एकत्र करुन चोळावे. थोडे तेल मुरवलेल्या पनीरमधे घालावे. मग बार्बेक्यु स्टिक्स घेऊन, त्यात क्रमाक्रमाने हे सगळे ओवावे. प्रखर विस्तवावर, अधांतरी धरुन गोल गोल फ़िरवत ग्रिल करावे. मसाला सुकला आणि पनीरचे कोपरे काळे झाले कि प्लेटमधे काढावे. त्यावर चाट मसाला शिवरुन खावे. सोबत पुदीन्याची चटणी. बारिक उभा कापलेला कांदा व बीट घ्यावे.
|
Bage
| |
| Monday, January 01, 2007 - 9:59 pm: |
|
|
thanks Dinesh मला वाटत bhagya नी फ़िश टिक्का ची रेसीपी दिली होती. anyways, माझ्याकडे grill नाही आहे मी conventional oven मधे कस grill करु?
|
Dineshvs
| |
| Tuesday, January 02, 2007 - 2:12 am: |
|
|
शक्य असेल तर बार्बेक्यु स्टिक्स मधे ओवुन, त्या कश्याच्या तरी आधाराने अधांतरी ठेवता आल्या तर छान. साधारण १० ते १५ मिनिटात होतील. त्यानंतर म्हणजे मसाल्याचा ओलसरपणा गेल्यावर नॉन स्टिक तव्यावर दोन तीन मिनिटे ब्राऊन होण्यासाठी ठेवावे. शक्य तर यावेळी तेल वापरु नये.
|
Prajaktad
| |
| Tuesday, January 02, 2007 - 5:09 am: |
|
|
किंवा पनिर ओव्हन मधे कोरडे झाले की ओव्हन बंद करुन लो broil सेट वर सगळ्यात वरच्या जाळीवर ठेवावे. छान ब्राऊन होते.
|
Bage
| |
| Wednesday, January 03, 2007 - 12:22 am: |
|
|
thanks Dinesh ,Prajakta . मी try करुन बघते
|
Bage
| |
| Wednesday, January 03, 2007 - 7:04 am: |
|
|
माझ्याकडे sour cream उरल आहे ते ह्या दह्यात mix केल तर चव बिघडणार नाही न
|
Dineshvs
| |
| Wednesday, January 03, 2007 - 10:29 am: |
|
|
नाही बिघडायची. पण जर ते जास्तच उरले असेल तर पनीर टिक्का मसाला करता येईल. सगळी प्रोसेस अशीच फ़क्त वेगळी ग्रेव्ही करावी लागेल.
|
Sonchafa
| |
| Thursday, January 04, 2007 - 5:34 pm: |
|
|
आज पनीर टिक्का घरी बनविण्याचा प्रयोग केला. आणि काय करणे टाळावे हे लक्षात आलं म्हणून इथे लिहीत आहे. मी दोन दिवसापूर्वी पनीर आणून त्यातले अर्धे वापरले होते आणि शिल्लक पनीर पाण्यात घालून ते chilling tray मध्ये ठेवले होते. माझा अंदाज असा आहे की पाण्यात राहिल्यामुळे ते पनीर फ़ारच नरम पडले असणार कारण आगीवर धरल्यावर भरपूर पाणि तर बर्नर वर पडलच ( आई ओरडली हे ओघाने आलच!) पण बार्बेक्यु स्टिक मध्ये अडकवतानच ते मरणोन्मुख झाले होते. टिक्का तयार झाला तेव्हा त्यात प्रमुख्याने सिमला मिर्ची, टोमॅटो आणि कांदा एवढच दिसत होते. दिनेश म्हणतात त्याप्रमाने पनीर बनवतानच त्यात मैदा घातल्यास ते नक्की सोयीचे होईल. किंवा शिल्लक पनीर मधून टिक्का बनवायला जाणे तरी टाळावे. ओवा न सापडल्यामुळे मी त्या ऐवजी शहाजिरे घातले होते आणि त्याचाही स्वाद चांगला लागला.
|
Dineshvs
| |
| Thursday, January 04, 2007 - 6:39 pm: |
|
|
सोनचाफा, अगदी बरोबर, शक्यतो पनीर उरवुच नये. लगोलग वापरुन टाकावं. आपल्या आया मंडळीना सगळं वाटीवाटीभर उरवायची सवय असते. मी आईला म्हणतो, आपल्याकडे कधीहि गौर बसवता येईल. सोळा भाज्या फ़्रीजमधे असतातच.
|
Safaai
| |
| Friday, January 05, 2007 - 12:10 pm: |
|
|
पण ते पनीर पाण्यात का घालून ठेवले? नुसते का नाही ठेवले?
|
Sonchafa
| |
| Friday, January 05, 2007 - 6:28 pm: |
|
|
मला वाटले की पनीर कोरडे पडेल फ़्रिजमध्ये राहून म्हणून पाण्यात ठेवले. आणि ते जर फ़्रीझर मध्ये ठेवले तर फ़ारच कडक होते अमुलच्या पनीरसारखे म्हणून तेही टाळले.. दोन दिवस वापरले जाणार नव्हते म्हणून चिलिंग ट्रे मध्ये ठेवले..
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|