|
मध्यम आकाराची कोलंबी घेउन ती नीट करुन घ्यावी. तिला थोडिशी हळ्द, आल्-लसुण पेस्ट, मीठ लावुन साधारण अर्ध्या तासासाठी ठेवावे. वाटणासाठी १.५ अक्खा लसुण, १.२ इंच आल. ५-६ मिरच्या, कोथिंबीर, ५-६ कढीपत्त्याची पाने, २ चमचे सुख खोबर्याचा किस, १ मध्यम वाटी ओल खोबर, ९-१० पुदिन्याची पाने. हे सर्व एकत्र करुन त्याची बारिक पेस्ट करुन घ्यावी. २ कांद्याच्या उभ्या स्लाइस करुन घ्याव्यात. टोमाटो हवा असल्यास घ्यावा, नाही घेतला तरी चालतो. एका पातेल्यात तेल गरम करुन त्यात कांदा टाकुन परतुन घ्यावा. {ब्राउन्- पिंक दिसेपर्यंत त्यात हळद, तिखट, धना पावडर, बिर्याणी मसाला, गरम मसाल्याची पुड टाकुन परतुन घ्यावी. मग कोलंबी सोडुन हलकेच परतुन घेउन लगेच झाकण थेड्यावेळ ठेवावे असे केल्याने वास तसाच रहातो मग त्यात वाटलेला मसाला घालावा. थोडे पाणी घालुन शिजवुन घ्यावे. भातासाठी: बासमती तांदुळ धुवुन १ तास अगोदर भिजत ठेवावा. एकीकडे थोडेसे काजु, कांद्याच्या उध्या स्लाइस तळुन घ्याव्यात. पुदिना बारिक चिरावा. एका पातेल्यात साजुक तुप घ्यावे. त्यात अख्खा गरम मसाला, तमालपत्र फ़ोडणीस द्यावे. त्यावर तांदुळ घालुन चांगले परतवावे अ पाणी घालुन शिजवुन घ्यावे. भात शिजल्यावर मोकळा करुन घ्यावा म्हणजे चिकटत नाही. एका मोठ्या भांड्याला तुपाचा हात लावुन त्यात आधी भाताचा थर लावुन घ्यावा. मग त्यावर तळलेला कांदा, काजु, बारिक चिरलेला पुदिना शिरवावा. नंतर त्यावर कोलंबीची ग्रेव्ही पसरावी. त्यावर पुन्हा भात असे करत थर करावीत. मग ते पातेले मंदाग्नीवर १०-१२ मिनीटे थेवावे. वरुन साजुन तुपाची धार सोडावी. गरम गरम सर्व्ह करावा. मी त्याबरोबर भरलेला पापलेट केला होता.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 15, 2006 - 5:08 pm: |
| 
|
छान आहे क्रुति. यावर नारळाचे दुध घालुन शिजवली तर आणखी छान चव येईल. कोलंबी बरोबर केशराचा स्वाद चांगला जमतो. सगळे थर रचल्यावर भाताला छिद्रं करुन त्यात थोडे थोडे केशराचे दुध घालायचे.
|
हो खर भात करताना केशर टाकायच ते राहुनच गेल लिहायच त्याने वास आणि चव पण कलर पण छान येतो. आणि हो माशांबरोबर दुध चालत का?
|
Dineshvs
| |
| Thursday, November 16, 2006 - 5:01 pm: |
| 
|
मासे आणि दुध अशी संधी करुन खाल्ले तर अपाय होतो, असा गैरसमज आहे. बंगाली लोक तर दह्यात मासा शिजवतात. अनेक फ़्रेंच प्रकारात, माश्याबरोबर व्हाईट सॉस असतो.
|
Lalu
| |
| Thursday, November 16, 2006 - 5:31 pm: |
| 
|
दही आणि दूध यांचे गुणधर्म वेगळे आहेत. माशाबरोबर दही चालते, पण दूध नाही असे मी ऐकले आहे.
|
Ashwini
| |
| Thursday, November 16, 2006 - 6:30 pm: |
| 
|
माशाबरोबर दुध किंवा कुठलेही दुग्धजन्य पदार्थ खाल्ले तरी विरुद्ध आहार होतो. प्रायः त्वचा विकार होण्याचा संभव जास्त असतो. पण सतत वापराने allergies पण develope होऊ शकतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|