|
ब्रेड प्रथम मिक्सर मधुन काढुन घ्यावा. त्यातच गोड हवी तेवढी साखर घालावी. हे मिक्सर मधे घालुन छान बारिक करावे. एका भांड्यात २ अंडी फ़ोडुन २ वाटी दुध टाकावे व चांगले बीट करावे. हे बीट केलेले मिश्रण ब्रेड व साखरेच्या मिश्रणात टाकुन परत एकदा मिक्सर मधुन काढावे. आता एका पातेल्याला तुपाचा हात लावुन वरील मिश्रण ओतावे. व कुकरमधे शिटी न लावता इडली सारखे वाफ़वुन घ्यावे. हव असेल तर त्यात केशर व वेलची पुड टाकावी. छान चव येते.
|
दोन वाट्या दुध आणि दोन अंडी यासाठी साधारण किती स्लाईस वापरायचे
|
१ अक्खा ब्रेड वापरायाचा. मग हव तस दुध घालुन फ़ेटायच हे मिश्रण केकच्या मिश्रणापेक्षा थोडसच पातळ करायच.
|
Swa_26
| |
| Monday, November 13, 2006 - 9:42 am: |
|
|
विद्या, छान वाटतेय ही रेसिपी. पण हे पुडींग तिखट किंवा नमकिन बनवता येईल का ग? कारण माझ्या घरी गोड पदार्थ जास्त कोणी खात नाही.
|
Dineshvs
| |
| Monday, November 13, 2006 - 5:28 pm: |
|
|
पावाच्या स्लाईसचे चार तुकडे करायचे.ते मंद आचेवर गुलाबी परतुन घ्यायचे. मग सपाट भांड्याला थोडे लोणी लावुन त्यात हे तुकडे रचायचे. आठ दहा स्लाईस घेतल्या तर दोन कप दुध गरम करुन त्यात आवडीप्रमाणे साखर घालुन गरम करावे. त्यात एक चहाचा चमचा कष्टर्ड पावडर थोड्या दुधात मिसळुन घालावी.मग ते गरम दुध स्लाईसच्या तुकड्यावर ओतावे.आणि मंद आचेवर पुर्ण दुध आटेपर्यंट ठेवावे. मग गरम वा गार कसेहि खावे. आणखी वेळ असेल तर करायचा एक प्रकार. ब्रेडच्या स्लाईस शिळ्या असाव्यात. त्या सरळ मिक्सरमधे घालुन बारिक चुरा करावा. दोन चमचे लोण्यावर त्या परतुन घ्याव्यात. तीन हिरवी सफरचंद घेऊन बिया काढुन बारिक चिरावी. मंद आचेवर थोडे पाणी घालुन ती शिजववीत. त्यात लिंबाएवढा गुळ आणि दोन चमचे साखर घालावी. मिश्रण आळु द्यावे. ज्यामसारखे झाली कि उतरुन गार करावे. एका ग्लासमधे या मिश्रणाचा एक सेमी जाडीचा थर द्यावा. वर ब्रेडचा चुरा पसरावा. असे दोनतीन थर द्यावेत, वरुन क्रीम घालावे. व ग्लासेस अगदी थंड करुन, हे पुडिंग खावे. यात केळी, पपया अशी ईतर गराची फळे पण घालता येतील.
|
दिनेशदा हि खुप छान रेसिपी आहे. सफ़रचंदा पेक्षा अजुन दुसर कोणत फ़ळ घालु शकतो त्यात.
|
Psg
| |
| Tuesday, November 14, 2006 - 10:17 am: |
|
|
दिनेश, तुमच्या वरच्या कृतिप्रमाणेच मी केले होते पुडींग.. पण ब्रेड तळला नाही.. बारीक चुरा केला, आणि वरून कस्टर्ड ओतले. फ़्रीज मधे सेट केले, काजू, केळं, सफ़रचंद घालून मस्त लागत होते
|
Dineshvs
| |
| Tuesday, November 14, 2006 - 5:48 pm: |
|
|
ज्या फळांचा साधारण जाम केला जातो, असे कुठलेहि फळ चालेल. पण सफरचंद जास्त चांगले लागते. मस्क मेलन, पपया वैगरे न शिजवता वापरता येतील.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|