Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Egg Patties

Hitguj » Cuisine and Recipies » मांसाहारी » अंड्याच्या कृती » Egg Patties « Previous Next »

Sharmila_72
Saturday, November 11, 2006 - 8:41 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

साहित्य: उकडलेली अंडी, उकडलेले बटाटे, हिरवी चटणी(कोथिंबीर, पुदीना,मिरची, वगैरे घालून वाटलेली),कॉर्नफ्लोअर, रवा वरून लावण्यासाठी, तळण्यासाठी सनफ्लॉवर ऑइल.

कृती: उकडलेले बटाटे व्यवस्थित मॅश करुन त्यात थोडे कॉर्नफ्लोअर मिसळून मीठ घालावे. उकडलेल्या अंड्याचे चार तुकडे करावेत. उभे दोन पण करतात पण मग पॅटीस चा आकार मोठा होतो. बटाट्याची पारी करुन त्यात हिरवी चटणी सर्व बाजूने लावून घ्यावी. त्यात एक अंड्याचा तुकडा ठेवून पॅटीस वळावा. रव्यात घोळवून डीप फ्राय करावे.

असे पॅटीस पूर्वी दादर टी.टी. ला फूड सेंटर नावाचे पारशी लोकांचे दुकान होते तिथे मिळत असत. ए टू झेड च्या बाजूला. आता गेल ते दुकान.


Vin
Sunday, November 12, 2006 - 7:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वरील रेसिपि प्रमाणेच, काॅर्न मफिन करतानच मधे उकडलेले सबंध अंडे, पेस्टो साॅस, बेकन (आॅप्शनल) घालुन बेक करायचा. हा मफीन, बेक केल्यावर, मधे कापला की छान दिसतो. अर्धे अंडे, पेस्टो, बेकन स्ट्रिप असे सगळे लेयर्स चांगले दिसतत

हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators