|
Dineshvs
| |
| Friday, January 06, 2006 - 5:20 pm: |
| 
|
Lebkuchen हा जर्मन शब्द आहे. याचा अर्थ cake of life असा होतो. त्याची कृती अशी दोन ईंच दालचिनी, दोन लवंगा व ४ वेलचीतील दाणे, थोडी जायपत्री यांची पुड करावी. ११५ ग्रॅम बदामाचे तुकडे, ५० ग्रॅम पाकवलेली संत्र्याची साल आणि अर्ध्या लिंबाची किसलेली साल एकत्र करुन त्यात ही मसाल्याची पुड मिसळावी. दोन मोठी अंडी आणि ११५ ग्रॅम कॅस्टर शुगर एकत्र फ़ेटावे. हे अगदी घट्ट झाले पाहिजे. १५० ग्रॅम मैदा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर एकत्र दोन तीनदा चाळुन घ्यावी. मग अंड्याच्या मिश्रणात हे हळु हळु मिसळावे त्यात थोडा व्हॅनिला ईसेंस घालावा. मग त्यात सुक्या मेव्याचे मिश्रण अलगद मिसळावे. बेकिंग ट्रे ला लोणी लावुन त्यात एकेक टेबलस्पुन भरुन मिश्रणाचे गोळे ठेवावेत. १८० सी तपमानावर २० मिनिटे बेक करावेत. वायर रॅकवर थंड करुन त्यावर थोडेसे अंड्यातले पांढरे लावुन पिठी साखर चाळावी. वरुन पातळ केलेले चॉकलेट पण लावता येईल.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|