|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 3:37 pm: |
| 
|
शेवई लाडु साहित्य : शेवयांचे एक पाकिट साधारण २०० gram चे, १ वाटी साखर, अर्धी वाटी भरुन नारळाचा चव, अर्धा कप सायीसकट किंवा पूर्ण fat चे दुध, बेदाणे, वेलदोडा पावडर. कृती : नारळ थोडा परतुन घ्यावा, त्यातच शेवटी शेवया बारीक चुरुन घालुन त्याही परताव्या. दरम्यान साखरेत दुध घालुन पाक करावा.. एकतारी झाला की बंद करावा. त्यात हे नारळ शेवईचे मिश्रण व वेलदोडा पावडर घालुन अर्धा तास मुरु द्यावे. नंतर बेदाणे लावुन लाडु वळावे.
|
मला तू दिलेल्या शेवयाच्या लाडू बद्दल एक सांग त्यातल्या शेवया शेवट पर्यंत कुरकुरीत राहतात का? कि मऊ पडतात? मी अशी कुरकुरीत शेवयांची बर्फी खाल्ली आहे पण मला माहित नाही कशी करायची ते आणि त्यात कंडेन्स्ड मिल्क वापरलं होतं वाटते.
|
Moodi
| |
| Wednesday, August 02, 2006 - 3:27 pm: |
| 
|
दमट हवा नसेल तर काही दिवस रहातात तशा कुरकुरीत नाहीतर मग मऊ पडतात, पण चव चांगली असते, मात्र नारळाच्या चवातील ओलसरपणाने कधी कधी मऊ पडु शकतात. पण एअरटाईट डब्यात ठेऊन बघ. 
|
मूडी तुझे शेवयांचे लाडू करुन बघितले गं. छान कुरकुरीतच राहिले होते. पण मी मात्र दूध-साखरे ऐवजी कंडेन्सड मिल्क वापरुन केले.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|