Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
केळ्याच्या वड्या ...

Hitguj » Cuisine and Recipies » गोडवा » केळ्याचे प्रकार » केळ्याच्या वड्या « Previous Next »

Lajo
Thursday, October 05, 2006 - 2:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझी आई पिकलेल्या केळ्याच्या मस्त वड्या करते.
जाड रवा, कुस्करलेली केळी, साखर, काजु तुकडे आणि थोडसं दुध घालुन कालवुन झाकुन ठेवायचं. साधारण दीड एक तासानी मिश्रण थोडस सरबरीत होईल. फार पातळ वाटल तर थोडा अजुन रवा घालायचा आणि फ़ार घट्ट वाटल तर आजुन थोड दूध घालायच.
आता त्यात स्वादापुरती वेलचीची पुड घालायची आणि जरा खोलगट पॅन मधे सजुक तूप लावुन त्यावर हे मिश्रण ओतायचे. बाजुनी थोडे तूप सोडुन झाकणं ठेवायचे. मधुन मधुन लक्ष ठेवायचे. खालची बाजु खरपुस भाजली गेली की बाजु उलटायची आणि आता झाकण न ठेवता दुसरी बाजु भाजायची.
मग त्याच्या वड्या कापायच्या आणि गरम गरम खायच्या. या वड्या थंड सुद्धा चांगल्या लागतात-प्लेन व्हनिला आईस्क्रिम बरोबर. आहाहा, तोंडाला पाणी सुटल.


Swabhi
Tuesday, July 13, 2004 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Kup ipklaolyaa koLI kuskÉna GyaayacaI
AÜlaa naarL Kvauna Gyaayacaa
nantr Andajao naarLacyaa pa]Na pT saaKr Gao]na KÜbar AaiNa saaKr iXajat zovaayacaI qaÜDI iXajat AalaI kI kuskrlaolaI koLI Galauna caaMgala iXajavaayaca. vaolacaIÊ kosarÊ badama kap pNa Gaalaayacao


Isha_2083
Friday, February 23, 2007 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

केळ्याची वडी
पाककृतीचे जिन्नस
केळी ५
रवा पाव किलो
साखर ५ चमचे
दुध १०० ग्राम

क्रमवार मार्गदर्शन:

केळी, रवा, दुध व साखर एकत्र मिसळुन पातळ सारण करावे.
(जास्त पातळ करु नये, थोडे जाडसर असु द्या)
मग हे सारण कुकरच्या डब्या मधे लावावे (कुकरची शिटी काढुन टाकावी)
३ शिट्या झाल्यावर व कुकर थंड झाल्यावर डबा काढुन (डब्यामधेच) वड्या कराव्यात.

झाल्या वड्या तयार.
आवडल्यास नक्की प्रतिसाद द्यावा

अधिक टीपा:
केळी गोड असल्याने साखरेचे प्रमाण आवडी नुसार टाकावे.



Arch
Friday, February 23, 2007 - 2:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इशा, शिट्टी काढून टाकल्यावर शिट्टी कशी होईल ग?

Manishalimaye
Friday, February 23, 2007 - 3:16 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलाही नेमका हाच प्रश्न पडलाय आर्च!!

Dineshvs
Friday, February 23, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शिट्ट्या, कुकरच्या असे कुठे लिहिलेय ?
इशा, आमची थट्टा मनावर घ्यायची नाही बरं.


Milindaa
Friday, February 23, 2007 - 3:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मग हे सारण कुकरच्या डब्या मधे लावावे
३ शिट्या झाल्यावर (कुकरची शिटी काढुन टाकावी)

असे असेल ते :-)

Manishalimaye
Friday, February 23, 2007 - 5:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

असेलही कदाचीत असेच!!!


.. ..

Nalini
Saturday, February 24, 2007 - 3:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ह्याच कुकरसोबत दुसरा डाळ भाताचा कुकर लावावा आणि त्याच्या तिन शिट्ट्या झाल्या की ह्या कुकर खालचा गॅस बंद करावा.
दुसरा कुकरच नसेल तर ठराविक वेळेने नवर्‍याला शिट्ट्या मारायला सांगाव्यात. :-)


Arch
Sunday, February 25, 2007 - 12:05 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आणि नवरा नसेल तर?

Saavat
Sunday, February 25, 2007 - 3:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>ह्याच कुकरसोबत दुसरा डाळ भाताचा कुकर लावावा आणि त्याच्या तिन शिट्ट्या झाल्या की ह्या कुकर खालचा गॅस बंद करावा.
आणि नवरा नसेल तर?

त्या कुकरखालचा गॅसही बंद करावा.


Storvi
Sunday, February 25, 2007 - 8:33 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सावट .. .. ..

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators