Prajaktad
| |
| Wednesday, September 06, 2006 - 12:46 pm: |
|
|
मदत करा!मदत करा! मी अगदी वरतिच पोश्टले कि डफ़ो च्या पद्धतिने मुगाच्या चकल्या केल्या आणी छान झाल्या.. काल जरा प्रमाण वाढवुन करायल्या घेतल्या आणि सगळ मिश्रण जरा सैलसर आणी चिक्कट झालय.. चकली सोर्यातुन पडतिय पण,तळल्यावर सगळे वेढे एकमेकाना चिकटलेत... आणी खाताना चिवट लागतेय.. १ वाटी मुग डाळ ३ वाट्या मैदा अस प्रमाण घेतले होते. यात सुधारणा करुन चांगल्या चकल्या होतिल का?? नसेल होत तर दुसरा एखादा बरा पदार्थ करता येइल का??
|
Prajaktad
| |
| Thursday, September 07, 2006 - 1:56 am: |
|
|
अरे! कुणितरी मदत करा नाहितर ते सगळ पिठ वाया जाईल..
|
Limbutimbu
| |
| Thursday, September 07, 2006 - 4:42 am: |
|
|
एक प्रयोग करुन बघशील का? थोडा गोळा घे, त्यात तान्दुळाची पिठी किन्वा ज्वारीचे पीठ मिसळुन गोळा घट्ट कर! हे पीठ नसेल तर थोडे उडिद डाळीचे पिठ वापर, तस मिक्स करुन चविला वाढिव तिखटमीठ घालुन एक दोन चकल्या मन्द आचेवर तळुन बघ, जमल तर मला सान्ग! लौकर लौकर कर ग, अन लगेच सान्ग इथ! जास्तीचा चिकटपणा घालवायला व कुरकुरीत बनवण्याकरता वरील पीठे तसेच वाळक्या ब्रेडचा भुगा वापरतात! तस तर वाळक्या ब्रेडचा भुगा आयस्क्रीम मलैदार वाटण्याकरता पण करतात!
|
Raina
| |
| Thursday, September 07, 2006 - 6:31 am: |
|
|
लिंबू- ही कृती नक्की खरी आहे ना? खुपदा smiley टाकलेत पोस्टमध्ये म्हणुन दाल मे कुछ काला लग रहा है
|
Surabhi
| |
| Thursday, September 07, 2006 - 6:43 am: |
|
|
प्रजक्ता, अस केलस तर कसं? त्या चकलीच्या पीठाची कणीक लाटण्या इतपत त्यात मैदा मिसळून तिखट, मीठ, जिरे-मिरे-ओवा पूड टाकून पातळ पोळी लाटलीस व तिखट शंकरपाळी कापून तळलीस तर होईल असे वाटते. मोहन तू टाकलेच असशील तेव्हा ते नको घालूस! थोड्याश्या पीठाचे आधी try करून बघ!
|
Limbutimbu
| |
| Thursday, September 07, 2006 - 7:34 am: |
|
|
>>>> खुपदा smiley टाकलेत पोस्टमध्ये म्हणुन दाल मे कुछ काला लग रहा है अग कसल काळ अन कसल काय? तेवढ्यासाठीच तर मी प्रयोग कर म्हणल ना? छोटा गोळा घे म्हणल ना? बाइ बाइ बाइ, कित्ती डिटेल मधे समजवाव लागत! D (माझ्या मते तिन आत्ता पर्यन्त त्या चकलीच्या पिठाच्या चकोल्या करुन हाणल्या पण असतील! तुम्ही आपले बसा शन्काकुशन्का काढीत अन चर्चा करीत) DDD
|
Raina
| |
| Thursday, September 07, 2006 - 8:26 am: |
|
|
लिंबू सान- काय होतं ना की V&C गाजवत आणि जागवत ठेवणारे हेच ते लिंबूमहाशय असे वाटते- आणि मग असले अश्राप सुगरणींचे सल्ले तुम्ही खरेच देताय की टांगखेचींग ( legpulling ) कळत नाही.. म्हणून आपला भा.प्र.. आता मला "तवा कसा टिकवायचा" ते सांगा पाहू!
|
Prajaktad
| |
| Thursday, September 07, 2006 - 3:01 pm: |
|
|
परवा काही जमत नाही म्हणुन सगळ फ़्रिजमधे ठेवलय... काल दिवसभर reply चि वाट पाहिली पण काल " बाप्पाला " निरोप देन्यात सगळे बिज़ी होते...लिम्बु तुझी आणी सुरभीची अशी दोन्ही सुचना वापरुन आज प्रयोग करते... रैना नॉन्स्टिक तव्याला पहिल्या वापराआधी सिझनींग करुन घ्यावे त्याने जरा टिकायला मदत होते...
|
Manuswini
| |
| Monday, September 11, 2006 - 2:20 am: |
|
|
आर्च, मी तुझ्या Style च्या झटपट चकल्या केल्या. मी बेसन सुद्धा घातले होते. आणी चकली सुद्धा छान झाली खुसखुशीत आणी कुरकुरीत.
|
Manuswini, Kiti besan takale hotes?
|
Manuswini
| |
| Monday, September 11, 2006 - 6:23 pm: |
|
|
मी काय केले दोन छोटे sour creame regular चा डब्बे आणला. आणी मी वाटीने आधी तांदळाचे पिठ टाकत गेले. वाटीने टाकले कारण मोजमाप ठेवायला नंतर करताना. for eg: माझा sour creame चा डबा हा flavoured yogurt च्या size चा होता. त्यात दिड वटी तांदाळाचे पिठ टाकले मग जवळपास अरधी वाटी बेसन(कच्चे) टाकले. आणी मळले. छान भरपुर तीळ, तिखट,हळद टाकली. आनी लगेच चकल्या पाडल्या. साधारण मंदाग्नी वर तळल्या. मस्त होतात. Actually बेसन टाकल्याने एक चविष्ट अशी चव येते. आणी sour creame चा आंबटपणा जाणवत नाही. एक batch मी नुसते तांदुळाचे पिठ आणी एक अख्खा sour creame डब्बा टाकुन केली मग ही idea सुचली. thanks to आर्च as originator of this recipe
|
Thanks Manuswini for detailed recipe. Thanks Arch as well.
|
Arch
| |
| Tuesday, September 12, 2006 - 12:41 pm: |
|
|
चला आवडल्या न, चकल्या मनु.
|
Limbutimbu
| |
| Tuesday, September 12, 2006 - 12:58 pm: |
|
|
पण त्या प्राजक्ताच्या प्रयोगाच काय झाल?
|
आंबटपणा नसेल ही जाणवत पण sour cream चा विचीत्र वास जणवतो का या चकल्या खाताना?...कुणी करून खाऊन झालेल्यांपैकी संगेल का?....कारण तसा वास येत नसेल तरच मी पण करून बघेन अशा चकल्या असे म्हणत होते मी... या प्रश्णाच्या उत्तरा बद्दल thanks in advance...
|
Savani
| |
| Tuesday, September 12, 2006 - 1:43 pm: |
|
|
छे ग. अजिबात वास येत नाही. मी नेहमी करते या चकल्या. छान लागतात.
|
Manuswini
| |
| Tuesday, September 12, 2006 - 6:15 pm: |
|
|
मी केल्या ना परवाच दोन्ही Style च्या केल्या नुसते तांदुळ पिठ टाकुन आणे mixed टाकुन बेसन आणी तांदुळ ते छान धणा पावडर, जिरे, तीळ, किंचीत तिखट टाकले की वास नाही येत sour crem चा try कर साधी माणसं
|
वा बरे झाले मग... नक्की करुन बघते या चकल्या.
|
Prajaktad
| |
| Wednesday, September 13, 2006 - 3:01 pm: |
|
|
विकएंड जरा बिझी असल्याने चकलित केलेल्या सुधारणेबद्दल लिहणे झाले नाही.. तेव्हा आता लिहते.. उरलेल्या पीठाचे कडबोळी करावी लागली.. सुरभिने सांगितल्याप्रमाणे शंकरपाळी करुन बघितली पण,प्रयोग तेव्हधासा जमला नाही एकतर खुपच मैदा घालावा लागत होता.तेवधे करुन मिश्रण कोरडे होत नव्हते.. मग लिंबुने सांगितलेला प्रयोग केला. तांदळाचे पिठ टाकल्याने आणी मोहन टाकुन घट्ट केले पण,सोर्यातुन चकली पडायला त्रास होत होता. दोन्ही प्रयोग छोटे गोळे घेवुन करुन बघितले होते.. शंकरपाळी करुन बघताना बराच मैदा लागला होता.. म्हणुन शेवटी उरलेल्या पिठात ज्वारिचे पिठ,तांदुळ पिठ घालुन कडबोळी केली. पुरेसा मैदा शिल्लक नव्ह्ता पण,नंतर असे वाटले एक वाटि मैदा वाफ़वुन घातला असता तर कदाचित जमले असते. मी केलेल्या चुकितुन काही टिप्स ...मुगाच्या चकल्या करताना डाळ मैदा दोन्हि गरम नाही तर जरा कोमट झाल्यावर एकत्र करावे. ... चकल्या जरा वेळ असेल तरच निवांतपणे कराव्या. लिंबु,सुर तुमची आभारी आहे.
|
Sai
| |
| Sunday, September 24, 2006 - 6:04 pm: |
|
|
मला कोणि चकली साठी भाजणी कशी करायची त्याची पारम्पारिक क्रुती देउ शकेल काय??
|