|
Surabhi
| |
| Sunday, September 24, 2006 - 11:31 am: |
|
|
फरसबी कबाब पाव किलो फरसबी, २ कांदे, ३-४ लसूण पाकळ्या, १ ईंच आले, ७-८ लाल मिरच्या, २ वेलदोडे, २ दालचिनीचे तुकडे, अर्धा चमचा जिरे, अर्धी वाटी हरभर्याची डाळ, ३ ब्रेडचे स्लाईस, ५-६ पुदिना पाने, मीठ. कृती: फरसबी व कांदा बारीक चिरावा. हरभर्याची डाळ व फरसबी कुकरमध्ये शिजवून घ्यावी व शिजल्यावर चाळणीवर ओतून निथळावी. पाणी अजिबात राहू देऊ नये. ओलसर वाटल्यास पातेल्यात घालून गॅसवर ठेवावे व कोरडे करावे. मिश्रण गार झाल्यावर मिक्सरमधून काढावे. थोड्या तेलावर कांदा परतून घ्यावा. आले, लसूण वाटून घ्यावे. मसाला तव्यावर जरा भाजून घ्यावा व वाटून घ्यावा. पुदिना पाने चिरून व ब्रेड्चा चुरा करून सर्व एकत्र करावे. मिश्रण कोरडे वाटल्यास पाण्याच्या हाताने मळवे. ह्या मिश्रणाचे लांबट गोळे करून तळावे. दह्यातल्या हिरव्या चटणीबरोबर खावे.
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|