Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
निवगर्‍या

Hitguj » Cuisine and Recipies » उपाहार » खमंग » निवगर्‍या « Previous Next »

Rachana_barve
Thursday, August 31, 2006 - 5:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

निविगर्‍या .... उकड उरली की त्यात थोडं जिरं मिठ आणि मिरचीचा ठेचा आणि मग त्याच्या लहान लहान पार्‍या करून उकडायच्या.. yummy :-)

Sampada_oke
Friday, September 01, 2006 - 1:35 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, आम्ही त्याला निवगर्‍या म्हणतो.:-)

मोदक करून उरलेली उकड वापरून ह्या करतात. हिरवी मिरची, मीठ, जिरे वाटून घेऊन ह्या उकडीमध्ये मिक्स कर. ही उकड मळून घे आणि साबूदाणा वड्याला करतो तसे चपटे गोळे कर. जास्त जाड केल्यास तर आतून कच्च्या राहतील, म्हणून साधारण अर्धा ईंच जाड कर. ह्या निवगर्‍या मोदकपात्रात घालून उकड. अतिशय चविष्ट लागतात आणि पटकन संपतात.:-)


Dineshvs
Friday, September 01, 2006 - 4:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तांदळाच्या दिवशी, ( निवगर्‍या ?

पाऊण कप पाणी उकळत ठेवुन त्यात चवीप्रमाणे मीठ
व चिमुटभर हिंग घालावा. त्यात एक वाटलेली मिरची
घालावी व पाव कप ताक घालावे. मग त्यात एक कप
तांदळचे पीठ वैरावे.
तेलाचा हात लावुन, उकड मळुन घ्यावी. मग याचे
पेढ्यासारखे चपटे गोळे करुन त्यात खळगा करावा.
वाटीप्रमाणे आकार द्यावा. कुकरमधे प्रेशर ने देता
दहा मिनिटे उकडुन घ्याव्या.
वरुन जिरे मोहरीची फ़ोडणी करुन ओतावी, आणि खोबर्‍याच्या
हिरव्या चटणीबरोबर खाव्यात. तशी
चटणीची गरज नसते, पण चटणीबरोबर छान लागतात.


हितगुज गणेशोत्सव २००६

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators