Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
अढई (तमिळ पदार्थ) ...

Hitguj » Cuisine and Recipies » प्रादेशिक » दाक्षिणात्य » अढई (तमिळ पदार्थ) « Previous Next »

Manuswini
Tuesday, September 12, 2006 - 9:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही आंबोळ्यात चणाडाळ सुद्धा घालतो.

३ वाट्या तांदूळ.
१ वाटी उडीद डाळ,
मूठ्भर चणाडाळ,
मेथी दाणे
असे माझी आजी करायची it continued by my mom and now me

मी बघितले एक छान गोड चव येते वाटलेली चणाडाळ घातली असेल तर.

दुसरा एक पौष्टीक प्रकार म्हणजे मद्रास्याचे अढई का अढे.

त्यात सर्व डाळी भिजत घालुन करतात.

साधारण असे प्रमाण असते.
४ वाट्या तादूळ,
दीड वाटी उडीद डाळ,
अर्धी वाटे मूग डाळ,
अर्धी वाटी चणाडाळ
मेथी दाणे.
आले,लाल मिरचे,लसुन एखादी अशी paste
जिरे, धणे pwdr ,
आणी छान डोसा तव्यावर तेल लावुन अढई काढायची.

नारळाचे चटणी आणी खंमग अढई.


Junnu
Tuesday, September 12, 2006 - 9:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अडई म्हणतात ग त्याला. मी अडई मधे लसुण नाही घालत आणि हिरवी मिरची घालते. बाकी तु दिल आहेस तसच सगळ.

Moodi
Tuesday, September 12, 2006 - 9:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो अशीच ती अढई. माझ्या शेजारच्या तामिळ काकुंनी दिलेली, बरी आठवण केलीस.

१ वाटी तांदूळ, प्रत्येकी अर्धा वाटी हरबरा डाळ, उडिद डाळ आणि तूर डाळ असे सर्व घेऊन सकाळा गरम पाण्यात भिजवायचे. त्यातच २ ते ३ लाल सुक्या किंवा ताज्या हिरव्या मिर्च्या घालायच्या. मी सुक्या घालते.

संध्याकाळी मिर्च्यांसकट वाटुन चिमुटभर मीठ घालुन फ्रिझमध्ये ठेवायचे. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यात कांदा वाटण घालायचे( कांदा वाटण म्हणजे १ कांदा बारीक चिरुन तेलात हिंग व कढीपत्ता टाकुन परतुन घ्यायचा, ते या मिश्रणात घालतात)

मग धिरड्यासारखे करायचे.


Psg
Wednesday, September 13, 2006 - 6:12 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पीठ तर उत्तप्प्यासारखेच वाटते आहे.. का काही फ़रक आहे?

Manuswini
Thursday, September 14, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम,

अग पिठ उत्तप्यासारखे वाटते पण चव वेगळी आहे.
करुन बघ.

खुप healthy आहेत.

सर्व डाळी टाकुन.

त्यात आले, मिरची,धणा ज़िरे powder टाकुन

मूडी म्हणते तसे कांदा नसतो घालयचा असे माझी ही मद्रासी मैत्रिण म्हणते.

मी तरी कांदा घालत नाही.

ही माझी खुप जवळची मद्रासी मैत्रिनीने सांगितलेली recipe तेव्हा प्रत्येक ठिकणी variation हे असेलच.

पोटाला पण हलके होतात कारण आले असते न.
सांग करुन मग


Deepanjali
Thursday, September 14, 2006 - 5:25 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पूनम ,
उत्तप्या मधे तूर डाळ - मूग - आणि चना डाळ नसते .
शिवाय लाल मिरची आले लसूण पण नसते !
अर्थात variation म्हणून उत्तप्यामधे ही हे सगळे कोणी घालत असेल तर माहित नाही .


Psg
Friday, September 15, 2006 - 5:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो मनु, डीजे.. माझ्या आईच्या उत्तप्प्याच्या कृतित २ वाट्या तांदूळ असतील तर पाऊण वाटी उडीद डाळ, आणि पाव वाटी असतील त्या सर्व डाळी असं आहे, म्हणून मला similar वाटले. आणि येस, उत्तप्यात आलं, लसूण नसते. सो हा वेगळा प्रकार झाला.. :-)

Chioo
Friday, September 15, 2006 - 11:30 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मनुस्विनी, तू जे एकदम प्रथम दोन प्रकार दिले आहेत ते करताना, तांदूळ आणि डाळी मूडीने सांगितल्याप्रमाणे सकाळी भिजत घालून, संध्याकाळी वाटून दुसर्‍या दिवशी सकळी करायचे का? त्यात आलं वगैरे कधी घालायचं? वाटताना की ऐन वेळी डोसे करताना?

Manuswini
Friday, September 15, 2006 - 8:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

चिऊ
अडाई :
काय करायचे बघ,
तांदूळ वेगळे भिजत घाल नी डाळी वेगळ्या घाल.
मग Separate वाट दुसर्‍या दिवशी.
मग त्यात डोसे करण्याआधी आले, लाल मिरची, पाहिजे असल्यास लसुण(लसुण मी टाकते कारण भरपुर डाळी असल्याने flatulence होणार नाही),
आणी कढीपत्ता वाटुन टाक. मिठ, धणा-जिरा powder ,तिखट किंचीत.

authentic recipe म्हणे कांदा घाल्त नाहे- इती मद्रासी मैत्रिण. :-)
try कर. मस्त लागतात.

typical चणाडाळ,उडीद्डाल घालुन ओल्या खोबर्‍याची चटणी.

तांदूळ एकदम बारिक वाट पण डळी रवाळ वाट.

संध्याकाळी पाणी change कर जर सकळपासुन भिजत घातल्या असशील तर आणी दुसया दिवशी वाट.
मला नक्की सांग केल्यावर.
कारण हा पदार्थ माझा fav आहे.

थोडासा खुसखुशीत लागतो एकदम नरम होण्याएवजी.

दुसरा प्रकार हा आपला आंबोळ्याचा आहे ग.

त्यात फक्त जराशी मुठभर चणाडाळ घालयची आणी तांदूळ व उडीद डाळ वाटायची. त्यात आले, लसुण, मसाला नाही टाकत.

मेथी टाकायचे कारण कुठल्याही fermented product हे हलके व मऊ होते मेथी मुळे.
माझी आजी authentic style ने धूरी द्यायची रात्री आंबवणाला. एक छान वास यायचा आंबोळीला


Maitreyee
Friday, September 15, 2006 - 9:38 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एक शंका, हे अढई लिहिलेय ते आंबवायचे का डोश्या सारखे की वाटून लगेच करायचे?

Manuswini
Friday, September 15, 2006 - 10:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अग मैत्रीयी

त्या डाळी,तांदूळ आदल्या दिवसापासुन भिजत ठेवल्या असतात ना म्हणून सकाळी वाटुन झाले की मी तरी साधारण २ ते ३ तासाने करते आले,मिरचे वगैरे वगैरे घालून ठेवून

नाहीतर रात्री वाटुन एकत्र आंबव आणी सकाळी वाटप टाक आल्याच,मिरचीचे वगैरे वगैरे आणी लगेच कर.
डाळी छान आंबल्या पाहिजेत. हाच हेतु कारण एवढ्या डाळी घातलेल्या असतात अडई हलकी नाही होणार जर आंबले नसेल तर आणी ज़ड होणार.
रात्रभर डाळी भिजत ठेवणार असशील तर संध्याकाळी एकदा पाणी बदल डाळींचे.


Chioo
Monday, September 18, 2006 - 9:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा. आता कळाले. :-) खूप खूप धन्यवाद. आता या आठवड्यात करते आणि नक्की सांगते. :-) मला सकाळी करणे जमणार नाही. तेव्हा मी एक दिवस सकाळी तांदूळ, डाळी भिजवेन आणि रात्री वाटून फ्रिजमधे ठेवेन. मग दुसर्‍या दिवशी संध्याकाळी करेन. :-) फ़्रीजमधे ठेवल्याने जास्त आंबणार नाही पण पुरेसे आंबेल.

Chioo
Monday, January 21, 2008 - 11:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काल केली अढई. :-) मस्त लागते. धन्यवाद मनु.

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६





Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators